चंद्रशेखर आझाद माहिती मराठीत | chandrashekhar azad information in marathi

चंद्रशेखर आझाद माहिती मराठीत | chandrashekhar azad information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये चंद्रशेखर आझाद यांच्या बद्दल माहिती सांगितली आहे. ही माहिती तुम्ही चंद्रशेखर आझाद माहिती मराठीत , chandrashekhar azad information in marathi, chandrashekhar azad marathi mahiti याविषयी माहिती लिहिण्यासाठी वापरू शकता.

चंद्रशेखर आझाद यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर तिवारी असे आहे . त्यांचा जन्म २३ जुलै १९०६ रोजी मध्यप्रदेश मधील अलिराजपूर जिल्यातील भवरा या गावी झाला. त्यांचे मूळ गाव कानपुर मधील उन्नाव जिल्यातील बंडारका येते आहे. त्यांची आई जागरानी देवी तिवारी ही त्याच्या वडिलांची सीताराम तिवारी यांची तिसरी पत्नी होती. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण भवरा येथील प्राथमिक शाळेमध्ये झाले होते. ते जन्मापासूनच खूप स्वाभिमानी होते. शाळेत असताना चंद्रशेखर आझाद यांचे आपल्या वडिलांबरोबर शुल्लक कारणावरून भांडण झाले. त्याच दिवशी त्यांनी आपले घर वयाच्या तेराव्ह्या वर्षी सोडले आणि परत घरी कधी परातलेच नाहीत.

चंद्रशेखर आझाद यांचे सुरुवातीचे जीवन

सुरुवातीच्या काळात त्यांनी खूप संघर्ष केला कारण एका नव्या क्रांतिकारकांचा जन्म झाला होता. त्यांनी आपले घर सोडल्यावर थेट मुंबई गाठली. सुरुवातीला मुंबई मध्ये त्यांच्या कोणीच ओळखीचे नव्हते. म्हणून त्यांनी मुंबईला हॉटेल मध्ये, तसेच बांधकाम क्षेत्रात छोटी-मोठी कामे केली. पण त्यांचे मन मुंबईत काहीसे रमले नाही , कारण त्यांना मिळणारी कमाई सुद्धा फारशी नव्हती.

म्हणून त्यांनी बनारसला परत जाण्याचा निर्णय घेतला. बनारस येथील काशी विद्यापीठात त्यांनी हिंदी आणि संस्कृत विषयामध्ये पारंगत होण्याचे ठरवले.

काशी विद्यापीठ क्रांती घडवण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यावेळी भारताची परिस्तिथी हलाखीची होती , म्हणून त्यांनी काहीतरी बदल घडेल या दृष्टीने पाऊल उचलण्यास सुरुवात केली. त्यांना व्यायामाची खूप आवड होती , म्हणून त्यांची शरीरयस्टी खूप छान होती.

स्वातंत्रपूर्व काळात त्यावेळी महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ सुरु केली होती. या चळवळीमध्ये चंद्रशेखर आझाद यांनी सहभाग घेतला होता. तेव्हाच त्यांना अटक झाली.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना चंद्रशेखर आजाद यांच्यावर लाठी चार्ज करण्याचा सांगितले. लाठीचार्ज होत असताना चंद्रशेखर आझाद “वंदे मातरम”, “गांधीजी की जय” अशा घोषणा देत होते. या घटनेमुळे चंद्रशेखर आजार पूर्ण देशभर प्रसिद्ध झाले. ज्या अधिकाऱ्याने त्यांना मारण्यासाठी हुकूम केला होता, त्याच अधिकाऱ्याने त्यांना घरी बोलवून जेवण दिले आणि त्यांच्या जखमांवर उपचार केले. या घटनेनंतर भारतातील लोक त्यांना “आझाद” म्हणून संबोधू लागले.

ब्रिटिशा विरोधात लढण्यासाठी त्यांच्याकडे दोन संधी होत्या. एकतर काँग्रेस बरोबर जाऊन कोणतेही नेते पण मिळवायचे. त्यावेळेला काँग्रेस बरोबर ब्रिटिशांचे संबंध चांगले होते. तुरुंगात असलेल्या काँग्रेसच्या कैद्यांना ,नेत्यांना कार्यकर्त्यांना सुद्धा चांगली वागणूक मिळत होती. १९१५ पर्यंत त्यावेळी काँग्रेसकडून जास्त काही कामे झाली नाहीत. महात्मा गांधी यांनी काँग्रेसला पुनर्जीवन दिले. काँग्रेसमध्ये बाळ गंगाधर टिळक हे उग्र नेते होते , पण त्यांचे कोणी ऐकून घेण्यास तयार नव्हते.

हिंदुस्तान रिपब्लिक आर्मी (हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन)

काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार चंद्रशेखर आझाद यांनी सोडला आणि स्वतःची हिंदुस्तान रिपब्लिक आर्मी (हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन) या संघटनेची स्थापना केली. पण ही संघटना चालवण्यासाठी पैशांची व्यवस्था करणे गरजेचे होते. म्हणून त्यावेळी रामप्रसाद बिस्मिल यांनी ट्रेन लुटण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये अंदाजे त्यांनी त्यावेळी 30000 रुपये मिळवले. याच घटनेला प्रसिद्ध काकोरी ट्रेन कट असे म्हणतात.

प्रसिद्ध काकोरी ट्रेन कट (9 ऑगस्ट 1925)

या लुटीमध्ये रामप्रसाद बिस्मिल, अश्फाखल्ला खान , राजेंद्र लाहिरी , सचिन बक्षी, केशव चक्रवर्ती, मनमतनाथ गुप्ता, मुरारीलाल गुप्ता (मुरारीलाल खन्ना), मुकंदी लाल (मुकंदीलाल गुप्ता) आणि बनवारीलाल यांनी सहभाग घेतला होता. ९ ऑगस्ट १९२५ रोजी शहाजहानपूर येथून लखनऊ कडे जाणाऱ्या रेल्वे मध्ये काकोरी येथे पोहोचल्यावर एका स्वातंत्र्यवीर आणि रेल्वेची आपत्कालीत चेन खेचून रेल्वे थांबवली. अशाप्रकारे या सर्व स्वातंत्र्यवीरांनी ट्रेन वर दरोडा टाकला.

त्यानंतर चंद्रशेखर आजाद आणि कुंदन दान सोडून सर्वांना अटक झाली. प्रामुख्याने या लुटीची मोहीम नेता म्हणून ज्यांनी हाती घेतली होती, रामप्रसाद बिस्मिल यांना २६ सप्टेंबर १९२५ रोजी अटक झाली नंतर त्यांना फासावर देण्यात आले. त्यानंतर अश्फाखल्ला खान यांना दहा महिन्यानंतर दिल्ली येथे अटक झाली आणि नंतर त्यांना सुद्धा फाशी देण्यात आली.

ब्रिटिश सरकारने चंद्रशेखर आझाद यांना पकडण्यासाठी त्यांच्यावर त्यावेळी दोन हजार रुपयाचा इनाम ठेवला होता. म्हणून ते पुन्हा झाशीला आणि त्यानंतर कानपूर येथे गेले ते त्यांनी आपल्या संघटनेसाठी लोकांची भरती तसेच मोहिमा आखण्यास सुरुवात केली.

भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद

चंद्रशेखर आझाद यांची भगतसिंग यांच्याबरोबर भेट झाली. तसेच त्यांच्याबरोबर एक चांगले नाते तयार झाले. भगतसिंग यांनी नवजीवन सभा लाहोर स्थापित केली होती. त्यांना संघटना चालवण्यासाठी पैशाची गरज होती. त्यावेळी सायमन कमिशन (१९२७) आले होते. त्या वेळेला लाला रजपत राय यांचा मृत्यू झाला होता.

चंद्रशेखर आझाद यांनी परिस्थितीचा फायदा घेतला आणि पोलिस अधिकारी सौंदर याची १७ डिसेंबर १९२९ रोजी हत्या करून लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेतला. त्यांनी वेशांतर केल्यामुळे ते पळून सुटून गेले.

8 एप्रिल 1929 रोजी यांनी दोन योजनांची घोषणा केली. पहिली योजना ही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी होती. तर दुसरी योजना ही व्यापार विवाद संदर्भात होती जी सर्व नागरिकांच्या विरोधात होती.

पण तरीसुद्धा चंद्रशेखर आझाद यांनी धीर सोडला नव्हता. चंद्रशेखर आजाद आणि भगतसिंग यांच्या संघटनेने संसदेवर बॉम्ब फेकण्याचा निर्णय घेतला. चंद्रशेखर आजाद यांना भगतसिंग यांना गमवायचे नव्हते, म्हणून भगतसिंग यांनी या मोहिमेवर जाऊ नये असे त्यांचे मत होते. कारण त्यांना एका चांगल्या स्वातंत्र्यसेनानीला गमवायचे नव्हते.

६ एप्रिल १९२९ रोजी त्यांच्या संघटनेने संसदेवर बॉम्ब हल्ला केला ज्यामध्ये कोणती जीवित हानी झाली नाही. पण भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना अटक करण्यात आली. चंद्रशेखर आजाद यांनी भगतसिंगयांच्या यांच्या सुटकेसाठी योजना आखली. त्यांनी एक बंगला भाडेतत्त्वावर घेतला आणि तेथे बॉम्ब बनवण्यास सुरुवात केली. भगवती चरण वोहरा यांनी एक बॉम्ब हातात घेतला त्याची पिन होती सैल होती. त्यामुळे तो तेथेच फुटला आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला. ब्रिटिश सरकारने या तिघांवर खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा दिली.

वीरभद्र नावाच्या त्यांच्या संघटनेतील एका माणसाने चंद्रशेखर आझाद यांच्या बद्दल पोलिसांना माहिती दिली. शेवटी चंद्रशेखर आझाद यांनी पोलिसांबरोबर लढून स्वतःवर गोळी झाडून घेतली. पण ते स्वतःहून ब्रिटिशांना कधीच शरण नाही गेले.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला चंद्रशेखर आझाद माहिती मराठीत , chandrashekhar azad information in marathi, chandrashekhar azad marathi mahiti हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

1 thought on “चंद्रशेखर आझाद माहिती मराठीत | chandrashekhar azad information in marathi”

Leave a Comment