सी वी रमन यांची माहिती | C V raman information in marathi
नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये सी वी रमन यांच्या बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही सी वी रमन यांची माहिती , C V raman information in marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.
सी. व्ही. रामन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथे झाले. त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रामन असे होते. हिंदू तमिळ ब्राह्मण कुटुंबात ते लहानाचे मोठे झाले. त्यांच्या आईचे नाव पार्वती तर पत्नीचे नाव लोकासंदरी असे होते. त्यांना चंद्रशेखर व राधाकृष्णन नावाची दोन अपत्ये होती.
सेंट अलॉयसियसच्या अँग्लो-इंडियन हायस्कूलमधून त्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. मद्रास विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्र पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला. त्यांनतर त्यांना IAAS संशोधन संस्थेत स्वतंत्र संशोधन करण्याची परवानगी मिळाली.
सी. व्ही रामन यांनी आयुष्यभर दगड व अन्य खनिज पदार्थांचा संग्रह जमा केला. खनिजांच्या विकिरणाच्या गुणधर्मांचा अभ्यास केला. यासाठी त्यांना काही साहित्य देशभरातून व विदेशातून भेट म्हणून मिळाले. नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी ते अनेकदा लहान हाताळण्याएवढा स्पेक्ट्रोस्कोप घेऊन जात असत.
त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी प्रकाश विखुरल्याची एक अभिनव घटना शोधून काढली. हा शोध जगभरात रामन इफेक्ट म्हणून ओळखला जातो. यासाठी त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्र मधील सर्वोच्च नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारतर्फे दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.
त्यांनी संशोधन संस्था स्थापन करून आपले संशोधनाचे कार्य अविरत सुरु ठेवले. त्यांना देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने देखील गौरविण्यात आले. त्यांच्या अद्वितीय अशा संशोधन कार्यामुळे आंतरराष्ट्रीय लेनिन शांतता पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यात आला. 21 नोव्हेंबर 1970 रोजी बंगळूर येथे वयाच्या 82व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला सी वी रमन यांची माहिती , C V raman information in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.