राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माहिती | tukadoji maharaj information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माहिती , tukadoji maharaj information in marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माहिती | tukadoji maharaj information in marathi

तुकडोजी महाराजांचे संपूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे असे होते. एकदा राष्ट्रपती भवनात त्यांचे खंजिरी भजन होते ते ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधित केले. तेव्हापासून ते राष्ट्रसंत म्हणून सुप्रसिद्ध झाले. तुकडोजी महाराजांचा जन्म ३० एप्रिल १९०९ रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोजी तर आईचे नाव मंजुळाबाई होते. त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी त्यांचे माणिक हे नाव बदलून तुकडोजी असे नाव ठेवले.

विदर्भात त्यांचे विशेष फिरणे होत असले तरी महाराष्ट्राभर नव्हे तर देशभर हिंडून सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करत होते. जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. भारत छोडो आंदोलन दरम्यान त्यांना अटक देखील झाली
होती.

भारत खेड्यांचा देश आहे त्यामुळे राष्ट्राचा विकास करावयाचा असेल तर गावांचा विकास झाला पाहिजे असे त्यांचे मत होते. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. भोळेपणा, अंधश्रद्धा, जातीभेद हे सर्व नष्ट झाले पाहिजे असे त्यांना नेहमी वाटत असे.

सर्वधर्मसमभाव, सबल महिला व तरुण आणि अध्यात्मिक विकास हे समाज सशक्त करणारे त्यांचे निकष होते. आपल्या आश्रमातुन त्यांनी अनेक लोकहिताची कामे केली. देशातील युवा आणि स्त्रिया यांचे राष्ट्र विकासातील योगदान याबद्दल ते नेहमी आपल्या कीर्तनातून प्रबोधन करत असत.

“हर देश मे तू, हर वेश मे तू, तेरे नाम अनेक तू एक ही है” ही शिकवण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाजाला दिली. आपल्या देशव्यापी सामाजिक कार्यामुळे ते राष्ट्रसंत सुप्रसिद्ध झाले. त्यांनी अंधश्रद्धा आणि जातिभेद नष्ट करण्यासाठी कीर्तनाच्या प्रभावी वापर केला. तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता नावाचा काव्यग्रंथ लिहिला.

खंजिरी भजन हा प्रकार वापरून त्यांनी खेडोपाड्यातील लोकांचे प्रबोधन केले. तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे असे होते. त्यांचा गुरुचे नाव आडकोजी असे होते. तुकडोजी महाराजांचे मराठी व हिंदी भाषेवर प्रभुत्व होते. ते आधुनिक काळातील महान संत होते.

ग्रामगीता हा त्यांनी लिहलेला ग्रंथ खूपच प्रसिद्ध आहे. तुकडोजी महाराजांनी मराठी आणि हिंदी भाषेत विपुल लेखन केले. तुकडोजी महाराज ३१ ऑक्टोबर १९६८ रोजी मोझरी जिल्हा अमरावती येथे निधन पावले. अशा या महापुरुषास मानाचा मुजरा.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माहिती , tukadoji maharaj information in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment