प्रतापगड किल्ला मराठी माहिती | pratapgad fort information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये प्रतापगड किल्लाबद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही प्रतापगड किल्ला मराठी माहिती , pratapgad fort information in marathi, pratapgad killa chi mahiti याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

प्रतापगड किल्ला मराठी माहिती | Pratapgad fort Information In Marathi

प्रतापगड किल्ला मराठी माहिती | Pratapgad Fort Information In Marathi

प्रतापगड किल्ला हा स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला मानला जातो. अफझल खानाचा वध हा ऐतिहासिक प्रसंग आपणास माहिती आहेच , त्या प्रसंगाची साक्ष देणारा किल्ला म्हणजे प्रतापगड. प्रतापगड किल्ला हा पुणे शहरापासून १५० किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला सातारा शहरापासून ८७ किलोमीटर अंतरावर , तर समुद्रसपाटीपासून सुमारे ३५५६ फूट उंच आहे. प्रतापगडा जवळील वाहन तळावरून गडाच्या दक्षिणेकडील टेहळणी बुरुजाकडून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्यावेळातच तटबंदीत लपवलेल्या पश्चिमाभिमुख दरवाजापर्यंत येऊन पोहोचतो.

वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रीतीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो आणि सूर्योदयापूर्वी उघडला जातो. ह्या दरवाज्यातून आत गेले की उजव्या हाताला चिलखती बांधणीचा बुरुज दिसतो. हा बुरुज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येईल.

मंदिरात भवानी मातेची सालं करून प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शालिग्रामची शीळा आणून त्यातून घडवली होती. त्या मूर्ती शेजारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नित्य पूजेतील स्मृतीकाचे शिवलिंग तसेच सरसेनापती श्री हंबीरराव मोहिते यांची तलवार देखील आहे. या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थ स्थापित हनुमानाची मूर्ती दिसते. पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो.

मंदिरात भव्य शिवलिंग आहे. या मंदिरा शेजारी प्रशस्त सदर आहे. किल्ल्याच्या बुरुजावरून आजूबाजूला पाहिले असता मोठं मोठया पर्वतरांगा दिसतात आणि या प्रत्येक पर्वतांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाऊंच्या वाड्याचे अवशेष आहेत. तेथे उजवीकडे बगीच्याच्या मधोमध शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आहे. या पुतळ्याच्या जागी पूर्वी राजांचा राहता वाडा होता. त्या पुतळ्याशेजारी शासकीय विश्रामगृह असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोऱ्याचे विहंगम दृश्य केले.

अफजलखानाने दगा केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला ठार मारले. नंतर संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शीर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानी मंदिरात सभा मंडप व नगरखाना आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. प्रतापगड १४०० फूट लांब आणि ४०० फूट रुंद आहे. इतर गडापेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे. वायव्येकडील तटबंदी आठशे फुटावून अधिक उंच आहे, तर त्यातल्या बालेकिल्ल्याच्या ईशान्येला दोन तळी आहे.

तिथून कोयनेचे खोरे अतिशय सुंदर दिसते आणि इथे किल्ल्याची फेरी पूर्ण होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखी खाली प्रतापगडाचे बांधकाम इसवी सन १६५६ ला पार पडले. इसवी सन १६५६ ते इसवी सन १८१८ काही महिने सोडल्यास हा किल्ला शत्रूपासून अभेद राहिला आहे. १७ फुटांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन इसवी सन १९५७ साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले.

मुबंई आणि आसपासच्या परिसरातील पर्यटकांना पोलादपूर मार्गे, तर पुणे आणि जवळील परिसरातील पर्यटकांना महाबळेश्वर मार्गे प्रतापगडावर जाता येते. आजही प्रतापगडावरती शिवप्रताप दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीमधून ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला प्रतापगड किल्ला माहिती मराठी , प्रतापगड किल्ला मराठी माहिती, pratapgad fort information in marathi , pratapgad killa chi mahiti हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment