पाणी अडवा पाणी जिरवा निबंध | pani adva pani jirva nibandh

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये जलसंधारणा विषयी माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही पाणी अडवा पाणी जिरवा निबंध , pani adva pani jirva nibandh , पाणी वाचवा निबंध ,pani adva pani jirva nibandh in marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

पाणी अडवा पाणी जिरवा निबंध | pani adva pani jirva nibandh

पाणी म्हणजे जीवन होय. पृथ्वीवरील 70 टक्के भाग पाण्याने व्यापला आहे. या 70 टक्के पाण्यापैकी फक्त एक ते दोन टक्के पिण्यासाठी तसेच शेती योग्य आहे. पण त्यापैकी काही टक्केच मानवाला पाणी पिण्यायोग्य आहे. निसर्गाने मानवाला भरभरून दिलंय. पण माणूस त्या गोष्टींचा संवर्धन करण्यास सतत असमर्थ राहिला आहे. मनुष्याची तहान सुद्धा पाणीच भागवते. आपल्या शरीरात सुद्धा 60 टक्के पाणी असते. 

फक्त मनुष्य आलाच नाही तर प्राणी पक्षी व जनावरांना देखील स्वच्छ पाण्याची गरज भासते. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत आपल्याला उन्हाळ्यात करते. ज्याप्रमाणे अन्न , वस्त्र , निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत , त्याप्रमाणे पाणी हा जीवनाचा १ अविभाज्य भाग आहे. आपण २… ३ दिवस  जेवणा शिवाय राहू शकतो पण पाण्याविना एक क्षणही राहू शकत नाही. 

पाणीटंचाई (Water scarcity information in marathi)

सध्या अनेक शहरांमध्ये तसेच खेडेगावांमध्ये पाणीटंचाई ही प्रमुख समस्या उद्भवली आहे. पाणी टंचाईचे प्रमुख कारण म्हणजे वाढती लोकसंख्या, अपुरा पाऊस तसेच पाण्याच्या वापरात केलेल्या निष्काळजीपणा होय. आजही महाराष्ट्रातील अनेक खेडेगावांमध्ये एप्रिल व मे महिन्यामध्ये पाणीटंचाई निर्माण होते. अनेक विहिरी तसेच नद्या पाऊस पडतात. महिलांना मैलोनमैल पाण्यासाठी वणवण करावी लागते.

जर पाणी टंचाई निर्माण झाली तर जलविद्युत प्रकल्प किंवा औष्णिक वीज निर्मिती केंद्र बंद पडतील. असे झाल्यास वीजपुवठा खंडित होईल. अनेक पाण्याच्या
अभावामुळे बरेच कारखाने , उद्योगधंदे बंद पडतील आणि जनजीवन विस्कळीत होईल .

पाणी आडवा पाणी जिरवा निबंध , pani adva pani jirva nibandh , पाणी वाचवा निबंध ,pani adva pani jirva nibandh in marathi

पाण्याचे प्रदूषण (Water pollution information in marathi)

कारखान्यातून बाहेर पडणारे दूषित पाणी पाणी अनेकदा नदीच्या पात्रात सर्रासपणे सोडले जाते. अशा पाण्याचा मनुष्य किंवा प्राण्यांची संबंध आला तर गंभीर स्वरूपाचे आजार उद्भवू शकतात. यासाठी आपण प्रत्येकाने जागरूक राहायला हवे. अशा प्रकारे पाण्याचे प्रदूषण आढळल्यास त्वरित जवळील अधिकार्यांशी संपर्क साधून त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे.
वेळीच आपण पाण्याचे प्रदूषण थांबले नाही तर आपणास पिण्यास पाणी मिळण्यासाठी मुश्कील होऊ शकते.
पालापाचोळा तसेच फुलांचे निर्माल्य नदीच्या पात्रात किंवा तळ्यामध्ये टाकू नये. जास्तीत जास्त पर्यावरण पूरक गोष्टींचा वापर करावा त्यामुळे जल प्रदूषण रोखण्यास मदत होईल.

पाण्याचे बाष्पीभवन (Evaporation of water information in marathi)

जागतिक तापमान वाढीमुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. त्यामुळे नदी पात्रातील समुद्रातील किंवा धरणातील पाण्याची पातळी खालावत जाते.

जलसंधारण (Water conservation information in marathi)

आपल्याला प्रत्येक गावांमध्ये पाणी संवर्धन किंवा जलसंवर्धन यासारखे प्रकल्प राबवणे अतिशय गरजेचे आहे. त्यास पाणी अडवा आणि पाणी जिरवा असे म्हणतात. यामध्ये आपण पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता मोठ्या आकाराचे खड्डे करून त्यामध्ये साठवली जाते. याच पाण्याचा उपयोग आपण शेती साठी पिण्यासाठी किंवा सर्व कामे करण्यासाठी वापरू शकतो.
पडणाऱ्या पावसाचा थेंब अन् थेंब जर आपण साचवून ठेवला तर आपले पुढचे आयुष्य सुखकर व समृद्ध होईल.

शेत तळ्याची निर्मिती (farming pond)

डोंगर भागातील लोकांनी किंवा आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेततळे निर्माण केले पाहिजेत. शेततळे करून जातीतजास्त पाणी आपल्या सभोताली जमिनीमध्ये मुरवयाला पाहिजे. जर हे पाणी जमिनीमध्ये मुरला तर आपल्या शेताच्या आजूबाजूला विहीर असेल तर हे पाणी विहिरीला उमाळे च्या माध्यमातून मिळू शकता किंवा पाझर फुटून मिळू शकते.

आपल्या सभोवताली मोठे खड्डे करून जर आपण पाणी साठवला तर हेच पाणी आपण २ ते ३ महिने सहज वापरू शकतो. त्यामुळे हे पाणी जास्तीतजास्त खोलवर जाईल त्यामुळे आपल्या जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल. जर आपण जमिनीतील पाण्याची पातळी वाढवली तर आपल्या पंचकृषीमध्ये आजू-बाजूला मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध होईल .

आपल्या शेतामध्ये जर विहीर असेल तर साधारण ५०-२०० फुटावरती छोटे छोटे खड्डे काढायला पाहिजेत. ज्यामध्ये किमान २०००-३००० हजार लीटर पाणी दर दोन -तीन दिवसाला साठू शकता. हेच साठलेले पाणी जमिनीमध्ये जाईल आणि जेव्हा पाऊस थांबेल तेव्हा तुमच्या विहिरीला किंवा बोरवेल ला पाण्याचा साठा मिळण्यास मदद होईल.

बऱ्याच वेळेला आपल्या असे निदर्शनास येते कि मे महिन्यामध्ये आपल्या विहिरीला पाणी उपलब्ध नसते. म्हणूनच आपण हे पाणी जर आताच साठवला तर मे महिन्यामध्ये आपल्याला पाण्याची अशी गैरसोय पाहण्यास मिळणार नाही . त्यामुळे माझी विनंती राहील , खासकरून शेतकऱ्यांना तसेच ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडत नाही अश्या लोकांना कि तुमच्या बाजूला जे काही नद्या नाले असतील तेथे छोटे-छोटे खड्डे तयार करून पाऊसाचे पाणी जिरवण्यासाठी उपाय योजना करावी.

पाण्याची नासाडी (Waste of water information in marathi)

माझा पण पाणी वाचवले तरच आपल्या पुढच्या पिढ्या जगू शकतील आणि त्यांच्या साठी मुबलक प्रमाणात पाणी राहील. त्यामुळे प्रत्येकानेच आंघोळ करताना, गाडी धुताना किंवा जनावरांना आंघोळ घालताना गरजेपुरतच आणि काळजीपूर्वक वापरावे.

पाणी फाउंडेशन (paani foundation information in marathi)

पाणी फाऊंडेशन ही संस्था आहे जी पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेमध्ये अग्रेसर आहे. या मोहिमेस उत्तेजन देण्यासाठी पाणी फाउंडेशन दरवर्षी अनेक खेडेगावांमध्ये स्पर्धा भरवतात. त्यांनी अनेक मोहिमेअंतर्गत काही गावांचा कायापालट केला आहे. तसेच वर्षानुवर्षे पाणीटंचाईमुळे आणि दुष्काळामुळे त्रासलेल्या अनेक गावांना सुखी व समृद्ध बनवले आहे. या मोहिमेअंतर्गत खेडे गावातील सर्व ग्रामस्थांना त्यांनी एकत्रित केले आणि आणि श्रमदान करण्यास प्रवृत्त केले.

त्याचप्रमाणे खालीलपैकी संस्था सुद्धा पाण्याच्या जलसंधारांसाठी कार्यरत आहेत
नीर फाउंडेशन
जल भागीरथी
तहान

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला पाणी अडवा पाणी जिरवा निबंध , pani adva pani jirva nibandh , पाणी वाचवा निबंध ,pani adva pani jirva nibandh in marathi  हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

1 thought on “पाणी अडवा पाणी जिरवा निबंध | pani adva pani jirva nibandh”

Leave a Comment