बाजीप्रभू देशपांडे माहिती मराठीत | bajiprabhu deshpande information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांच्याबद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही bajiprabhu deshpande information in marathi , बाजीप्रभू देशपांडे माहिती मराठी , bajiprabhu deshpande marathi mahiti , bajiprabhu deshpande punyatithi in marathi , history of baji prabhu deshpande in marathi   याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

बाजीप्रभू देशपांडे माहिती मराठीत | bajiprabhu deshpande information in marathi

बाजीप्रभू देशपांडे माहिती मराठीत | bajiprabhu deshpande information in marathi

बाजीप्रभू देशपांडे यांचे बालपण

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील वांगणी या गावातील श्री मळाई देवी ही बाजीप्रभूच्या घराण्याची कुलस्वामिनी. भोरपासून तीन मैलावरचे हिरडस मावळातील शिंद हे छोटेसे गाव. विंध्य प्रभूंचे नातू वैद्य प्रभू मोठे कर्तबगार व्यक्तिमत्व. हिरडस मावळातल्या रोहित खोऱ्यातल्या ५३ गावचे वतन वैद्य प्रभुंना त्यांच्या कर्तबदारी पाहून बिदरच्या मिरच्या अलीबेरी शहाने बहाल केले होते. या ५३ गावांपैकी शिंद हे ठिकाण वैद्य प्रभूंचे वास्तव्याचे ठिकाण होते. अशा वैद्य प्रभुंना एक पुत्र होता. त्यांचे नाव विलाजी प्रभू. पिलाजी प्रभू वडिलांप्रमाणेच कर्तबगार निजामशाहीत असताना त्यांनी निजामशाहीच्यावतीने अनेक युद्धात भाग घेतला होता.

निजामशाही आणखी एक मातब्बर सरदार विलाज यांच्यावर माया करत होता. त्या वीर योद्धाचे नाव होते शहाजीराजे भोसले. शहाजीराजे पिलाजी प्रभूंची कर्तबगारी ओळखून होते. त्या दोघांचे एकमेकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध होते. इलाजी प्रभुंना दोन मुले होती एकाचे नाव बाळाचे प्रभू, तर दुसऱ्याचे नाव कृष्णाजी प्रभू. हे दोघेही वडिलांप्रमाणे पराक्रमी होते. कृष्णाजी प्रभुंना पत्नी बयोबाई साहेबांपासून चार पुत्र झाले. पहिले वाल्होजी, दुसरे अनाजी, तिसरे फुलाजी आणि चौथे बाजी बाजीप्रभू देशपांडे.

आपला नातूबाजी शस्त्रविद्यात पारंगत झाला पाहिजे, असे आजोबा पिलाजी प्रभुंना नेहमी वाटत असे. म्हणून त्यांनी रानोजी बांदल यांना दांडपट्ट्याचे शिक्षण बाजींना देण्यासाठी बोलावले बाजी हळूहळू भालाफेक, विटा चालवणे, खंजीर, बरची, जांबिया अशा अनेक प्रकारची शस्त्रे चालवण्यात पारंगत झाले. दांडपट्टा चालवणे आणि विटा चालवणे याबाबतीत तर उभ्या मावळ पट्ट्यात बाजींचा हात धरणारा कोणीच नव्हता. कुस्तीच्या फाडातही त्यांचा दरारा होता. पिलाजी अद्याप राजकारणात होते. त्यांच्या समवेत त्यांची मुले आणि नातू भक्कमपने त्यांच्या पाठीशी होते. अद्याप रोहित खोरे हिरडस मावळ यामधील देशमुखांच्या आपापसातील झुंजी कमी झालेल्या नव्हत्या.

कृष्णाजी बांदल रोहित खोऱ्यातला दांडगाही करणारा एक बलाढ्य देशमुख, तो स्वतः रोहित खोऱ्याचा मी राजा आहे, अशा घमेंडीत वावरायचा. त्याचे कोणाशीच पटत नव्हते. रोहित खोऱ्याला लागूनच हिरड्याच मावळ. त्या मावळमध्ये आणखी एक बलाढ्य देशमुख रायरेश्वराच्या परिसरात राहत होता. नाईकजी जेधे आणि कान्होजीं जेधे यांच्यात वारंवार छोटी मोठी युद्ध होत असतं. त्यांच्या वतनाच्या सीमा एकमेकांना लागूनच होत्या. या साऱ्या घटना आणि हकीकती शिवाजी राजांच्या आणि मासाहेबांच्या कानावर जात होत्या.

राजे या घटना ऐकून खिन्न होत असत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे कुठेतरी बंद झालं पाहिजे, असा विचार राजांचा मनात यायचा. राजांच्या कानावर एक बातमी आली की, कृष्णाजी बांधलांनी अचानक देशपांडे यांच्या वतनातील गावातून वसुली करायला सुरुवात केली. देशपांडे यांच्या काही वतनी गावातील उत्पन्नात कृष्णाजीने वाटा मागितला. पिलाजी प्रभूंनी तो देण्याचे नाकारले. मग बांदल देशपांडे यांच्यात जोरदार युद्ध झाले.

महापराक्रमी पिलाजी प्रभू आणि रोहित खोऱ्यातला ढाण्या वाघ कृष्णाजी बांदल एकमेकांसमोर टाकले आणि त्यांच्या युद्ध सुरू झाले. दोघेही महापराक्रमी कोणी कोणाला आटपेना. पिलाजी प्रभू या युद्धात अनेक जखमा होऊन मृत्यू पावले. एवढ्यावरच ही आपापसातील झुंज थांबली नाही. बाजीप्रभूंची एक बंधू अण्णाजी प्रभू या युद्धात कामी आले. बांधल देशपांडे यांच्या युद्धात देशपांडे यांचे दोन बलाढ्य महापुरुष या रणांगणात बळी गेले.

खुद्द बाजींच्या अंगावर तीस-पस्तीस जखमा झाल्या होत्या. या भांडणाचे पडसाद सर्वत्र उमटले. विजापूर दरबारला ही समजले. या मावळ मधील झुंजीचा फायदा शिवाजी महाराज घेतील, हे विजापूरच्या लक्षात आले. त्यांनी या दोघांनाही बोलावून दम दिला. तुमची वतने जप्त करू, असे सांगितले आणि इथून पुढे बांदल हे रोहित खोऱ्याचे राजेच राहतील. पण त्यांनी राज्यकारभार देशपांडे प्रभूंच्या सल्ल्याने करावा. देशपांडे बांधलांचे दिवाण म्हणून कारभारी म्हणून काम करतील. असा दोघांच्या समझोता घडवून आणला आणि रोहित खोऱ्याचे राजे बांदल यांचे बाजीप्रभू दिवाण झाले.

बाजीप्रभू देशपांडे व कृष्णाजी बांदल

बाजींच्या सारखा महापराक्रमी पुरुष बांधलांचा प्रमुख बनला. त्यामुळे बांधलांचे बळ वाटले. बांधलांच्या मनात जेध्यांचा पराभव करायचा. हे होतेच कृष्णाजी बांधलांनी बाजींच्या साथीने जेधे आणि बांधलांच्या मधील अखेरचे युद्ध जिंकले. आता बांधलांचे पान बाजींच्या शिवाय हलत नव्हते. बांधलांचा बाजींच्यावर प्रचंड विश्वास बसला. त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. बाजी म्हणतील ती पूर्व दिशा इतका बाजींच्यावर बांधलांचा विश्वास बसला. कृष्णाजींचा मुलगा बाजी बांदल बाजीप्रभूंचा उजवा हात बनला. बाजीप्रभू कृष्णाजी बांदल यांचे दिवाण झाले आणि मावळचा कारभार नीट सुरू झाला. तरीपण कृष्णाजी बांदलांचा शिरजोर्पणा काही कमी होत नव्हता. आता कृष्णाजी बांधलांनी गुंजन मावळात दांडगाही करायला सुरुवात केली.

हे वागणे शिवाजीराजांना आवडले नाही. ते शिवाजीराजांवरच उलट चिडायला लागले. पण राजे शांत आणि संयमी होते, त्यांनी कृष्णाजीला परोपरिने समजावून सांगितले काही झाले तरी बांदल आपले आहेत, बाजीप्रभू आपले आहेत, त्यांना आपले करावे स्वराज्याच्या कामे लावावे. अशी राजांची इच्छा होती, परंतु राजांचा विचार बांधलांच्या डोक्यात शिरेना तरीसुद्धा राजांनी शेवटचा प्रयत्न करून पाहायचे ठरवले. बांदल सन्मानाने आपल्याकडे यावेत म्हणून बांधलांशी समिट करण्यासाठी पंत दादोजी कोंडदेवांना राजांनी बांधलांकडे पाठवले. पण त्यांनी कृष्णाजीला परोपरिने समजावून सांगितले.

राजांच्या वाढत्या सामर्थ्याची कृष्णाजीला कल्पना दिली. परंतु आम्ही पिढ्यानपिढ्यांचे रोहित खोऱ्यातले राजे आहोत. आमचे कोण काय करणार आहे अशा थाटातच बांदल वागले. दादोजी कोंडदेव यांच्या घोड्याच्या शेपट्याच कृष्णाजीने कापल्या आणि राजांचा अपमान केला. ही गोष्ट राजांच्या कानावर गेल्यावर ते चिडले आणि त्यांनी पंतांना आज्ञा दिली की कृष्णाजी बांधला ना काढण्या लावून धरून आणा त्याला जेरबंद करा. यावेळी राजे सिंहगडावर होते.

राजांनी त्याला कोणतीही दयामाया न दाखवता, त्याचा चौरंग करण्याची सजा फरमावली. बांधल्यांचे दिवाण बाजीप्रभू मात्र या प्रकाराने संतापले. शिवरायांना बाजीप्रभूंची भेट घेऊन त्यांना स्वराज्या निर्मितीचे हाती घेतलेले कार्य समजावून, त्यांना स्वराज्यकार्यात सामील करून घ्यावे, अशी इच्छा राजांना होती. त्यानुसार राजाने आपल्या मावळ्यांसह शिंद येथे जाऊन बाजींची भेट घेतली. बाजींना स्वराज्याचा मनसुबा सांगून, त्यांना स्वराज्यात सामील करून घेतले.

बाजीप्रभूंचा वैयक्तिक संसार मोठा होता. बाजींना दोन पत्नी होत्या पहिली सोनाई आणि दुसरी गौतमाई आहे. पहिल्या पत्नीपासून बाजींना महादजी, मोराजी आणि रामजी तर दुसऱ्या पत्नीपासून येसाजी, बावजी, हरजी, विसाजी आणि मताजी असे आठ पुत्र होते.

बाजीप्रभू देशपांडे पायदळ प्रमुख

बाजींना स्वराज्याच्या पायदळाचे प्रमुख धारकरी म्हणून नेमले. बाजी एकटेच स्वराज्यात न येता बांधलांचे ही मन वळवून त्यांना स्वराज्यात आणले. बाजी बांधलांकडे असलेला रोहिदा किल्ला आता स्वराज्यात आला. राजांनी त्याचे नाव विचित्रगड असे ठेवले. बाजींचा आणि राजांचा स्वराज्याच्या कामी संपर्क वाढला. बाजींनी आणि बांधलांनी प्रतापगड युद्धात पराक्रम गाजवला. पन्हाळगडाला सिद्धी जोहरचा वेढा पडल्यामुळे शिवाजीराजे पन्हाळ्यात अडकून पडले होते. त्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी राजांनी बाजीप्रभू सोबत गडाबाहेर पडण्याची योजना आखली.

त्यानुसार राजांना मावळ्यांनी सुरक्षित बाहेर काढले. विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरच्या खिंडीत बाजींनी गाजवलेला पराक्रम आपणा सर्वांनाच माहित आहे. बाजींनी स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिल्याने राजे सुरक्षित गडावर पोहोचण्यात यशस्वी झाले. शिवराय प्रतापगडाच्या कामगिरीमुळे कान्होजी जेढे व त्यांच्या साथीदारांवर खुश होते. तसेच पन्हाळ्याच्या कामगिरीमुळे रोहिडे आणि हिरडस खोऱ्यातील मावळ्या वीरांवर खुश होते.

पावनखिंडीमधील लढाई

अत्यंत कठीण आणीबाणीत सडे, चिकणे, विचारे, धुमाळ, माने आणि मोठ्या संख्येने बांधलांनी बलिदान देऊन महाराजांचे प्राण वाचवले. त्यामुळे बाजीप्रभूंनी दिलेल्या बलिदानाचे सार्थक झाले. या दोन्ही यशस्वी मोहिमा आटोपून महाराज सैन्यासह राजगडावर आले. स्वराज्यासाठी शौर्य गाजवणाऱ्या मावळ्यांचे कौतुक करण्यासाठी महाराजांनी राजगडावर सर्व सरदार शिलेदार आणि मावळ्यांची सभा भरवली.

कान्होजी जेधे यांना देऊ केलेले दरबारातील मानाचे पहिले पान महाराजांनी बांदल यांना दिले. राजगडावरील विजयी सभा आटोपली स्वराज्य बळकट करण्यासाठी प्राण्यांचे बलिदान देणाऱ्या हिरड्यास, रोहित खोऱ्यातील वीर मावळ्यांच्या घरी जाऊन शिवरायांनी त्यांच्या आई-वडील पत्नी आणि मुलांचे सांत्वन केले. त्यांना साडीचोळी पोशाख बक्षशे दिली. शिंद येथे जाऊन महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्या कुटुंबांचे सांत्वन केले. बाजींच्या सर्व मुलांना स्वराज्यात सामील करून घेतले. कृष्णाजी बांदल यांच्या वीर पत्नी दीपाबाई बांदल यांचे सांत्वन करून त्यांच्याकडे हिरडस मावळ्याच्या देशमुखीची सनद दिली.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला bajiprabhu deshpande information in marathi , बाजीप्रभू देशपांडे माहिती मराठी , bajiprabhu deshpande marathi mahiti , bajiprabhu deshpande punyatithi in marathi , history of baji prabhu deshpande in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment