तानाजी मालुसरे मराठी माहिती | tanaji malusare information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये तानाजी मालुसरे यांच्याबद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही tanaji malusare information in marathi , तानाजी मालुसरे माहिती मराठी , tanaji malusare marathi mahiti , tanaji malusare punyatithi in marathi , history of tanaji malusare in marathi   याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

तानाजी मालुसरे मराठी माहिती | tanaji malusare information in marathi

तानाजी मालुसरे मराठी माहिती | tanaji malusare information in marathi

नरवीर तानाजी मालुसरे यांचे संपूर्ण नाव त्यांचे जन्मस्थळ आणि त्यांचे वंशज यांची माहिती आज तगायत पुढे आलेली नाही त्यांच्या मृत्यूनंतर एकुलती एक चिरंजीव रायबा तानाजी मालुसरे यांचे काय झाले ते कोठे गेले त्यांचे वंशज आहेत की नाही ही सर्व माहिती आपण आज माहीत करून घेणार आहोत.

नरवीर तानाजी मालुसरे यांचे संपूर्ण नाव तानाजी काळूजीराव मालुसरे असे आहे. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई पसरणी घाटातील गोडवली तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा येथे तानाजींचा इसवी सन १६२६ च्या सुमारास जन्म झाला. गोडवली येथे तपनेश्वर शंभू महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. तसेच ग्रामदैवत श्री काळेश्वरी देवीचे मंदिर आहे. तपनेश्वर शंभू महादेवाच्या नावावरून काळूजीराव यांनी आपल्या थोरल्या मुलाचे नाव तानाजी आणि धाकट्या मुलाचे नाव सूर्याची असे ठेवले.

गोडबोले ग्रामपंचायत कार्यालयासमोर नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्मस्थळ आहे. शनिवार दिनांक ३ जुलै २०१० रोजी हे जन्मस्थळ उजेडात आले. तानाजी मालुसरे यांचे परडे या नावाने हे पवित्र जन्मस्थळ गावकऱ्यांनी शेकडो वर्षापासून जतन केले आहे. १६३० च्या सुमारास मोगलांच्या लढाईत नरवीर तानाजी मालुसरे यांचे वडील काळोजीराव आणि चुलते भवरजी मृत्युमुखी पडले. काळोजीराव व भवरजी हे बंधू शूर व पराक्रमी होते. गोडवली, राजापुरी, खिंगर ,पाचगणी, पसरणी, महाबळेश्वर आधी परिसरात त्यांचा दरारा होता. गोडवली गावातून प्रतापगडाकडे जाणारा शिवकालीन राज्यमार्ग आहे. त्यामुळे गोडावलीला ऐतिहासिक महत्त्वही आहे. हा परिसर अतिशय दुर्गम व घनदाट जंगलाचा आहे.

तानाजी मालुसरे यांचे मामा शेलार मामा या नावाने परिचित आहे. त्यांचे पूर्ण नाव कोंडाजीरायाची शेलार असे होते. त्यांचे गाव प्रतापगडाच्या जवळ आहे. काळोजीरावांच्या मृत्यूनंतर शेलार मामा यांनी लहान भावंडे तानाजी सूर्याजी व बहीण पार्वती बाई यांना गोडवली येथून आपल्या घरी नेले. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे रणशिंग फुंकले, त्यावेळी शेलार मामा तानाजी व सूर्याजीला घेऊन शिवरायांना भेटले व त्यांनी स्वराज्याच्या महायज्ञात उडी घेतली.

पोलादपूर जिल्हा रायगड तालुक्यातील टोक किल्ल्याची किल्लेदारी शेलार मामा यांच्याकडे होती. गडाच्या पायथ्याला असलेल्या उमरठे या गावी ते राहत होते. तेथेच नरवीर तानाजी मालुसरे यांचे बालपण गेले. या ठिकाणी सध्या तानाजी मालुसरे यांच्या वाड्याचे भग्न अवशेष पडलेले आहेत. उमरट येथे तानाजी मालुसरे व शेलार मामा यांची शेजारी शेजारी समाधी आहे. पोलादपूर जवळील साखर येथे सूर्याची मालुसरे यांची समाधी आहे.

इतिहासकार आणि लेखकांनी नरवीर तानाजी मालुसरे यांचे पराक्रम जगासमोर आणले. परंतु तानाजी मालुसरे यांच्या क्रांतिकारक वंशांची आणि त्यांच्या शौर्याची देशभक्तीची दखल त्यांनी घेतली नाही. त्यामुळे समाजालाही त्यांचा विसर पडला. नरवीरांच्या बलिदानानंतर त्यांचे चिरंजीव रायबा मालुसरे यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीत मोठे शौर्य गाजवले.

दक्षिणेतील मोहिमेवर जाताना शिवरायांनी तळकोकण गोवा व समुद्रकिनाऱ्यावरील शत्रूंच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी दुर्गम अभ्यद्य अशा पारगडाचे महत्त्व ओळखून तानाजी मालुसरे यांचे चिरंजीव रायबा मालुसरे यांच्यावर पारगड व सभोवतांच्या प्रदेशाची जबाबदारी सोपवली. हा गड कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात आहे. १६७६ मध्ये शिवरायांनी रायबा मालुसरे यांना पार गडाची किल्लेदारी दिली त्यावेळी त्यांना शिवरायांनी सनदही दिली.

त्यात महाराज म्हणतात जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत तुम्ही पार गडाची सेवा करावी. महाराजांच्या या आग्नेने रायबा मालुसरे भारावून गेले. बारा मावळ खोऱ्यातील व उमरठा पोलादपूर भागातील शेलार पेठे झेंडे शिंदे माळवे कुबल आदी पाचशे मावळ्यांसह रायबा मालुसरे यांनी पारगडावर वास्तव्य सुरू केले. गडाच्या चौफेर असलेली तटबंदी भक्कम केली ठिकठिकाणी बुरुज बांधले. सभोवतालच्या डोंगर टेकड्यांवर पहारे उभारले.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला tanaji malusare information in marathi , तानाजी मालुसरे माहिती मराठी , tanaji malusare marathi mahiti , tanaji malusare punyatithi in marathi , history of tanaji malusare in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment