बिरसा मुंडा मराठी माहिती | birsa munda information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये बिरसा मुंडा यांच्या बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही बिरसा मुंडा मराठी माहिती , birsa munda information in marathi , बिरसा मुंडा निबंध मराठी , birsa munda bhashan marathi , बिरसा मुंडा भाषण मराठी , birsa munda marathi mahiti , birsa munda nibandh marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

बिरसा मुंडा मराठी माहिती | birsa munda information in marathi

बिरसा मुंडा मराठी माहिती | birsa munda information in marathi

बिरसा मुंडा हे भारताचे महान आदिवासी क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक होते. तो एक सुप्रसिद्ध आदिवासी लोकनायक आहे. १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंडमधील उलिहाटू येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुगना मुंडा आणि आईचे नाव कर्मी हातू होते.

झारखंड मधील अनेक लोक त्यांना देवाचा अवतार मनात असत. त्यांच्या गुरूंचे नाव जयपाल नाग होते आणि त्यांच्याकडूनच त्यांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले होते. ते अभ्यासात खूप हुशार होते. त्यांनी जर्मन मिशन स्कूलमध्ये प्रवेश घेतला. या शाळेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता.

एक सामान्य माणूस म्हणून त्याने बालपणीचे दिवस त्याच्या बालपणीच्या आदिवासी मित्रांसोबत घालवले होते. वयाच्या २५ व्या वर्षी ते स्वातंत्र्यसैनिक झाले आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधात उभे राहिले. त्यांच्या प्रतिभाशाली नेतृत्वामुळे आणि आदिवासी चळवळीमुळे जनमानसात ते लोकप्रिय झाले. त्यांनी “राणीचे राज्य संपवा आणि आमचे राज्य निर्माण करा” अशी प्रसिद्ध घोषणा दिली. त्यांची जयंती २०२१ पासून “जनजाती गौरव दिवस” ​​म्हणून साजरी केली जाते. त्यांचा वाढदिवस “झारखंड स्थापना दिवस” ​​म्हणूनही साजरा केला जातो.

त्यांच्या शाळेमध्ये आदिवासी समाजाची निंदा करण्यात आली म्हणून बिरसा मुंडा यांनी शाळेविरुद्ध बंड पुकारण्याचा इशारा दिला. त्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. छोटा नागपुर पठार येथील ब्रिटीशांच्या विरोधात आंदोलनात सहभागी झाले. ब्रिटिशांनी १८८२ साली बनवलेल्या वनकायद्याचा त्यानीं प्रखर विरोध केला. बिरसांच्या वाढत्या विरोधामुळे १८९५ साली सर्वप्रथम त्यांना अटक करण्यात आली.

ब्रिटिशविरोधामध्ये संघर्ष सुरु असताना जमीदाराकडून आदिवासी लोकांसाठी दिली जाणारी क्रूर वागणूक बघून त्यांनी जमीनदारा विरोधात सुद्धा प्रखर संघर्ष केला होता , म्हणूनच आदीवाशी समाज त्यांना देवाचा अवतार मनू लागला होता.

आदिवासींच्या नैसर्गिक संपत्तीवर पहिला अधिकार हा आदीवासी जनमानसाचा आहे , हे त्यांनी सर्वांना पटवून दिले. तो अधिकार मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयन्त करण्याची प्रेरणा त्यांनी सर्व आदीवासी बांधवांना दिली. या सर्व बाबी समजून सांगण्यासाठी त्यांनी अनेक गावातील आदिवासी बांधवांना एकत्र केले.

साथीच्या रोग आला असताना , त्यांनी गावोगावी जाऊन लोकांची सेवा केली. बिरसा मुंडा यांनी आदिवासी लोकांचे धर्मांतर मोठ्या प्रमाणात थांबवले. बिरसा मुंडा यांनी आदिवासी संस्कृती आणि परंपरेचे जतन करण्याची शिकवणूक आदीवासी लोकांना दिली.
त्यांनी आपल्या अनुयायांच्या इंग्रजांविरुद्ध लढण्याचे बळ दिले आणि या आंदोलनाला उल गुलाद असे म्हटले जाते.

त्यांनी आपल्या साथीदारांसह २४ डिसेंबर १८९९ रोजी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र आक्रमण केले. इंग्रजांच्या चौक्यांना त्यांनी लक्ष करून धनुष्यबाणाने आगीचे गोळे फेकले. समोरून ब्रिटिशांनी बंदुकीच्या गोळ्यांनी प्रतिउत्तर दिले. त्यामध्ये अनेक आदिवासी बांधवांचा मृत्यू झाले, तसेच काही लोक जखमी झाले. ३ मार्च १९०० साली ब्रिटिशांनी अटक केली , तसेच त्यांच्यासह त्यांच्या ५०० अनुयायांना सुद्धा बेड्या ठोकल्या. रांचीच्या तुरुंगात वयाच्या २५ व्या वर्षी ९ जून १९०० रोजी त्यांचा मृत्यू झाला.

तुरुंगात असताना ब्रिटिश सरकारने अनेक वेळा त्यांचा छळ केला. हैझा या रोगामुळे बिरसा मुंडा यांचा मृत्यू झाला असे ब्रिटिशांचे म्हणणे होते. पण ब्रिटिशांनीच त्यांची हत्या केली असे, अनेकांचे म्हणणे आहे.

बिहार, झारखंड, छत्तीसगडमध्ये लोक त्यांची देवाप्रमाणे पूजा करतात. एक भारतीय क्रांतिकारक म्हणून ते सदैव स्मरणात राहतील जे आजही भारतीय लोकांसाठी प्रेरणादायी आहेत.

उत्तर भारतात त्यांचे अनेक ठिकाणी पुतळे बांधण्यात आले आहेत. त्यांचा स्मरणार्थ झारखंड मधील रांची येथे भगवान बिरसा मुंडा स्मृति उद्यान सह स्वतंत्रता सेनानी संग्रहालय उभारण्यात आले आहे.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला बिरसा मुंडा मराठी माहिती , birsa munda information in marathi , बिरसा मुंडा निबंध मराठी , birsa munda bhashan marathi , बिरसा मुंडा भाषण मराठी , birsa munda marathi mahiti , birsa munda nibandh marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

2 thoughts on “बिरसा मुंडा मराठी माहिती | birsa munda information in marathi”

Leave a Comment