हंबीरराव मोहिते यांची माहिती | hambirrao mohite information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये हंबीरराव मोहिते यांच्याविषयी माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही हंबीरराव मोहिते , hambirrao mohite in marathi , hambirrao mohite history in marathi , hambirrao mohite history in marathi , hambirrao mohite marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

हंबीरराव मोहिते यांची माहिती | hambirrao mohite information in marathi

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांबद्दल हंबीररावजी पंजोबा रतोजी कोरडे यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजवला होता. त्यांना निजामशाही ने बाजी हा किताब दिला होता. मोहिते घरातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावाची पाटील की सांभाळत होते.

त्या घराण्याने घाटके आणि घोरपडे घराण्याची सोयरीक जुळून आणली. याच दरम्यान शहाजी राजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येऊन धारोजी शहाजीराजे यांच्या लष्करात सामील झाले.

धारोजी मोहिते व संभाजी मोहिते त्या काळातील पराक्रमी सेनानी होते. त्यांच्या शौर्याची गाथा आदिलशाही फर्मनामध्ये मध्ये पहावयास मिळतात.

स्वराज्य स्थापनेच्या वेळी संभाजी कोरडे हे शहाजीराजे यांच्या लष्करात हवालदार होते. ते पुढे कर्नाटकाला गेले. त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह शिवाजी राजे यांच्याशी लावून दिला. अश्याप्रकारे भोसले घराण्याशी पुन्हा नाते निर्माण केले.

संभाजी मोहिते यांचा मुलगा हंबीरराव मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई तिचा विवाह शिवाजी महाराजांचा दुसरा पुत्र राजाराम महाराज यांच्याशी लावून दिला. त्यामुळे मोहिते घराणे व शिवाजी महाराजांचे अगदी जवळचे घराणे झाले.

संभाजी मोहिते चा मुलगा म्हणजेच हंसाजी उर्फ हंबीरराव मोहिते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमले.

बल्लोल खानाशी लढताना सरसेनापती प्रतापराव गुजर २४ फेब्रुवारी १६७४ रोजी मरण पावल्याने  हंबीरराव यांची त्यांच्या जागी नेमणूक झाली. महाराजांच्या तृतीय पत्नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हंबीरराव यांची कन्या मारणे ताराबाई या राजाराम महाराज यांच्या पत्नी होत्या.

ज्यावेळी सरसेनापती प्रतापराव गुजर पडल्याचे कळाले तेव्हा हंबीरराव यांनी आदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला. शत्रूला विजापूरपर्यंत पळवून लावण्यात हंबीरराव यांचे मोठे योगदान आहे.

शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मुघल सुभेदार दिलेरखान व बहादूर खान यांच्या छावण्यांवर हल्ला करण्याचा आदेश हंबीरराव यांना दिला. ही स्वारी यशस्वी करून त्यांनी खानदेशातील मोघलांचा खानदेश, बागलाल , गुजरात, बुऱ्हाणपूर ,वऱ्हाड , माहूड , वरकड पर्यंतच्या प्रदेशात धुमाकूळ घातला.

यानंतर सन १६७६ मध्ये सेनापती हंबीररावांनी कर्नाटक येथील कोप्पल आदिलशाही पठाणी सरदार हुसैन खान मियाण
याचा एलबुर्गा येथे मोठा पाडाव करून त्यांच्या जुलामातून रयतेची मुक्तता केली.

सरसेनापती हंबीरराव यांच्या तलवारीची कमाल याविषयीचे वर्णन बखरीतून आलेले आहे. अशीच एक तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात आहे. तिच्यावर सात चरे पाडलेले आहेत. त्या तलवारीवर कान्होजी मोहिते हंबीरराव अशी अक्षरे सोन्यामध्ये कोरली आहेत. याचा अर्थ असा कि , तलवार हंबीरराव मोहिते यांची नसून हंबीरराव किताब असणाऱ्या कान्होजी मोहिते यांची आहे.

परंतु , जनमानसात असा समाज आहे की , तलवार सरसेनापती हंबिराव मोहिते यांची आहे. हुसेन खान ला  कैद करून सेनानी धनाजी जाधव व सरसेनापती हंबिराव मोहिते हे महाराजांना गोवळकोंड्यात भागानगर येथे येऊन मिळाले.

यानंतर महाराजांना आपले बंधू सामपोचाराने चांगले संबंध प्रस्थापित करायचे होते. पण यंकोजींची भेट यशस्वी झाली नाही. पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहीम संपुष्टात आणली आणि ते महाराष्ट्रात आले. त्यांनतर सन १६७८ हंबीरराव महाराष्ट्रात आले.

त्यानंतर महाराजांनी राजाराम महाराज यांचा विवाह सरसेनापती प्रतापराव गुजर याच्या मुलीशी म्हणजेच जानकी बाईशी विवाह घडवून आणला. त्यानंतर १० ते १२ दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. यावेळी हंबीरराव कराडमध्ये छावणी टाकून होते.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याल हंबीरराव मोहिते यांची माहिती , hambirrao mohite in marathi , hambirrao mohite history in marathi , hambirrao mohite history in marathi , hambirrao mohite marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

1 thought on “हंबीरराव मोहिते यांची माहिती | hambirrao mohite information in marathi”

Leave a Comment