पाणी अडवा पाणी जिरवा प्रकल्प माहिती | pani adva pani jirva

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये pani adva pani jirva, पाणी आडवा पाणी जिरवा , पाणी अडवा पाणी जिरवा , पाणी आडवा पाणी जिरवा प्रकल्प , पाणी आडवा पाणी जिरवा प्रकल्प pdf , पाणी अडवा पाणी जिरवा प्रकल्प माहिती  याबद्दल माहिती सांगितली आहे. या माहितीच्या आधारे तुम्ही आपल्या घराजवळ किंवा गावामध्ये शेत तळे किंवा पाण्याची साठवण करू शकता.

पाणी अडवा पाणी जिरवा पर्यावरण प्रकल्प | pani adva pani jirva

पाणी अडवा पाणी जिरवा पर्यावरण प्रकल्प

कधी तुम्ही विचार केलाय जर आपल्या पृथ्वीवर पाण्याचा एक थेंबही उरला नसता किंवा दुष्काळामुळे सर्व नद्या विहिरी तलाव धरण या मधील पाणी आटले. तर काय होईल. असे झाले तर पृथ्वीवरील सर्व मनुष्य प्राणी पक्षी यांचे जीवन विस्कळीत होईल. तसेच पाणी मिळवण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागेल. पेट्रोल प्रमाणेच पाणी खरेदी करण्यासाठी आपल्याला खूप सारे पैसे मोजावे लागतील. म्हणून प्रत्येक पाण्याच्या थेंबाचे महत्त्व सर्वांना समजण्यासाठी आम्ही आपल्यासाठी जलसंधारण विषयी माहिती सांगणार आहोत.

पृथ्वीचा 70 टक्के भाग जरी पाण्याने व्यापला असला पिण्यास योग्य किंवा वापरासाठी अतिशय मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. जलसंधारण अस पाणी आडवा पाणी जिरवा असे संबोधले जाते. साधारण भारतामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पाऊस पडतो. या चार महिन्यांमध्ये पडणारे पावसाचे पाणी आपणास वर्षभर वापरावे लागते. ज्या भागात पाऊस कमी पडतो तिकडे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते. आपल्याला दररोज जेवण बनवण्यासाठी ,आंघोळीसाठी ,कपडे धुण्यासाठी तसेच पिण्यासाठी अशा अनेक गोष्टींसाठी पाण्याची गरज असते. त्याचप्रमाणे अनेक मोठ्या कंपन्या, खासगी संस्था , इस्पितळे इथेही मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते. चला तर मग आपण निर्धार करू या की आपण पाणी जपून वापर जेणेकरून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मोठे संकट उभे राहणार नाही.

पाणी अडवा पाणी जिरवा प्रकल्प ( पद्धत पहिली )

शेततळे

पावसाळ्यामध्ये आपल्या शेत जमिनीवरून वाहत जाणारे पाण्याचा वापर आपण खोदलेल्या तळ्यामध्ये निचरा केलेल्या तळ्याला ऐकत आहे असे म्हणतात. याच पाण्याचा वापर आपण जलसिंचनासाठी जनावरांसाठी पिण्यासाठी किंवा घरगुती वापरासाठी करू शकतो. अनियमित पडणाऱ्या पावसावर हा उत्तम असा उपाय आहे.

शेततळ्यासाठी जमिनीची निवड

जमिनीची निवड करताना जास्त खडकाळ असलेल्या जमिनीची निवड करू नये. असे केल्यास खोदकाम करण्यास सोपे जाईल. म्हणजे ज्या ठिकाणी पाणी देण्याचे प्रमाण कमी आहे अशा जमिनीची निवड करावी. शेततळ्याची खोली किती असेल याच्या अगोदर नियोजन करावे. शेततळ्या पासून च्या पाण्याचा प्रवाह निश्चित करावा. शेततळ्याचे क्षेत्रफळ आपल्या जमिनीचा जवळजवळ दोन ते अडीच टक्क्या पर्यंत असावे.
पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या ठिकाणाच्या जवळपास शेततळे बांधावे.

शेततळे कसे निर्माण करावे?

खाली दाखवल्या गेलेल्या आकृती प्रमाणे ज्या ठिकाणी शेततळे बनवायचे आहे तेथे ठरवलेल्या खोलीनुसार खोदून घ्यावे.

 • शेततळ्याच्या चारही भिंतींचा उतार 45 अंशाचा असावा.
 • खणून झाल्यावर चारी भिंतींना रोलिंग करून घ्यावे.
 • शेततळ्याच्या पृष्ठभागावर 500 मायक्रोन ची चांगल्या दर्जाची ताडपत्री अंथरावी.
 • ताडपत्री अंथरल्या नंतर कुठेही गळती होणार नाही याची काळजी घ्यावी.
 • ताडपत्री घालून झाल्यावर शेततळ्याच्या बाजूने दहा ते पंधरा किलो चे मातीचे पोते ठेवावे.
पाणी अडवा पाणी जिरवा प्रकल्प माहिती , pani adva pani jirva, शेततळे
pani adva pani jirva shet tale farm fond

शेततळ्याचे महत्त्व

जे शेतकरी आपल्या खेडेगावात राहतात किंवा डोंगराळ भागामध्ये मध्ये राहतात त्यांनी आपल्या शेतामध्ये शेततळे निर्माण केलेच पाहिजे. अशाप्रकारे जर आपण आपल्या शेतामध्ये शेततळे निर्माण केले तर पावसाचे पाणी वाहून न जाता तेथेच साठून राहील. त्यामुळे हे पाणी सभोवताली जमिनीमध्ये मुरण्यास मदत होईल. शेततळ्याच्या आजूबाजूला जर विहीर असेल तर हेच पाणी त्या विहिरीस पाझर फुटून मिळू शकते तसेच बोअरवेल मधील पाण्याची पातळी वाढविण्यास सुद्धा मदत होईल.

अनेक खेडेगावामध्ये एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये विहिरीचे पाणी आटून जाते. म्हणूनच जर आपण हे पाणी साठवून ठेवले तर मे महिन्यापर्यंत आपल्याला पाण्याची उणीव भासणार नाही.

पाणी आडवा पाणी जिरवा पर्यावरण प्रकल्प , pani adva pani jirva mahiti , shet tale
pani adva pani jirva shet tale farm fond

शेततळ्याचे फायदे

 • आपण जर शेततळ्यामध्ये पाणी साठवले तर जमिनीची धूप कमी होण्यास मदत होईल.
 • शेततळ्याचा मत्स्यसंवर्धनासाठी उपयोग करू शकतो.
 • शेती व्यतिरिक्त अन्य इतर कामांसाठी सुद्धा पाण्याचा वापर करू शकतो.
 • दुष्काळजन्य किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते.

शेततळ्याचे तोटे

 • आकारमानानुसार खर्च जास्त होऊ शकतो.
 • थोडेफार पाण्याचे बाष्पीभवन होऊन शेततळ्यामधील पाण्याची पातळी कमी होऊ शकते.

पाणी अडवा पाणी जिरवा प्रकल्प (दुसरी पद्धत)

पावसाच्या पाण्याची साठवण म्हणजेच rain water harvesting.
ज्या पृष्ठभागावर पावसाचे पाणी पडते, त्या पाण्याची साठवण करून आणि गाळून तेच पाणी इतर गोष्टीसाठी वापरले जाते.
याच पाण्याचा उपयोग आपण बगीचा फुलवण्यासाठी, पीक सिंचनासाठी, जनावरांसाठी, कपडे धुण्यासाठी , धुणी भांडी किंवा घरकाम करण्यासाठी वापरू शकतो. पण आपण जर या पाण्याचे निर्जंतुकीकरण केले असेल तर आपण ते पाणी पिण्यासाठी किंवा अंघोळीसाठी वापरू शकतो.

पाणी अडवा पाणी जिरवा , pani adva pani jirva, पाणी आडवा पाणी जिरवा , पाणी आडवा पाणी जिरवा प्रकल्प माहिती
pani adva pani jirva rain water harvesting

हे साठवण केलेले पाणी आपण जर आपल्या घरी लगत असलेल्या विहीर मध्येनकिंवा बोरवेल जवळ जिरावले तर त्या विहीर किंवा बोरवेलच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते.

घराच्या कौला वरून किंवा पत्र्या वरून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा प्रवाह एका पाईप मध्ये मार्गस्थ करावा.
जर आपण पाण्याचे शुद्धीकरण करणार असाल तर हा प्रवाहाचा पाईप शुध्दीकरण प्रकल्पा च्या अंतर्गत(inlet) प्रवाहाशी जोडावा.
शुद्धीकरणाच्या (outlet) बाहेरून जाणारा पाण्याचा प्रवाह पाण्याच्या टाकीमध्ये जोडावा.
अशा प्रकारचे पावसाच्या पाण्याचे जल शुद्धीकरण होऊन आपल्या पाण्याच्या टाकीमध्ये साठवले जाईल.

पाणी अडवा पाणी जिरवा फायदे

साधारणतः पाण्याच्या शुद्धीकरणासाठी लागणार खर्च जास्त असतो. म्हणून आपण हे पाणी पिण्यासाठी न वापरता इतर गोष्टीसाठी वापरले तर आपण हा प्रकल्प कमी खर्चा मध्ये राबवू शकतो.
या प्रकल्पासाठी तुम्हाला विहिरीवर अवलंबून राहायची गरज नसते.
जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.

पाणी अडवा पाणी जिरवा तोटे

जलशुद्धीकरणामुळे देखभालीचा खर्च वाढू शकतो.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला pani adva pani jirva, पाणी आडवा पाणी जिरवा , पाणी अडवा पाणी जिरवा , पाणी आडवा पाणी जिरवा प्रकल्प , पाणी आडवा पाणी जिरवा प्रकल्प pdf , पाणी अडवा पाणी जिरवा प्रकल्प माहिती  हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment