नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये संत बसवेश्वर यांच्या बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही संत बसवेश्वर माहिती मराठी , basaveshwar information in marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.
संत बसवेश्वर माहिती मराठी | basaveshwar information in marathi
महात्मा बसवेश्वर यांना आद्य भारतीय समाजसुधारक व युगपुरुष मानले जाते. त्यांच्या जन्मकाळ व ठिकाण याबद्दल मतभेद आहेत. ११०५ मध्ये कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात इंगळेश्वर-बागेवाडी या गावात बसवेश्वरांचा जन्म झाला. वैशाख महिन्यात अक्षय तृतीयेस त्यांचा जन्म झाला असे मानले जाते. ते कर्मठ विधींचा कडवा विरोध करत असत. ते वयाच्या आठव्या वर्षी घर सोडून कूडलसंगम येथे निघून गेले.
तेथे एक भव्य अध्ययन केंद्र होते. वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्त्वज्ञान बसवेश्वरांनी तेथे बारा वर्षे इत्यादींचा अभ्यास केला. तद्नंतर त्यांचा विवाह झाला व ते सोलापुरातील मंगळवेढा येथे एकतीस वर्षे राहिले.
तिथेच त्यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली व ते धर्मप्रसारासाठी श्रवणबेळगोळा, बसवकल्याण या कर्नाटकातील प्रदेशांत आले. याठिकाणी लिंगायत धर्म विस्तारित होऊ लागला बसवेश्वरांनी शिव हा एकमेव ईश्वर असून शिव उपासनेचा पुरस्कार केला. ते कूडलसंगम येथील संगमेश्वराचे नितांत साधक होते.
ओम नमः शिवाय हा सहाक्षरी मंत्र त्यांचा प्रिय मंत्र होता. त्यांनी दया, अहिंसा, सत्य, सदाचार, नीती, शील इत्यादींचा प्रचार केला. एकाच देवाची भक्ती करा, भूतदया बाळगा, प्रेमाने वागा, परोपकार करा अशी त्यांची शिकवण होती. अशा या महान विभूतीस विनम्र अभिवादन.
धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला संत बसवेश्वर माहिती मराठी , basaveshwar information in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.