साने गुरुजी मराठी माहिती | sane guruji information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये साने गुरुजी बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही साने गुरुजी मराठी माहिती , sane guruji information in marathi , sane guruji biography in marathi , information about sane guruji , sane guruji marathi mahiti याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

साने गुरुजी मराठी माहिती | sane guruji information in marathi

साने गुरुजी मराठी माहिती | sane guruji information in marathi

साने गुरुजीं यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे आहे. कोकणातील पालगड या गावी साने गुरुजींचे वडील सदाशिवराव राहत होते. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. स्वतःचे घराणे साधारणतः वैभव संपन्न आणि श्रीमंत समजले जाते. त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती चांगली होती. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती फारच घसरत गेली. ती इतकी घसरली की, सदाशिवरांचे घर-दारही जप्तीत नाहीसे झाले.

अशा रीतीने बडा घर आणि पोकळ वासा झालेल्या या घराण्यामध्ये २४ डिसेंबर १८९९ रोजी साने गुरुजींचा जन्म झाला. गुरुजींच्या आईचे नाव यशोदा होते. लहानपणापासून गुरुजींचे आपले आईवर अतोनात प्रेम होते. श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितलेले आहेत. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले, त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला. सर्वानभूती प्रेम करण्याचा धडा साने गुरुजींना त्यांच्या आईनेच दिला.

साने गुरुजींचे मन अतिशय भावनाप्रधान आणि संस्कारक्षम होते. म्हणूनच आईने पेरलेल्या सतभावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली. गुरुजींचे प्राथमिक शिक्षण पालगडला झाले. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणाचा प्रश्न उद्भवला. पुण्यात मामांच्याकडे त्यांना ठेवण्यात आले. पण त्यांना पुण्यात राहण्यात रस नव्हता. म्हणून ते पुन्हा पुण्याहून आपल्या घरी पालगडला गेले आणि दापोलीमध्ये मिशनच्या शाळेत शिक्षणासाठी जाऊ लागले. शाळेमध्ये हुशार विद्यार्थी म्हणून त्यांनी नाव कमावले. मराठी आणि संस्कृत या विषयात त्यांचा हातखंड होता.

कविता करण्याचा नाद त्यांना लहानपणापासूनच होता. म्हणूनच कवी म्हणून शाळेत त्यांची कीर्ती पसरली. गुरुजींचे पाठांतर जबरदस्त होते. प्राकृत पूर्ण आणि पोत्यांचे त्यांनी वाचन केले होते. घरातील दारिद्र्य दिवसेंदिवस वाढतच चालले होते. गुरुजींच्या थोरल्या भावाने नोकरी धरली होती आणि गुरुजींना सुद्धा आता आपण वडिलांच्यावर विसंबून राहू नये असे वाटू लागले म्हणून त्यांनी शिकण्यासाठी कुठेतरी दूर जाण्याचा निश्चय केला. एका मित्राने त्यांना सांगितले की औंध संस्थानामध्ये जा. तेथे गरीब विद्यार्थ्यास मोफत अन्न मिळते. त्यानुसार गुरुजी औंध संस्थानात येऊन राहिले. शिक्षणासाठी खडतर हालअपेष्टा त्यांनी सोसल्या, माधुकरी मागितली, शिळे अन्न खाऊन त्यावर दिवस काढले. कधी कापडी खाऊन तर कधी ओळखीच्या गिरणी वाल्याकडून मिळणाऱ्या पिठावर आपली गुजरण केली.

पण ज्ञानोपासना मात्र सोडली नाही. गुरुजींच्या दुर्दैवाने तेथे प्लेग सुरू झाला. त्यामुळे साने गुरुजी आपले शिक्षण अर्धवट सोडून परत घरी पालगड येथे आपल्या घरी परत आले. आल्यावर वडिलांना आपल्या पुनरागमनाचा संशय आल्याचे दिसताच गुरुची तत्काळ पुण्यात आले आणि नूतन मराठी विद्यालय मध्ये दाखल झाले. गुरुजींचा स्वभाव अतिशय भीडस्त होता. त्यामुळे त्यांचे अधिकच हाल होते. कधी डाळ चुरमुरे खाऊन दिवस काढावेत, तर कधी एक वेळ जेवून राहावे.

शेवटी काही ठिकाणी वार मिळाले. अशा या खडतर हाल अपेक्षा शोषित गुरुजींचे शिक्षण मात्र चालूच राहिले. गुरुजी १९१८ साली मॅट्रिक झाले. शाळेत गुरुजी अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून नावलौकिक मिळवले. मॅट्रिक झाल्यावर त्यांनी आपले नाव न्यू पुणे कॉलेजमध्ये म्हणजेच आत्ताचे एस. पी. कॉलेज येथे दाखल केले. एस. पी. कॉलेजमधून ते बी.ए. आणि एम.ए. च्या परीक्षा उत्तीर्ण झाले.

एम. ए. झाल्यानंतर पुढे काय करावे? या विचारात असतानाच अंमळनेरच्या तत्त्वज्ञान मंदिरासाठी फेलो हवेत, अशी जाहिरात त्यांनी वाचली. गुरुजींनी लगेच अर्ज केला, त्यांना प्रवेश पण मिळाला. पण लवकरच त्यांनी तत्त्वज्ञान मंदिराला रामराम ठोकला आणि गुरुजी अमळनेर येथील शाळेतच शिक्षक झाले. थोड्याच दिवसात तेथील वस्तीगृहाचे मुख्य झाले. तेथील विद्यार्थ्यांच्या जीवनाशी ते समरस झाले.

विद्यार्थ्यांना स्वावलंबन आणि सेवावृत्ती आपल्या कृती द्वारा त्यांनी शिकवली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपले सारे श्रम आणि सारी बुद्धी त्यांनी खर्च केली. गुरुजी या अभिधानाला ते सार्थ ठरले. १९२८ च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांनी विध्यार्थी या नावाचे मासिक सुरु केले. १९३० साली भारतामध्ये राजकीय आंदोलन सुरु आले. गुरुजी शालेय जीवनातून मुक्त झाले. भारताच्या राजकीय जीवनामध्ये समरस होण्यासाठी त्यांनी सत्याग्रहामध्ये भाग घेतला. येथे गुरुजींच्या आयुष्यातील प्रथमर्थ संपून उत्तरार्थ सुरु झाला.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला साने गुरुजी मराठी माहिती , sane guruji information in marathi , sane guruji biography in marathi , information about sane guruji , sane guruji marathi mahiti हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment