पसायदान मराठी व अर्थ | pasaydan in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये मराठीमध्ये पसायदानाचा अर्थ सांगितला आहे. ही माहिती तुम्ही meaning of pasaydan in marathi , marathi pasaydan , pasaydan lyrics in marathi , पसायदान मराठी , पसायदान , पसायदान अर्थ , पसायदान आता विश्वात्मके देवे याविषयी माहिती लिहिण्यासाठी वापरू शकता.

पसायदान मराठी | pasaydan in marathi

पसायदान मराठी | marathi pasaydan

आतां विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञे तोषावें ।
तोषोनि मज द्यावे । पसायदान हैं।

माझं वाणी रुपी यज्ञाने विश्वात्मक देव संतुष्ट होवो, आणि संतुष्ट झालेल्या त्याचा कृपाप्रसाद मला मिळो. यातील विश्र्वरुप देवाची कल्पना किती उदात्त आहे.  ज्ञानेश्वर निवृत्तीनाथामध्ये, त्यांच्या गुरुमध्ये सर्व विश्व समाविष्ट आहे, अशी कल्पना करीत आहेत. रवींद्रनाथ टागोर यांनी जेव्हा राष्ट्रगीत लिहिले तेव्हा त्यांनी भारताचा उल्लेख “भारत भाग्यविधाता” असा केला आहे. अशाप्रकारे त्याने भारतीय जनतेलाच ईश्वर मानले आहे,  त्याचप्रमाणे पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांनी पूर्ण विश्वाला ईश्वर मानले आहे. 

जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मी रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचें ॥

येथे खळ म्हणजे दुष्ट लोक आणि व्यंकटी म्हणजे त्यांचा दुष्टपणा असा आहे. आपल्याप्रमाणे सामान्य माणूस असे म्हणतो की दुष्ट माणसांचा नाश होऊन आणि चांगल्या रीतीने वागणाऱ्या माणसांची प्रगती होवो. पण ज्ञानेश्वर असे म्हणतात की, दुष्ट माणसांचा दुष्टपणा नाहीसा होवो. दुष्ट माणसे सुद्धा ईश्वरानेच निर्माण केली आहेत, पण त्यांचा मार्ग चुकलेला आहे. ज्ञानेश्वर असे म्हणतात की, दुष्ट माणसांना चांगल्या कामांमध्ये आवड निर्माण झाली पाहिजे. असे झाल्यास सर्वजण एकमेकांशी मैत्रीपूर्ण व्यवहार राखतील आणि सगळीकडे आनंद आणि समृद्धी नांदेल.

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

आपल्या गुरू कडे ज्ञानेश्वर अशी प्रार्थना करतात की, दृष्ट लोकांचे अज्ञान समोर पणे नष्ट व्हावे कारण अज्ञान हेच त्यांच्या दुष्टपणाचे कारण असते. स्वधर्म याचा अर्थ जीव म्हणून प्रत्येक प्राणीमात्राचे असलेले कर्तव्य. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न निर्मिती करणे,  हे वनस्पतींचे कर्तव्य आहे.

त्याचप्रमाणे मृत प्राणी वनस्पतींचे विघटन हे सूक्ष्मजीवांचे कर्तव्य आहे. जर आपण मनुष्य धर्माचा विचार केला तर लिखाण करणे लेखकाचे, संगीत बनवणे संगीतकाराचे , शिकवणे शिक्षकाचे कर्तव्य आहे. प्रत्येकाने आपल्याला नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे केले तरच हे जग व्यवस्थितपणे चालेल. कारण स्वतःचे कर्तव्य राखणारा प्रत्येक जीव केवळ, मंगल पवित्र इच्छा बाळगणारा असेल.

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

 सगळीकडे आनंद द्विगुणित करणाऱ्या , पावित्र्य राखणाऱ्या आणि मंगलमय जीवन व्यतीत करणाऱ्या लोकांचा समूह जन्मास येवो पृथ्वीवरील प्राणीमात्रांना त्यांचा सहवास लाभो. भगवत गीते मधील ज्ञान प्राप्त झालेले सर्व सामान्य लोक ईश्वराला प्रिय होतील आणि ते आपल्या आयुष्याच्या प्रवासामधून संपूर्ण विश्वावर आनंदाचा आणि पावित्र्याचा वर्षाव करतील अशी ज्ञानेश्वरांना आशा आहे. 

चला कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचे गाव ।
बोलते जे अर्णव । पियुषाचे ।।

पुढील ओळींमधून संत ज्ञानेश्वर संतांचे सुरेख असे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात की , हे सज्जन कल्पतरूंची चालती बोलती उद्याने आहेत. ज्याप्रमाणे कल्पतरू आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात, त्याचप्रमाणे हे सज्जन आहेत. हे सज्जन आपल्या सर्व चिंतांची नाश करणाऱ्या रत्नाची गावे आहेत. भगवत गीतेमधील उपदेशांनी आपल्या अंगी परावर्तित झालेल्या सद्गुणांची वर्णने आहेत. 

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

ज्ञानेश्वरांनी चंद्र वरील डाग आणि सूर्याची उष्णता यांना दुर्गुणांची किंवा दोषाची उपमा दिली आहे. अश्या प्रकारचे सर्व दोष गीतेच्या शिकवणुकीतून या सज्जन लोकांमधून दूर झाले आहेत. त्यामुळे या जनमानसात आता फक्त सद्गुण शिल्लक राहिले आहे आणि त्यांनी सर्व दुर्गुणांवर विजय मिळविला आहे. असे सज्जन सर्व प्राणी मात्रांचे जिवलग मित्र होवोत अशी ज्ञानेश्वरांची इच्छा आहे. 

किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भजीजो आदिपुरुखी । अखंडित  ।।७।।

संपूर्ण विश्व ज्या गोष्टीनी साकारले आहे ,असे स्वर्ग , पृथ्वी आणि पातळ येथील सर्व जणांना सुख-समाधान प्राप्त होवो आणि तेथील सर्व प्राणिमात्रांनीं या विश्वाच्या आदिपुरुषाची अखंडित आणि मन लावून सेवा करावी , अशी ज्ञानेश्वरांची इच्छा आहे. ज्ञानेश्वरांना आता अवर्णनीय मनाची शांती आणि प्रसन्नता मिळाली आहे आणि त्यांच्या दृष्टीने सर्व जग आता पवित्र बनले आहे. हीच प्रसंन्नता आणि शांती सर्वजणांना मिळावी, असे मागणे ते आपल्या गुरुकडे करीत आहेत. 

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी।

ग्रंथोपजीविये याचा अर्थ असा कि , भगवत गीतेप्रमाणे किंवा भगवत गीता या ग्रंथप्राणे जगणारे लोक. भगवत गीतेला आपला आयुष्याचा भाग मानणारे लोक. या विश्वातील सर्व मनुष्य भगवत गीतेमधील श्लोकाप्रमाणे आचरण करतील , तरच ते दृश्य आणि अदृश्य अश्या सर्व भोगावर म्हणजेच इच्छांआकांशावर विजय मिळवतील असे ज्ञानेश्वरांचे म्हणणे आहे. मनुष्य जीवन जगताना पैसे , धन -धान्य , दागिने अश्या लोभाच्या वस्तूकडे सहज आकर्षित होतो. अश्या वस्तूंचा किंवा इच्छांचा त्याग करून सर्व विश्वाच्या कल्याणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अशारितीने वागले तरच जीवनाचा उद्धार होईल , असे ज्ञानेश्वर सांगतात. 

येथे म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥

ज्ञानेश्वरांनी सांगितलेले हे “पसायदान” जीवनाला कलाटणी देणारे महान असे काव्य आहे. या पसायदानामध्ये त्यांनी ज्या मनुष्याची कल्पना केली आहे, तो मनुष्य ते स्वतः बनले आहेत. अश्याप्रकारे ज्ञानेश्वरांना खात्री आहे की , त्यांचे हे मागणे त्यांचे गुरु निवृत्तीनाथ मान्य करतील.  निवृत्तीनाथांना त्यांचे हे मागणे मान्य असून त्यांनी ज्ञानेश्वरांना आशीवार्द दिला आहे, त्यामुळे ज्ञानेश्वर अतिशय आनंदी झाले आहेत. 

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला meaning of pasaydan in marathi , marathi pasaydan , pasaydan lyrics in marathi , पसायदान मराठी , पसायदान , पसायदान अर्थ , पसायदान आता विश्वात्मके देवे हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment