दसरा सणाची माहिती | dasara information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये दसरा सणाबद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही दसरा सणाची माहिती , dasara information in marathi , दसरा 2023 , dasara 2023 याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

दसरा सणाची माहिती | dasara information in marathi

दसरा सणाची माहिती | dasara information in marathi

दसरा हा भारतातील हिंदूंचा प्रसिद्ध सण आहे दरवर्षी हा सण अश्विन शुद्ध दशमीला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला विजयादशमी असेही म्हणतात. दसरा हा साडेतीनशे मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी अनेक जण शुभकार्य करतात नवीन कपडे नवीन वस्तू ,नवीन वाहन, सोने, चांदी हिरे मोती इत्यादी खरेदी करतात. घराला आंब्याच्या पानांचे झेंडूच्या फुलांचे तोरण मानले जाते वाहने यंत्रे अवजारे यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात.

दसरा हा सण साजरा करण्याची परंपरा फार जुनी आहे याच दिवशी देवी दुर्गामातेने महिषासुर राक्षसाचा वध केला. दसऱ्याला दशहरा असे देखील म्हणतात. दशा म्हणजे दहा तोंडांचा अहारा म्हणजे त्याचे हरण करणे, म्हणजेच त्याचा वध करणे आहे. कारण या दिवशी दहातोंडे असणाऱ्या रावणाचा प्रभू रामचंद्र यांनी रावणाचा वध केला होता.

पांडव ही अज्ञातवासात याच दिवशी निघाले होते. बाजीराव पेशवे देखील याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत असत. दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी सोने लुटण्याची प्रथा आहे. या दिवशी सगळेजण एकमेकांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटतात. सोन्या घ्या सोन्यासारखा रहा असे म्हणतात. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून ओळखला जातो. दसरा हा सण आपल्याला एकता आणि बंधुभावाची शिकवण देतो.

दसरा हा नवरात्रीचा दहावा व अंतिम दिवस असतो या दिवशी भारतभर ठीक ठिकाणी रामलीलाचे , रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित केली जातात त्यामध्ये रावण , कुंभकरण , मेघनाथ यांचे पुतळे जाळले जातात. अशाप्रकारे वाईट गोष्टींचा अंत होवो ही त्यामागे धारणा आहे.

अशाप्रकारे दसरा सण लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो.

दसऱ्याला आपट्याची पाने का लुटतात ?

अनेक वर्षांपूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले. या ऋषींकडे विद्याभ्यासासाठी खूप विद्यार्थी येत असत. खूप सारे विद्यार्थी त्यांच्याकडे शास्त्र अभ्यास व विद्या अभ्यास करत असत. शिक्षण संपल्यानंतर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत असत. या ऋषींकडे कौत्स नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुंनी त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याने विचारले मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? त्यावर गुरुतंत म्हणाले, “अरे ज्ञान हे दान करायचे असते . . . !. तू शहाणा झालास, ज्ञानी झालास, हीच माझी गुरु दक्षिण आहे. मात्र कौत्स काही केल्या ऐकेना तो म्हणाला , “तुम्ही सांगा गुरुजी, तुम्ही मागेल ते देईन.” तेव्हा ऋषींनी कौत्साची परीक्षा घ्यायचे ठरवले.

वरतंतू ऋषींनी त्याला प्रत्येक विद्यासाठी एक कोटी सुवर्ण मुद्रा, अश्या १४ विद्येप्रमाणे १४ कोटी सुवर्ण मुद्रा आणावयास सांगितले. एवढं धन कमावणे शक्य नाही म्हणून कौत्स रघु राजाकडे गेला.

परंतु राजाने त्याचवेळी विश्व विजय यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता. राजाने कौत्साकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्यांनी इंद्रावर स्वारी करायचे निश्चित केले. इंद्राला रघु राजाचा पराक्रम माहित होता. त्याने सर्व हकीकत इंद्रला सांगितली. इंद्राने आपट्याच्या पानांची सोन्याची नाणी बनवून ती पाऊस सारखी राज्याच्या राजवाड्यावर पाडली. तेव्हा राजाने कौत्साला हवे तेवढे धन घेऊन जाण्यास सांगितले. कौत्स त्या सुवर्ण मुद्रा घेऊन वरतंतू ऋषींकडे गेला आणि गुरु दक्षिण घेण्यास विनंती केली.

परंतु १४ कोटी सुवर्ण मुद्रा राजाने परत घेण्यास नकार दिल्यामुळे, कौत्साने त्या सुवर्णमुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून लोकांना सोने लुटण्यास सांगितले. लोकांनी त्या झाडाची पूजा करून आणि पाहिजे तेवढ्या सोन्याच्या मुद्रा लुटल्या. अश्या प्रकारे या दसऱ्याच्या दिवशी आपटयाची पाने लुटण्याची प्रथा सुरु झाली.

दसरा २०२३ | दसरा कधी आहे?

या वर्षी म्हणजे २०२३ साली दसरा २४ ऑक्टोबर २०२३ रोजी (मंगळवार) आहे

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला दसरा सणाची माहिती , dasara information in marathi , दसरा 2023 , dasara 2023 हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

2 thoughts on “दसरा सणाची माहिती | dasara information in marathi”

Leave a Comment