माझी आई निबंध मराठी | essay on mother in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये माझ्या आईबद्दल निबंध लिहिला आहे. ही माहिती तुम्ही essay on mother in marathi, माझी आई निबंध मराठी, my mother essay in marathi, majhi aai nibandh in marathi 10 lines, माझी आई माहिती, majhi aai essay in marathi, majhi aai nibandh in marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता. मला अपेक्षित आहे की , तुम्हाला तो नक्की आवडेल.

माझी आई निबंध मराठी | essay on mother in marathi

आई या शब्दाचा अर्थ ( meaning of word aai )

थोडक्यात आई या शब्दाचा अर्थ सांगायचं झाला तर आपण असे म्हणू शकतो कि ,
“आ” म्हणजे आत्मा आणि “ई” म्हणजे ईश्वर.

माझ्या आईचा जन्म रत्नागिरी जिल्यातील संगमेश्वर तालुक्यातील एका छोट्याश्या खेडेगावात झाला. मागच्याच महिन्यात तिचा ५० वा वाढदिवस मोठया थाटामाटात साजरा केला. माझ्या आईचे माहेरचे नाव मिलन आहे आणि सासरचे नाव योजना आहे. ती अतीशय साधी भोळी आहे. ती लहान असताना तिच्या घरची परिस्थिती हलाखीची होती, म्हणून तिला तीच शिक्षण पूर्ण करता आलं नाही. मला इंजिनियर आणि दादाला डॉक्टर बनवणे हे तिचे स्वप्न आहे.

माझ्या आईची महती ( greatness of mother )

बाबांचे ८ ते १२ तास नौकरी आणि प्रवासात जात असल्यामुळे आमच्या घरची सर्व जबाबदारी तिच्यावर पडत असे. तिच्या स्वभाव अतीशय प्रेमळ आहे. ती आमचा कधी भेदभाव करीत नाही. लहानपणापासून तिचा आमच्यावर जीव आहे. आपल्याला जर चालताना ठेच लागली तर आपण अप्रत्यक्षरीत्या आईलाच हाक मारून “आई ग…!” असा म्हणतो.

आई ९ महिने आपल्या बाळाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून वाढवते त्याचे संगोपन करते. म्हणूनच तिचे पांग न फेडण्यासारखे असतात. ती आपल्या बाळाच्या संरक्षणासाठी काहीही करू शकते. महान अश्या झाशीची राणी लक्ष्मबाई यांची कहाणी तर आपण ऐकलीच असेल. जिने आपल्या बाळाला पाठीवर घेऊन शत्रूशी कडवी झुंज दिली.

अनेक कवी, संतांनी काव्यामध्ये , कवितांमध्ये , पुस्तकामध्ये आईची महती कथिथ केली आहे. श्रीगणेशाच्या जन्माची कहाणी आपण ऐकालीच असेल. जेव्हा भगवान शंकरांनी बाळगणेशाचे धड वेगळे केले होते तेव्हा देवी पार्वती किती क्रोधित झाल्या होत्या. एका आईच मन फक्त एका आईलाच कळते.

essay on mother in marathi, माझी आई निबंध मराठी, my mother essay in marathi, majhi aai nibandh in marathi 10 lines, माझी आई माहिती, majhi aai essay in marathi, majhi aai nibandh in marathi

माझी आई जेवण अतीशय रूचकर बनवते. ती मेथीचे लाडू मला रोज खायला देते. तिने बनवलेल्या पुरणपोळ्या, चकली , चिवडा, पराठा , बासुंदी मी खुप आवडीने खातो. आई बद्दल सांगायचे झाले तर मला खालील काही ओळी आठवतात. जसे की,

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी

असे म्हटले जाते, की ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ आपल्याजवळ खुप पैसा आहे, धन आहे, पण मायेन डोक्यावरून हात फिरवणारी, मायेची सावली देणारी आई नाही, तर आपल्याला मिळालेल जीवन खर्‍या अर्थाने जीवनच राहणार नाही. आई ही सर्वश्रेष्ठ आहे, ती फक्त एक स्त्री नसून साक्षात देवता आहे

आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही

आई चा स्थान देवाप्रमाणे आहे. काही लोक आपल्या आईची सुद्धा देवाप्रमाणे देव्हाऱ्यात ठेवून पूजा करतात.

आईचे काळीज ( heart of mother )

एका मुलाने आपल्या आईचे काळीज कापून हातात घेतले व तो रस्त्याने पळत जाऊ लागला. पळता-पळता ठेच लागून तो पडला व ते काळीज त्याच्या हातून खाली पडले. त्या काळजातून आवाज आला ” बाळा पडलास कारे ? फार लागले नाही ना तुला !”. आईची आपल्या मुलांवर माया असते हेच या गोष्टीतून सिद्ध होते.

जरी ती शिकलेली नसली तरी तिच्या अंगी कलागुण वाखण्याजोगे आहेत. ती रांगोळी अतिशय छान काढते. आमच्या विभागांत दिवाळीमध्ये घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेमध्ये तिने पहिला क्रमांक पटकावला आहे. ज्याप्रमाणे आपली आई आपल्यावर प्रेम करत असते त्याप्रमाणे आपल्या पिल्लांवर सुद्धा गाय, म्हैस माया लावीत असते.

ती घर तर सांभाळते त्याचबरोबर घरबसल्या शिवणकाम पण करते. अश्याप्रकारे ती आमच्या घराला आर्थिक हाथभार सुध्दा लावते. रोज आम्हा सर्वांच्या आधी ती उठते. सर्वांसाठी नाश्ता तयार करते. मला कधी सकाळी उठून अभ्यास करायचा असेल, तर तिचं मला झोपेतून उठवते.
माझ्या कडे वेळ असेल तर मी सुद्धा तिला घर कामात मदत करतो.

माझ्या आईचा स्वभाव

तिचा स्वभाव साधा भोळा असल्यामुळे एका सोनाराने तिला फसवला होते. दारामध्ये आलेल्या भिक्षुकांना ती रिकाम्या हाथी परत पाठवत नाही. त्यांच्या हातात काहीतरी खाण्यासाठी किंवा रूपया तरी दान करते. ती तिच्या सर्व जुन्या साड्या आणि आमचे जुने कपडे वृद्धाश्रमासाठी तसेच अनाथ आश्रमासाठी दान करते.

आजोळी जाताना ती मामाच्या मुलांसाठी गोड खाऊ तसेच नवीन कपडे सुद्धा घेऊन जाते. परीक्षेला जाताना मी नेहमी तिच्या पाय पडून जात असे. सणासुदीला ती स्वतःला नवी साडी सुद्धा घेत नाही पण आम्हाला दर दिवाळीला नवनवीन कपडे घेते. ती घरात नसली की घर आम्हाला अधुरे वाटते.

ती वडीलधाऱ्या माणसांचा मान देखील राखते. आजी- आजोबांची तिने अविरत सेवा केली आहे. तिच्याकडे अफाट अशी सहनशक्ती आहे. आमची आजी तिला मायेने आणि प्रेमाने ‘गृहलक्ष्मी’ म्हणून संबोधते.

पण आजच्या या कलयुगात आपण बघतो की, बरेचं मुले आपल्या वृद्ध आईकडे दुर्लक्ष करत आहेत.
म्हणुनच या लेखातून मला असे सांगायचे आहे की, ज्याप्रमाणे लहान असताना आई आपली काळजी घेते आपल्याला आपल्या पायांवर उभा करते. त्यांनतर त्यांच्या वृद्धापकाळात आपण त्यांना वृद्धाश्रमात न ठेवता आपल्या सोबतच ठेवले पाहिजे आणि त्यांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. असे झाले तर आपल्याला या जगात वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला essay on mother in marathi, माझी आई निबंध मराठी, my mother essay in marathi, majhi aai nibandh in marathi 10 lines, माझी आई माहिती, majhi aai essay in marathi, majhi aai nibandh in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

2 thoughts on “माझी आई निबंध मराठी | essay on mother in marathi”

Leave a Comment