बाजीराव पेशवे मराठी माहिती | bajirao peshwa information in marathi

बाजीराव पेशवे मराठी माहिती | bajirao peshwa information in marathi

बाजीराव पेशवे मराठी माहिती | bajirao peshwa information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये बाजीराव पेशवे यांच्या बद्दल माहिती सांगितली आहे. ही माहिती तुम्ही बाजीराव पेशवे मराठी माहिती , bajirao peshwa information in marathi, history of bajirao peshwa in marathi , bajirao peshwa marathi , bajirao peshwa marathi , bajirao peshwa biography in marathi , बाजीराव पेशवे जीवन परिचय याविषयी माहिती लिहिण्यासाठी वापरू शकता.

बाजीराव बाळाजी मराठा साम्राज्याचे मुख्य प्रधान किंवा पहिले बाजीराव या नावाने ओळखले जातात. सहा फूट उंच, भक्कम पिळदार शरीरयष्टीचे, निकोप प्रकृती लाभलेले, न्यायनिष्ठ स्वभावाचे उमदे व्यक्तिमत्व म्हणजेच थोरले बाजीराव. यांना नेहमीच भपकेबाज पोशाखांची चिड असायची, म्हणून ते पांढरे किंवा फिकट रंगांचे कपडे परिधान करत असत. नोकरांवर अवलंबून नसणाऱ्या या स्वावलंबी व्यक्तिमत्त्वावर नेहमीच आपल्या घोड्यांना स्वतः वैरण ,पाणी दिलेला आहे, यातच ते समाधान मानत असत.

बाजीरावांचा स्वभाव आणि राहणीमान

कधीही अन्याय सह न करणाऱ्या खोटेपणाचा प्रचंड राग करणाऱ्या आणि आयुष्य आरामात जगणं मान्य नसणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा स्वभाव तितकाच शिस्तबद्ध होता आणि म्हणून यांच्यात कार्यकाळात शिस्तीत तयार झालेले यांचा सैन्य यांचा प्रचंड आदर करत असे.

इसवी सन १७२० साली बाजीराव एक शिपाई म्हणूनच कार्यरत होते. त्यावेळेस त्यांच्या कोवळ्या खांद्यांवर छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाई सोपवली. या तरुण रक्तांना पुढील वीस वर्षांत अतुल पराक्रम गाजवला. वेगवान खालचा हेच त्यांच्या युद्ध करू शकतील स्थान म्हणावे लागेल. बाजीरावांना आपल्या उभ्या आयुष्यात बहुतांशी लढाया जिंकल्या. त्यात माळवा, धर, औरंगाबाद, उदयपूर, फिरोजाबाद, भोपाळ , वसईची लढाई यांनी अशा अनेक ३६ लढायांचा समावेश यात आवर्जून करावा लागेल.

रण धुरंदर असणाऱ्या पहिल्या बाजीरावांना आपल्या प्रभावी युद्ध नेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. आपल्या भटकळ स्वभावामुळे उत्साद्यगिरीपेक्षा समशेर न एक घाव दोन तुकडे करणे हीच त्यांची नीतिमत्ता होती आणि म्हणूनच बाजीरावाच्या समशेरीचा डंका सर्व मुलखांमध्ये वाजू लागला.

अशी दंतकथा ऐकिवात आहे की , बाजीरावांनी पुण्यात एक ठिकाणी सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना पाहिला. तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. त्याच जागी त्यांना भुईकोट किल्ला बांधून घेतला. त्यालाच आपण शनिवार वाडा असं म्हणतो. या शनिवार वाड्यात पेशवे आपल्या पत्नी काशीबाई सह निवास करीत होते. या पत्नीकडून त्यांना रामचंद्र उर्फ रघुनाथराव पेशवा, जनार्दन आणि बाळाजी उर्फ नाना पेशवा अशी तीन मुलं होती.

पुढील कारणामुळे या शनिवार वाड्यात अजून एका व्यक्तीचा आगमन झालं. ते झाला असं की, दिल्लीच्या मोहम्मद खानचा सुभेदार बंगेशने छत्रसाल बुंदेला वर आक्रमण केले आणि छत्रसाल बुंदेलाला अटक केली. बुंदेलाने पहिल्या बाजीरावांकडे मोठ्या आशेने पत्राद्वारे मदतीची याचना केली. तेव्हा बाजीरावांनी बेसावध असलेल्या बंगेश खानावर ३५ ते ४० हजारांचा सैन्य घेऊन त्यावर हल्ला आणि छत्रसालची यातून सुटका केली. खूश झालेल्या छत्रकालने वार्षिक रुपये ३२ लाख उत्पन्न असलेला एक मुलुख आणि एका पत्नीची मुलगी त्यांना नजर केली.

मस्तानीची भेट आणि शनिवारवाड्यात आगमन

ती मुलगी म्हणजे मस्तानी. अश्या प्रकारे मस्तानीचे बाजीरावाच्या आयुष्यात आगमन झालं होतं. या शनिवार वाड्यात मस्तानी मुळे बाजीरावाला अनेक जणांनी विरोधी केला. पण साऱ्यांना जुगारून त्याने मस्तानीसाठी शनिवार वाड्यातच मस्तानी महाल बांधला. मस्तानी कडून बाजीरावला समशेर बहाद्दूर या नावाचे पुत्र झाला. ज्याला कृष्णराव म्हणूनही संबोधले जाते. हे नाव स्वतः मस्तानी ठेवले, कारण ती स्वतः मुसलमान असूनही कृष्ण भक्त होती. असा हा समशेर बहाद्दूर पुढे मराठ्यांच्या बाजूला लढत असताना पानिपतच्या युद्धात धारातीर्थी पडला.

बाजीराव प्रमाणे त्याचा धाकटा भाऊ चिमाजी सुद्धा तितकाच लढाऊ होता. त्याने पोर्तुगीजांकडून सात शहरे ,चार बंदरे , दोन लढाऊ टेकड्या आणि ३४० गावं जिंकली. याची जाणीव ठेवून त्यांनी वसई जवळ वज्रेश्वरी देवीचे मंदिर ही बांधले.

बाजीरावांचा मृत्यू (bajirao peshwa death )

अनेक लढाया जिंकणाऱ्या अपराजित सेनापतीने बाजीरावन २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग वर मात केली. लढाई जिंकली त्याच नासिरजंग दोन प्रदेश दिले, त्यातलाच एक खरगोन. ३० मार्च रोजी बाजीराव खरगोन ला गेले असता त्यांची अचानक प्रकृती ढासळली.

२८ एप्रिल इसवी सन १७४० रोजी पहाटेच्या वेळी रावेर खेडी या गावी विषमज्वराने थोरले बाजीराव मृत्युमुखी पडले. ४० वर्षांचा आयुष्य जगणाऱ्या पहिल्या बाजीरावाने खऱ्या अर्थाने एक इतिहासच रचला.

बाजीरावांवरचे चित्रपट , मालिका

बाजीरावांचा इतिहास राहू या पुस्तकातून इनामदार यांच्या लेखणीतून साकारला. याच पुस्तकावर आधारित रवींद्र मंकणे आणि मृणाल कुलकर्णी यांच्या भूमिकेतून एक मालिका सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्याव्यतिरिक्त, नितीन चंद्रकांत देसाई यांनी सुद्धा श्रीमंत पेशवे बाजीराव मस्तानी या मालिकेतून बाजीरावाचा आयुष्यभर उलगडला.

पहिल्या बाजीरावाचा इतिहास आणि त्याचं मस्तानी वर असणारे प्रेम संजय लीला भंडारीनी बाजीराव मस्तानी च्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न केला. रणबीर सिंग, दीपिका पदुकोन आणि प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसले. पहिल्या बाजीरावाचं असं हे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे, त्यांनी उभ्या आयुष्यात ४१ पूर्ण अधिक लढाया जिंकल्या.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला बाजीराव पेशवे मराठी माहिती , bajirao peshwa information in marathi, history of bajirao peshwa in marathi , bajirao peshwa marathi , bajirao peshwa marathi , bajirao peshwa biography in marathi , बाजीराव पेशवे जीवन परिचय हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

1 thought on “बाजीराव पेशवे मराठी माहिती | bajirao peshwa information in marathi”

Leave a Comment