माझे घर मराठी निबंध | my house essay in marathi

नमस्कार  मित्रांनो , आम्ही या लेख मध्ये आपल्या घराविषयी निबंध लिहिला आहे. हा निबंध तुम्ही माझे घर मराठी निबंध , my house essay in marathi, majhe ghar essay in marathi , essay on my house in marathi या विषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता. 

माझे घर मराठी निबंध  my house essay in marathi

आमचे घर मुंबई या शहरांमध्ये आहे. मुंबई या शहरांमध्ये घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. माझ्या पणजोबापासून आम्ही चाळीमध्ये राहतो. माझे बालपणसुद्धा याच चाळीमध्ये गेले. माझ्या घराचे बांधकाम चांगल्या दर्जाचे असल्यामुळे ते अजून सुद्धा चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. आमच्या घराला जवळजवळ ५० पेक्षा जास्त वर्षा झाली आहेत. आमच्या घराच्या भिंती सिमेंट काँक्रीट पासून बनवल्या आहेत.

आमच्या आजूबाजूच्या परिसर ( surroundings of our house )

आमचे घर सिमेंटच्या पत्र्यांचे आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खूपच गरम होते. त्यामूळे आम्ही विरंगुळा म्हणून बाहेर जाऊन बसतो. आमच्या घरासमोर छोटेसे आंगण आहे. माझ्या आजोबांनी तिकडे अनेक वर्षापूर्वी नारळाचे आणि पेरूचे झाड लावले होते. 

आज आम्ही याच झाडाची फळे खातो आणि नारळ स्वयंपाकासाठी वापरतो. त्याच प्रमाणे आम्ही काही तगर, जास्वंद या सारखी फूल झाडेही लावली आहेत, ज्याचा वापर आम्ही रोज देवपुजेला करतो. आपल्या आवडीचे आणि आपल्या स्वप्नांचे नवीन घर विकत घेणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते.

विरंगुळा म्हणून बाहेर व्यवस्था असलेल्या कट्ट्यावर बसतो. तेथे सुंदर अशी झाडांची सावली लाभते. दररोज दुपारी तेथे आजूबाजूच्या काकूंच्या गप्पा रंगलेल्या असतात. पण कशाही असल्या तरी अडचणीला नेहमी धावून येणारे शेजारी आम्हाला नशिबाने किंवा आमच्या चांगल्या कर्माने मिळाले आहेत.

माझे घर मराठी निबंध , my house essay in marathi, majhe ghar essay in marathi , essay on my house in marathi

आमचा परिवार ( our family )

आमचा आई ,बाबा ,आजी ,आजोबा,  मी आणि बहीण असा  सहा जणांचा परिवार आहे. घराचे वासे जरी पोकळ असले तरी आमच्या घरात घरपण देणारी माणसे आहेत. आमच्या घरामध्ये  एकूण ४ खोल्या आहेत. माझे बाबा रिक्षा चालक आहे तर आई गृहिणी आहे. आजोबा निवृत्त आहेत आणि आईला आजी मदत करते.

आमच्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर छोटी गॅलरी आहे. तिकडे आम्ही छोटेमोठे सामान ठेवले आहे जसे की चप्पल, माझी सायकल, पाण्याची मोटर. आम्हाला दिवसातून सकाळी व संध्याकाळी असे दोन वेळा पाणी येते. पाण्याचा वेग कमी असल्यामुळे आम्हाला मोटर वापरुन पाणी घ्यावे लागते. कधी कधी तर पाणी येत सुद्धा नाही , मग जवळच्या काकूंकडून पाणी आणावे लागते.  

घरातील खोल्यांची माहिती ( information about our house )

आमच्या घराची रचना प्रथमतः गॅलरी नंतर छोटा रूम, नंतर हॉल, मग रसोई घर आणि त्यानंतर स्नानगृह, शौचालय अशी आहे. आम्ही आमच्या घराच्या छतावर टीव्ही चा अँटेना लावला आहे. दरवर्षी आम्ही दिवाळी, दसरा किंवा कोणताही सणाच्या एक आठवडा अगोदर आमच्या घराची सासफाई करतो.  

आमच्या घरामध्ये कोणतीही मोलकरीण काम करीत नाही. आईच सर्व घराची देखभाल घेते तसेच घर टापटीप ठेवते. आम्ही दर दोन वर्षांनी आमच्या घराला रगरंगोटी करतो.

चाळीमधील सांस्कृतिक कार्यक्रम ( cultural program in society ) 

दरवर्षी आमच्या चाळीमध्ये गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, दिवाळी, दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच विविध शैक्षणिक , सांस्कृतिक ,सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम आयोजित केली जातात.
मागील वर्षी रक्तदान शिबिरास प्रभागातील सर्व नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. अशा अनेक कार्यक्रमात प्रभागातील नवोदित तरुण-तरुणी, प्रौढ स्त्री-पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुले सहभागी होतात.

अंगणामध्ये आम्ही कॅरम , सापशिडी, लुडो यासारखे बैठकीचे खेळ खेळतो. आमच्या घराच्या बाजूला मैदान आहे तिकडे आम्ही क्रिकेट, फुटबॉल, खोखो, कबड्डी या सारखे मैदानी खेळ खेळतो. 

या मैदानामध्ये सकाळच्या वेळेस काही जेष्ठ नागरिक चालण्यासाठी तसेच काही जण व्यायाम आणि योगासने करण्यासाठीं येतात. शहरामध्ये महागाई मुळे अनेक कुटुंबांना लहान घरा मध्ये राहावे लागते. त्यामानाने आम्ही खूप नशीबवान आहोत, म्हणूनच आम्हाला मोठा घर लाभले.

आमच्या घराप्रमाणेच आजूबाजूच्या सर्वांच्या जवळपास दोन तीन पिढ्या याच घरांमध्ये झाल्या  आहेत. आमच्या प्रत्येक चाळीला एक क्रमांक आहे , त्याचप्रमाणे येथील प्रत्येक खोलीला एक क्रमांक आहे. उदारणार्थ , चाळ क्रमांक ४०१ आणि खोली क्रमांक ४६५४ आहे. प्रत्येक चाळीमध्ये जवळपास सात ते आठ खोल्या/ घर आहेत. 

सध्या चाळीचे पुनर्विकासाचे धोरण आखण्याची तयारी चालू आहे. पण बिल्डिंग मधल्या फ्लॅट ला चाळीतील सुख कधीच लाभणार नाही. काही जणांना शहरांतील राहणीमान परवडत नसल्यामुळे घर विकून गावी राहावे लागले. तर काही जण शहरापासून दूर छोटे घर घेऊन राहू लागलेत. 

देव करो सर्वांना सुबुद्धी देवो आणि आमच्या अनेक पिढ्या याच खोल्यामध्ये राहोत.

खूप खूप धन्यवाद मित्रांनो, जर तुम्हाला  माझे घर मराठी निबंध , my house essay in marathi, majhe ghar essay in marathi , essay on my house in marathi हा लेख  छानपैकी आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सांगायला आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment