सुभाषचंद्र बोस मराठी महिती | subhash chandra bose information in marathi

सुभाषचंद्र बोस मराठी महिती | subhash chandra bose information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या बद्दल माहिती सांगितली आहे. ही माहिती तुम्ही सुभाषचंद्र बोस मराठी महिती , subhash chandra bose marathi mahiti , subhash chandra bose information in marathi , netaji subhash chandra bose marathi mahiti , नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी महिती याविषयी माहिती लिहिण्यासाठी वापरू शकता.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओरिसा मधील कटक येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती देवी असे होते. त्यांचे वडील जानकीदास बोस यांनी ८० च्या शतकात कटकमध्ये राहून वकिली केली होती. जानकीदास बोस यांचे सुभाषचंद्र बोस हे सातवे अपत्य होते. जानकीदास बोस जास्त श्रीमंत नव्हते, पण त्यांच्या कुटुंबाचे पालन करणे इतके पैसे ते कमवत होते.

सुभाष चंद्र बोस यांचे सुरुवातीचे जीवन

वयाच्या पाचव्या वर्षी सुभाष चंद्र बोस पहिल्यांदा शाळेत दाखल झाले. ते ज्या शाळेत दाखल झाले, तेथे पाश्चिमात्य संस्कृतीवर जास्त भर देण्यात आला होता. ही गोष्ट सुभाष चंद्र बोस यांना खटकली. त्या शाळेमध्ये संस्कृत , हिंदी , भारताचा इतिहास या भाषा/गोष्टी सोडून इंग्रजी भाषेवर जास्त भर देण्यात आला होता. ही बाब त्यांना आवडली नाही.म्हणून त्यांनी अनेक वेळा टीका सुद्धा केली. १९०९ मध्ये ते पुढच्या अभ्यासासाठी रेंजच्या कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांच्या पहिल्या आदर्श व्यक्ती, त्यांच्या शिक्षिका बेनी माधवदास या होत्या.

अगदी लहान वयात त्यांच्यामध्ये जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला. त्यांना जीवनाविषयी अनेक प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात झाली, आणि त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या विषयी माहिती मिळवण्यास सुरुवात केली.

त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून आपली ग्रॅज्युएशनची पदवी घेतलेली आहे. त्यावेळी प्रतिष्ठित समजली जाणारी आय एस आय पी एस किंवा क्लास वन परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली होती. परंतु ज्या वेळेस त्यांना शपथविधी देण्यात आला होता त्यांना शपथविधी देण्यात आला की सरकार जे असणार आहे तर त्यांच्या प्रती मी माझी प्रामाणिकता असणार आहे तर ती प्रामाणिकता ती या ठिकाणी त्यांच्या प्रति ठेवणार आहे असं ज्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं, त्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी म्हटले की माझी प्रामाणिकता ब्रिटिश सरकार प्रति नसून ते भारतीय नागरिकां प्रती आहे.

चित्तरंजन दास हे सुभाषचंद्र बोस यांचे गुरु होते. स्वराज्य पक्षाने निवडणुका जिंकल्यानंतर कलकत्ता या ठिकाणी स्वराज्य पक्षाने आपली सत्ता स्थापन केली. कलकत्ता महानगरपालिकेमध्ये सीइओ म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून सुभाष चंद्र बोस यांना नेमण्यात आलं होता.

राजकीय कार्यात भाग घेतल्याबद्दल १९२४ साली त्यांना तीन वर्षाची शिक्षा झाली व मंडालेच्या तुरुंगात स्थानबद्ध करून ठेवले. १९२७-२८ सुभाष चंद्र बोस व जवाहरलाल नेहरू हे काँग्रेसमधील तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जाऊ लागले. १९२८ च्या कलकत्ता अधिवेशनात नेहरू अहवालातील अंतर्गत स्वायत्त्यतेच्या ठरावाचा त्यांनी जोरदार विरोध केला आणि ते पूर्ण स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते.

सुभाषचंद्र बोस १३९८ च्या हरिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. पण त्याच काँग्रेसचा १९३९ साली त्यांना त्याग करावा लागला. १९३९ च्या त्रिपुरी अधिवेशनात गांधीजीचे समर्थक पी. सीतारामय्या यांना हरवून सुभाष चंद्र बोस अध्यक्ष झाले. अध्यक्ष पदावरून बोस व काँग्रेस नेतृत्वात मतभेद निर्माण झाले होते. या काळात सर्वसामान्यांची चळवळ तत्काळ उभी करावी असे बॉस यांना वाटत होते तर त्यासाठी अजून योग्य वेळ आला नाही असे काँग्रेसच्या नेतृत्वाचे म्हणणे होते.

त्रिपुरा येथील अधिवेशनात असे घडले की गांधीजींच्या समर्थकांनी “काँग्रेस कार्यकारणी गांधीजींनी निवडावी” असा ठराव मांडला. या उलट गांधीजींच्या असे म्हणणे होते की सुभाषचंद्र बोस यांनी ती स्वतः निवडावी. पण बोस यांनी या गोष्टीला नकार दिला. एकट्याला संघटनेचे नेतृत्व करता येणार नाही हे त्यांना माहीत होते. पण ते बहुमताचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार नव्हते. त्यांचे म्हणणे होते की चळवळीचे पुढील नेतृत्व गांधीजींनीच करावे. फक्त विवहरचना व नीती डाव्या गटांची स्वीकारावी. पण या गोष्टीला गांधी तयार नव्हते.

फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना

बहुमताचा प्रश्न व झालेल्या वैचारिक कोंडीमुळे सुभाष चंद्र बोस यांनी एप्रिल १९३९ मध्ये राजीनामा दिला. यावेळी अध्यक्षपदी राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली व बोस यांनी मे १९३९ मध्ये फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली. जुलै १९३९ ला काँग्रेसच्या ठरावाच्या विरोधात त्यांनी निषेधाचे आवाहन केले.

त्यामुळे काँग्रेस कार्यकारिणीने त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई केली व त्यांना बंगाल प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष पदावरून काढले. तसेच काँग्रेस मधील कोणत्याही पद धारण करण्यास तीन वर्षे मनाई केली. सप्टेंबर १९३९ मध्ये ज्यावेळी दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा काँग्रेसने इंग्रजांविरुद्ध आंदोलन सुरू करावे असे त्यांचे मत होते. त्यांनी जनतेलाही आवाहन केले की ब्रिटिश शासनाला कुठल्याही प्रकारची मदद करू नये.

सरकार विरोधी मतांमुळे त्यांना जुलै १९४० ला तुरुंगात ठेवले. या अन्यायकारक अटके विरोधी त्यांनी उपोषण सुरू केले. डिसेंबर १९४० ला त्यांना त्यांच्याच घरात नजर कधी ठेवले. यावेळी ते अशा मतास येऊन पोहोचले की, भारताच्या स्वातंत्र्यासाठी व्यापक सशस्त्र उठावाची गरज आहे. त्यासाठी भारताबाहेर जाऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. जानेवारी १९४१ मध्ये विषयांतर करून स्वतःची सुटका करून घेतली आणि पेशावर मार्गे काबुल (अफगाणिस्तान) येथे गेले.

नंतर रशियाची राजधानी मॉस्को येथे गेले व तेथून ३ एप्रिल १९४१ बर्लिन (जर्मनी) येथे पोहोचले. यावेळी त्यांना रशियन राजदूतापेक्षा इटालियन राजदूताची मदत झाली. बर्लिन रेडिओवरून त्यांनी भारतीयांना इंग्रजा विरुद्ध हल्ल्याच्या आवाहन केले. १९४१ ला जर्मनीतील भारतीयांच्या मदतीने त्यांनी ‘फ्री इंडिया सेंटरची‘ स्थापना केली आणि त्याच्या अनेक शाखा काढल्या.

फ्री इंडिया सेंटर

रोम आणि पॅरिसमध्ये सुद्धा फ्री इंडिया सेंटरच्या शाखा होत्या. भारतीय सैन्य उभारण्यास जर्मनी अनुकूल होता. पण भारतीय स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी उत्सुक नव्हता. सुरुवातीला जर्मनीच्या ‘यु’ बोटीतून व नंतर जपानी पाणबुडीतून प्रवास करून जून १९४३ रोजी नेताजी जपानला पोहोचले. तिथे काही भारतीय एकत्र आले होते.

त्यांना इंग्रज हारल्यावर सिंगापूर व मलेशियात सोडून गेले होते आणि जे युद्ध कैदी म्हणून जपानच्या हाती सापडले होते , त्यांना घेऊन रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. मलेशियात स्थायिक झालेल्या भारतीयांनी सुभाष बाबूंना पूर्ण नैतिक व आर्थिक समर्थन दिले. जपानने सुद्धा लष्करी मदतीचे आश्वासन दिले होते.

आझाद हिंद सेना / इंडियन इंडिपेंडेंस लीग

मार्च १९४२ मध्ये टोकियो येथे परिषद भरली, यात भारताच्या स्वातंत्र्याला मदत करण्यासाठी पूर्वेकडील देशात राहणाऱ्या भारतीयांनी सहभाग घेतला होता. यातील निर्णयानुसार ‘आझाद हिंद सेना‘ हे सैन्यदल व ‘इंडियन इंडिपेंडेंस लीग‘ हे नागरी संघटन स्थापण्याचा निर्णय झाला. अमरसिंग व प्रीतम सिंग हे इंडियन इंडिपेंडेंस लीगशी संबंधित होते.

बँकॉक येथे दुसरी परिषद भरली. यावेळी अध्यक्ष राजबिहारी बोस होते. या ठिकाणी इंडिया इंडिपेंडेंस लीग ची स्थापना झाली. भारताचे स्वातंत्र्यप्राप्ती हेलिकचे उद्दिष्ट होते. या परिषदेने सुभाष चंद्र बोस यांना इंडिपेंडेंस लीगचे नेतृत्व करण्यासाठी पूर्व आशियात घेण्याचे आमंत्रण दिले. १ सप्टेंबर १९४२ रोजी आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस व कॅप्टन मोहन सिंग यांनी केली. इंडियन इंडिपेंडेंस लिहिणे आझाद हिंद सेनेला माणसे, पैसा व इतर साहित्य पुरवण्याची जबाबदारी स्वीकारली. कार्यपद्धतीवरून रासबिहारी व कॅप्टन मोहन सिंग यांच्यात मतभेद निर्माण झाले.

तसेच जपानी सेना अधिकारी आझाद हिंद सेनेचे स्वतंत्र अस्तित्व न मानता आपल्याच सैन्याचा एक भाग म्हणून वागणूक देत असे. ही परिस्थिती सुभाष बाबू बदलू शकतील म्हणून त्यांना राज बिहारी व मोहन सिंग यांच्या वतीने जपानमध्ये येण्याचे निमंत्रण पाठवण्यात आले. जून १९४३ मध्ये सुभाष चंद्र बोस जपान मध्ये पोहोचले. तिथे त्यांनी पंतप्रधान तेजो यांची भेट घेतली. जुलै १९४३ मध्ये ते सिंगापूरला गेले आणि ४ जुलै १९४३ रोजी आझाद हिंद सेना व इंडियन इंडिपेंडेंस लीग याचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले. यानंतर त्यांना ‘नेताजी’ या नावाने ओळखले जावे लागले. त्यांच्या सेनेतील पथकांची नावे ‘ गांधी, नेहरू, झाशीची राणी पथक’ असे होते. राणी झाशी रेजिमेंटला ‘मायमोला’ युद्ध आघाडीवर जाण्याची संधी मिळाली होती.

शहानवाज खान हे सुभाष ब्रिगेडचे कमांडर होते. मेजर प्रकाश आझाद ब्रिगेडचे प्रमुख होते तर नेहरू ब्रिगेडचे प्रमुख मोहम्मद झमान किमयानी हे होते.

12 नोव्हेंबर 1945 हा दिवस आजाद हिंद सेना दिन, तर 5 ते 11 नोव्हेंबर 1945 हा आठवडा ‘आझाद हिंद सेना सप्ताह‘ म्हणून पाहण्यात आला. तैवान मधील तैपेह येथून मांचुरियातील डेरेनकडे जाताना 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात नेताजींचे निधन झाले.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला सुभाषचंद्र बोस मराठी महिती , subhash chandra bose marathi mahiti , subhash chandra bose information in marathi , netaji subhash chandra bose marathi mahiti , नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी महिती हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

2 thoughts on “सुभाषचंद्र बोस मराठी महिती | subhash chandra bose information in marathi”

Leave a Comment