कर्मवीर भाऊराव पाटील माहिती | karmaveer bhaurao patil information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही कर्मवीर भाऊराव पाटील माहिती , karmaveer bhaurao patil information in marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

भाऊरावांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी २२ सप्टेंबर १८८७ मध्ये एका जैन कुटूंबात झाला. त्यांचे वडिल इस्ट इंडिया कंपनीत लिपिक म्हणून नोकरीस होते. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. त्यांच्या पणजोबांचे नाव देवगौडा, वडिलांचे नाव पायगौडा तर आईचे नाव गंगाबाई असे होते.

ते एक महान समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. समाजातील सर्वात गोरगरीब मुलांना देखील शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ ही अभिनव योजना सुरू करून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा आशेचा किरण निर्माण केला.

महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे ते एक सदस्य होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही ते सहभागी होते. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा महाराष्ट्रभर प्रसार केला.

भाऊराव पाटील हे बहुजनांमध्ये एवढे एकरूप झाले की ते जन्माने जैन होते, हे अनेकांना माहीतही नाही. पाटील हे आडनाव भाऊरावांच्या घराण्याला पूर्वीपासूनच प्राप्त झाले होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व जातीभेदाच्या पलीकडे होते. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता याचेसंस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्या हॉस्टेल मध्ये विविध जाती-धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत. ते सर्व एकत्र स्वयंपाक करत आणि एकत्रच जेवण करत यातून भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना बंधू भावाची शिकवण दिली.

महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती.

भाऊराव अण्णांच्या कार्याचा आढावा

भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’, ‘श्रम करा व शिका’ हा मंत्र विद्यार्थ्यांना दिला. कर्मवीर भाऊराव पाटील हे जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते.

सातारा जिल्ह्यातील काले या गावी दिनांक ४ ऑक्टोबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.

भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.

२५ फेब्रुवारी १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस असे नामकरण केले गेले.

१६ जून १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.

भाऊरावांनी महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल सुरू केले.

इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेजची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना केली.

शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इ.स. १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला कर्मवीर भाऊराव पाटील माहिती , karmaveer bhaurao patil information in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment