स्वामी समर्थ तारक मंत्र | swami samarth tarak mantra

स्वामी समर्थ तारक मंत्र | | swami samarth tarak mantra

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये स्वामी समर्थ तारक मंत्रबद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही स्वामी समर्थ तारक मंत्र , swami samarth tarak mantra याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

स्वामी समर्थ तारक मंत्र हा अतिशय उपयुक्त असा मंत्र असून, या मंत्राचे नियमित पठण केल्याने त्याचे फळ नक्कीच मिळते. हा मंत्र आपण रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर वाचावा. हा मंत्र सर्वच वयोगटातील लोकांसाठी नियमित जप करणाऱ्या व्यक्तीस फलदायी असून मनशांती , सदृढ आरोग्य लाभू शकते.

॥ श्री स्वामी समर्थ ॥

गुरु ब्रम्हा गुरुविष्णू गुरुः देवो महेश्वरा
गुरु शाक्षात परब्रम्हा तस्मै श्री गुरुवे नमः

निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना ।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना ।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।१।।

जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय ।
आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥२॥

उगाची भितोसी भय हे पळु दे, वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे ।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ।
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।। ३ ।।

खरा होई जागा श्रद्धेसहित,कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त ।
तू आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगु स्वामी देतील हात ।
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।४।।

विभूति नमननाम ध्यानाद तीर्थ, स्वामीच या पंचामृतात ।
हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती, ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ||५||

अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी

|| श्री स्वामी समर्थ ||

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला स्वामी समर्थ तारक मंत्र , swami samarth tarak mantra हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment