मी डॉक्टर झालो तर मराठी निबंध | mi doctor zalo tar marathi nibandh

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये आपले वैद्य किंवा देवदूत म्हणजेच डॉक्टरांवर निबंध लिहला आहे. ही माहिती तुम्ही मी डॉक्टर झालो तर मराठी निबंध (mi doctor zalo tar marathi nibandh), मी डॉक्टर होणार मराठी निबंध (mi doctor honar marathi nibandh), मी डॉक्टर बोलतोय मराठी निबंध (mi doctor boltoy marathi nibandh) मी डॉक्टर झालो तर निबंध इन मराठी (mi doctor zalo tar nibandh in marathi) याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

मी डॉक्टर झालो तर मराठी निबंध | mi doctor zalo tar marathi nibandh

नेहमीप्रमाणे मी शाळेत जात होतो. रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या एका गरीब माणसाकडे माझी दृष्टी पडली. माझ्या असे लक्षात आले की त्याच्या पायाला दुखापत झालेली आहे. मी त्यांना डॉक्टर कडे जाण्याचा सल्ला दिला.

पण त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने मुळे डॉक्टर कडे जाऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले. त्या दिवसापासून मी असा निर्धार केला की मी मोठा झाल्यावर डॉक्टरच होईन आणि गरिबांची मदत करेन.

डॉक्टर झाल्यावर मी गरीबांची तसेच रंजल्या-गांजल्याची मोफत पणे सेवा करेन. तसेच इतर डॉक्टरांनाही अशीच मोफत सुविधा देण्यास प्रवृत्त करेन.

गरीब रुग्णांसाठी इस्पितळ

सर्व सुविधांनी उपयुक्त असे इस्पितळ उभारेन. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये लाखो आणि हजारो पैसे घेतले जातात. ज्या गरीब व्यक्ती इतके पैसे देण्यास असमर्थ असतील त्यांच्यासाठी आमच्या इस्पितळातून माफक दरात किंवा कमी पैशात सेवा उपलब्ध करून देईन.

वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र

मी डॉक्टर झालो तर वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करीन. या महाविद्यालयातून आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले जाईल. अशाप्रकारे आपण उत्कृष्ट दर्जाचे डॉक्टर , परिचारिका तसेच वैद्यकीय सल्लागार घडवू शकतो.

मी डॉक्टर झाल्यावर वैद्यकीय संशोधन केंद्राची स्थापना करीन. या संशोधन केंद्रावर आपण अधिकाधिक वैद्यकीय संशोधकांना संशोधन करण्यास प्रोत्साहन तसेच मदत करू शकतो. अशाप्रकारे आपल्या देशाच्या प्रगतीस हातभार लागेल.

प्रौढ नागरिकांसाठी तसेच गर्भवती महिलांसाठी वेगळ्या कक्षाची स्थापना करेन. मी बांधलेल्या इस्पितळामध्ये जगातील विख्यात शल्यविशारद , शल्यचिकित्सक तसेच ख्यातनाम डॉक्टरांचा हातभार लावण्यास सर्वतोपरी प्रयत्न करेन.

टीव्ही वर चालणाऱ्या कार्यक्रमा मार्फत देशातील अनेक रुग्णांशी थेट संपर्क साधेन तसेच त्यांच्या रोगांवर मार्गदर्शन करेन.
सर्वांना नियमित व्यायाम, प्राणायाम तसेच सूर्यनमस्कार करण्यास प्रवृत्त करेन. असल्या मुळे निरोगी व सुदृढ आयुष्य जगण्यास मदत होईल.

सामाजिक बांधिलकी व प्रबोधन

कॅन्सर एड्स अशा अनेक गंभीर आजारांवर मार्गदर्शन शिबिर घेईन. समाजातील अनेक डॉक्टर तसेच तरुणांना एकत्र करून दर तीन महिन्यातून एकदा तरी रक्तदान शिबिर घेईन. त्यामुळे आपल्या देशातील रक्त पेढ्यांचे सामर्थ्य अजून वाढेल. असे केल्यास कोणासही रक्ताची कमतरता भासणार नाही आणि सहज उपलब्ध होण्यास मदत होईल. धूम्रपान , मद्यपान तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन कोणत्याही नागरिकाने करू नये यासाठी लोक जागरण करेन.   

आपल्या समाजामध्ये महाविद्यालयांमध्ये किंवा शाळेमध्ये तसेच सोसायटीमध्ये स्वच्छते बद्दल लोकांना व विद्यार्थ्यांना जागरूक करेन. अशाप्रकारे आपला परिसर स्वच्छ ठेवल्याने कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल व साथीचे रोग पसरणार नाहीत.

रुग्णांसाठी दिवसाचे चोवीस तास उपलब्ध राहण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन. रुग्णांना जास्त फी आकारून लुबाडणार नाही. तसेच चुकीचे वैद्यकीय मार्गदर्शन करणार नाही. तसेच रुग्णांचे कोणत्याही सेवाभावी हाल होणार नाहीत याकडे लक्ष देईन. डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबण्यासाठी योग्य त्या कायद्यामध्ये तरतुदी करण्यात याव्यात यासाठी शासनाकडे पाठपुरावा करेन.

आपल्या सेवेत निष्काळजीपणा करणार्‍या डॉक्टरांना विरोध करेन आणि रुग्णांच्या पाठीशी उभा राहीन. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय कुठली ही औषधे किंवा गोळ्या घेऊ नयेत याविषयी मार्गदर्शन करेन. बोगस डॉक्टरांच्या फसवणुकी पासून जनजागृती कारेन तसेच औषधांचा काळा बाजार रोखण्यास प्रयन्तशील राहीन

अवयव दानावर भर

माझ्या मृत्युनंतर मी माझे सर्व अवयव दान करीन. यामुळे अवयव मिळालेल्या रुग्णांना नवीन आयुष्य मिळेल. असे केल्याने समाजापुढे नवीन आदर्श निर्माण होईल.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला मी डॉक्टर झालो तर मराठी निबंध (mi doctor zalo tar marathi nibandh), मी डॉक्टर होणार मराठी निबंध (mi doctor honar marathi nibandh), मी डॉक्टर बोलतोय मराठी निबंध (mi doctor boltoy marathi nibandh) मी डॉक्टर झालो तर निबंध इन मराठी (mi doctor zalo tar nibandh in marathi) हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment