सरदार वल्लभभाई पटेल यांची माहिती | sardar vallabhbhai patel information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांची माहिती , sardar vallabhbhai patel information in marathi , vallabhbhai patel information in marathi , sardar vallabhbhai patel biography in marathi , statue of unity  याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

सरदार वल्लभभाई पटेल यांची माहिती | sardar vallabhbhai patel information in marathi

सरदार वल्लभभाई पटेल यांची माहिती | sardar vallabhbhai patel information in marathi

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ मध्ये नडियाद गुजरात मध्ये झाला होता. त्यांच्या आईचे नाव लाढबाई आणि वडिलांचे नाव झावेरभाई होते. वल्लभभाई पटेल यांचे वडील झावेरभाई हे एक शेतकरी होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धामध्ये झाशीच्या राणीच्या सेनेमध्ये काम केले होते. आपल्या वडिलांबरोबर शेतीचे काम करत असताना सरदार पटेल यांनी सुरुवातीचे शिक्षण आपल्या स्थानिक शाळेमधून पूर्ण केले होते.

सरदार पटेल लहानपणापासूनच एक बुद्धिमान, साहसी , निश्चयी व्यक्तिमत्त्वाचे व्यक्ती होते. नेहमीच ते अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असत. लहान असताना आपण मोठे झाल्यावर वकील व्हावे, ही त्यांची फार मोठी इच्छा होती. आर्थिक परिस्थिती बेताची असताना सुद्धा वल्लभभाई पटेल यांनी आपल्या मित्र परिवाराकडून पुस्तके मागून वकिलीचा अभ्यास केला. त्यानंतर ते जिल्हा वकिलाची परीक्षा पास झाले.

त्यांनी गुजरात मधील गोधरा येथे आपली वकिली प्रॅक्टिस सुरू केली. इसवी सन १९०२ मध्ये ते वलसाड येथे आले आणि जिल्हा मुख्यालयामध्ये यशस्वीपणे आठ वर्ष गुन्हेगारीवर वकिली केली. त्यामुळे त्यांची घरची आर्थिक परिस्थिती सुधारली होती. पुरेसे पैसे मिळवल्यानंतर त्यांनी झवेरबा यांच्याशी लग्न केले. त्यानंतर त्यांना दोन मुले झाली. इसवी सन १९१० मध्ये उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी ते लंडनला गेले आणि तेथे चांगला अभ्यास करून परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.

वल्लभभाई भारतात परतले आणि अहमदाबाद येथे वकिलीचा व्यवसाय करू लागले. इसवी सन १९१७ मध्ये जेव्हा महात्मा गांधीजींना सरदार वल्लभभाई पटेल भेटले. तेव्हा त्यांच्या जीवन आणि विचार पूर्णपणे बदलून गेले होते. कारण महात्मा गांधीजींनी त्यांना स्वतंत्र भारताविषयी आणि अहिंसेच्या तत्त्वज्ञानाविषयी माहिती सांगितली होती. इसवी सन १९१८ मध्ये गुजरातचा खेड येथे भयंकर दुष्काळ पडला होता. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी इंग्रज सरकारला कर माफी करण्यासाठी विनंती केली आणि त्यानुसार निवेदन केले.

हे निवेदन इंग्रज सरकारने धुडकावून लावले. तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी शेतकऱ्यांचे नेतृत्व केले आणि शेतकऱ्यांना कर न भरण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे इंग्रज सरकारला माघार घ्यावी लागली आणि कर माफ करावा लागला, याला आपण सरदार पटेल यांचे मोठे यश म्हणू शकतो. बारडोली सत्याग्रहाच्या निमित्ताने सहन १९२८ मध्ये गुजरात मध्ये एक प्रमुख किसान आंदोलन झाले होते ज्याचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते.

या आंदोलनापुढे इंग्रज सरकारला माघार घ्यायला लागली त्यामुळे शेतकऱ्यांचा विजय झाला. हा सत्याग्रह निर्विघ्नपणे पार पडल्यावर आणि त्याच्या यशानंतर शेतकऱ्यांनी वल्लभभाई पटेल यांना सरदार ही उपाधी दिली. याचा अर्थ मुख्य माणूस किंवा आपला राजा असा होतो. तेव्हापासून आपण सर्वजण त्यांना सरदार वल्लभभाई पटेल या नावाने ओळखू लागलो.

यानंतर अनेक आंदोलने सरदार वल्लभाई पटेल यांनी इंग्रजांविरोधात केली १९४२ मध्ये महात्मा गांधीजींच्या भारत छोडो आंदोलनामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपला पूर्णपणे सहभाग नोंदवला होता. त्यामुळे त्यांना तुरुंगवास सुद्धा भोगाव लागला होता. इसवी सन १९४७ पूर्वी म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारत देश ५८४ राज्यांमध्ये विभागला गेला होता. सरदार पटेल यांनी या राज्यांना एकत्र करून इंग्रजांबद्दल लढण्यासाठी बळ दिले.

भारतातील लोकांनी त्यांना पोलादी पुरुष म्हणजेच आयन मॅन ऑफ इंडिया ही उपाधी दिली. कारण त्यांनी भारतातील लोकांना पोलादाप्रमाणेच एकजूट करण्यासाठी प्रोत्साहन दिले. इसवी सन 1947 मध्ये स्वतंत्र भारताचे ते पहिले उपप्रधानमंत्री आणि गृहमंत्री बनले. तसेच त्यांनी आयपीएस आणि आयएएस स्थापन करण्यासाठी हातभार लावला. म्हणूनच त्यांना भारतीय सेवेचा संरक्षक असे म्हटले जाते.

१५ डिसेंबर १९५० रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सरदार वल्लभाई पटेल यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंतिम संस्कार साठी दहा लाखापेक्षा जास्त लोक आले होते. भारत देशासाठी केलेल्या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारत सरकारने १९९१ साली सरदार वल्लभाई पटेल यांना भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात आला. भारतामध्ये अनेक महाविद्यालय शिक्षण संस्था विद्यापीठे एक आठवण म्हणून त्यांच्या नावाने उघडण्यात आले आहेत.

स्टॅच्यू ऑफ युनिटी

३१ ऑक्टोबर २०१८ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हप्ता गुजरात मधील सरोवर बांध येथे नर्मदा नदीच्या तीरावर वसला आहे. या पुतळ्याची उंची साधारण १८२ मीटर (५९७ फूट ) एवढी आहे. या पुतळाला “स्टॅच्यू ऑफ युनिटी” म्हणजेच एकात्मतेचे प्रतीक असे म्हणतात.

भारतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल यांची माहिती , sardar vallabhbhai patel information in marathi , vallabhbhai patel information in marathi , sardar vallabhbhai patel biography in marathi , statue of unity  हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

1 thought on “सरदार वल्लभभाई पटेल यांची माहिती | sardar vallabhbhai patel information in marathi”

Leave a Comment