भरलं वांग रेसिपी | Bharli Vangi recipe in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये एक नाविन्यपूर्ण भरलं वांग रेसिपी ( Bharli Vangi recipe in marathi) दिली आहे.  भरलं वांग रेसिपी (Bharli Vangi recipe in marathi ) ही रेसिपी तुम्ही आपल्या घरी नक्की बनवण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट करून कळवा.

भरलं वांग रेसिपी | Bharli Vangi recipe in marathi

भरलं वांग रेसिपी | Bharli Vangi recipe in marathi

भरलं वांग रेसिपी साहित्य | Bharli Vangi recipe ingredients in marathi

 • 1/4 कप कोरडे किसलेले खोबरे
 • 2 – 3 चमचे भाजलेले शेंगदाणे पावडर
 • 3 – 4 लसूण पाकळ्या
 • १/२ कप ताजी कोथिंबीर
 • ५ – ६ वांगी
 • २ चमचे तेल
 • १/२ कप बारीक चिरलेला कांदा.
 • हळद पावडर
 • लाल तिखट
 • गरम मसाला
 • 1 टीस्पून धने पावडर
 • १/२ ग्लास पाणी
 • चवीनुसार मीठ
 • 1/2 टीस्पून गूळ / गुळ (पर्यायी)

भरलं वांग रेसिपी कृती | Bharli Vangi recipe procedure in marathi

 • ब्लेंडरच्या भांड्यात कोरडे खोबरे, शेंगदाणे पावडर, लसूण आणि कोथिंबीर घ्या. आवश्यक असल्यास थोडेसे (2/3 चमचे) पाणी घाला. त्याचे वाटण करून घ्या.
 • वांग्यांना मध्यभागी फुलली च्या आकारामध्ये छेद देऊन मिश्रण भरण्यासाठी जागा तयार करा.
 • वांग्यांना मधोमध पूर्णपणे कापू नका. वांगी कापत असताना आत मधून व्यवस्तिथ आहेत याची खात्री करून घ्या.
 • त्यानंतर वांग्यामध्ये मसाला भरून घ्या.
 • मध्यम आचेवर तवा गरम करा आणि त्यावर तेल टाका.
 • तेल पुरेसे गरम झाल्यावर कांदा घाला. सुमारे ४-५ मिनिटे कांदा लालसर रंग होईपर्यंत तळा.
 • तव्यावरील मिश्रणामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला , धणे पावडर घाला आणि चांगल्या प्रकारे मिसळून घ्या.
 • हे मिश्रण २-३ मिनिटे शिजवा आणि परतून घ्या.
 • अगोदर केलेले वाटण तव्यावरील मिश्रणामध्ये घाला. पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्स करून ३-४ मिनिट परतून घ्या.
 • तव्यावरील मिश्रणामध्ये भरलेली वांगी घाला. त्यानंतर फक्त 2-3 मिनिटे शिजवा आणि झाकून ठेवा.
 • त्या मिश्रणामध्ये अर्धा ग्लास पाणी , मीठ चवीनुसार, अर्धा चमचा गूळ (पर्यायी) घाला.
 • हे मिश्रण छान प्रकारे ढवळून घ्या.
 • त्यानंतर झाकण ठेवून मध्यम आचेवर ७ ते ८ मिनिटे शिजवा.
 • झाकण काढा आणि सर्व वांगी दुसऱ्या बाजूने पलटून घ्या.
 • झाकण ठेवून आणखी ५-६ मिनिटे शिजवा.
 • झाकण काढा. चांगले मिसळा. काटेरी चमच्याने वांगी शिजली आहेत का ते तपासा.
 • गॅस बंद करा. भरले वांगे तयार आहेत.
 • भरला वांगे चपाती, रोटी किंवा फुलकासोबत आपण खाऊ शकतो. त्याचप्रमाणे भाताबरोबरही देखील खाऊ शकतो.

धन्यवाद खवय्यांनो. जर आपल्याला भरलं वांग रेसिपी ( Bharli Vangi recipe in marathi ) हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment