कान्होजी आंग्रे मराठी माहिती | kanhoji angre marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये कान्होजी आंग्रे त्यांच्याबद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही कान्होजी आंग्रे मराठी माहिती , kanhoji angre marathi , kanhoji angre speech in marathi , kanhoji angre hisotry information in marathi , kanhoji angre information in marathi  याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

कान्होजी आंग्रे मराठी माहिती | kanhoji angre marathi

कान्होजी आंग्रे मराठी माहिती | kanhoji angre marathi

आंग्रे किंवा अंगरिया घराणं मुळचे पुणे जिल्ह्यातील मावळ प्रदेशातील काळोसे अंगारवाडी येथील रहिवासी आहेत. म्हणून त्यांचे नाव अंग्रे पडले होते. या घराण्याचा मूळ आडनाव सकपाळ किंवा शंखपाळ असे होते. कान्होजींच्या आजोबा शेखोजी कान्होजींच्या आजोबा शेकोजी संकपाळ हे शहाजीराजांच्या सेवेत होते.

प्रचंड पराक्रमी असे शेकोजी हे शहाजीराजांच्या उत्तर कोकण मोहिमेत अग्रेसर होते. त्यामुळेच १६४० सालच्या सुमारास शेखोजींना काही गावांची पाटील की बक्षीस म्हणून मिळाले होते. शेखोजींचे पुत्र तुकोजी आंग्रे हे ही प्रचंड पराक्रमी सरदार होते आणि ते शिवरायांच्या सेवेत होते छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराचा महत्त्व ओळखलं होतं.

ज्याचा आरमार त्याचा समुद्र, ज्याचा समुद्र, त्याचा व्यापार हे शिवरायांनी अचूक ओळखलं होतं. म्हणूनच महाराजांनी समुद्र किल्ल्यांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली होती. १६६० सालच्या सुमारास रत्नागिरीतील हरणे बंदरा जवळच्या महत्त्वपूर्ण सुवर्णदुर्ग समुद्री किल्ल्याचा ताबा सुद्धा घेतला होता.

सुवर्णदुर्ग त्यावेळी आदिलशहाच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी तो जिंकून घेतला होता. शिवाजी महाराजांनी या सुवर्ण दुर्ग किल्ल्याची जबाबदारी तुकोजी आंग्रे यांच्यावर सोपवली. त्यावेळी पहिल्यांदा तुकोची आंग्रे २५ जणांच्या मावळी तुकडीचे हवालदार होते. नंतर त्यांना बढती देऊन २०० ची जुमलेदारी मिळाली होती.

सुवर्णदुर्ग किल्ल्यामुळे तुकोजी आंग्रेंची हरणे गाव हीच आता कर्मभूमी बनली होती. हरणे गावातील लोक तुकोजी आंग्रेंवर जीवापाड प्रेम करत होते. तुकोजी आंग्रे असताना हरणे बंदराकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिम्मत नव्हती.

तुकोजींच्या पत्नीचे नाव अंबाबाई होते. तुकोजी आंग्रे आणि अंबाबाईंना १६६९ साली सुवर्णदुर्ग किल्ल्यातच पुत्ररत्न प्राप्त झाला, तेच कान्होजी आंग्रे. समुद्र किल्ल्यातच जन्मलेल्या कान्होजी आंग्रे यांना समुद्रावर फार अफाट प्रेम होतं. होडी म्हणजे कान्होजी आंग्रे यांची प्रेयसी होती. समुद्रावरचा शिवाजी ही कान्होजी मिळालेले उपमा सार्थ होते. समुद्रात एखाद्या देवमासा प्रमाणे फिरणारे कान्होजी अत्यंत musaddi आणि दूरदृष्टीचे होते, गरम usalatya रक्ताचे पराक्रमी आणि धाडसी होते.

कान्होजींच्या जडणघडणीत त्यांची आई यांचा मोलाचा वाटा होता. कान्होजी दहा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

१६८८ साली स्वराज्यात फितुरीला अक्षरशः ऊत आला होता. त्यामुळे सिद्दी कासम याने सुवर्णदुर्ग किल्ल्यावर कब्जा करायचे ठरवले होते. इंग्रज , पोर्तुगीज , फ्रेंच यांची सिद्धीला साथ होती. सिद्धी फार पूर्वी पासून मुघलच्या बाजूने होता. याच सिध्दीने अचलोजी मोहिते याला फितूर करण्यासाठी डावपेच आखले. सिध्दीने सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या बदल्यात फार मोठ्या वतनदारीचे आमिष दाखवले.

वतनदारीचा तुकडा समोर धरताच अचलोजीची बुद्दी भ्रष्ट झाली. पण चाणाक्ष कान्होजीना याची कुणकुण आधीच लागली होती. कोणत्याही परिस्तिथीमध्ये आपली जन्मभूमी आणि वडिलांची कर्मभूमी सिद्धांच्या ताब्यात जाऊ द्यायचा नाही , याचा निर्धार केला. कान्होजींनी स्वराज्याच्या एकनिष्ठ मावळ्यांचा गट तयार केला आणि त्या गटाचे नेतृत्व केले.

वय अवघे १९ वर्षे असताना या गटातील सर्वांनी कान्होजीना आपला नेता मानलं. जेव्हा सिद्दी कासमने अत्यंत जोमाने सुवर्णदुर्गावर आपला हल्ला चढवला होता. त्यावेळी शत्रूला अचलोजी मोहिते मदत करून किल्ल्यावर घेणार होता. पण कान्होजींनी अचलोजी मोहिते याला त्याच्या माणसांबरोबर अगोदरच कैद केले होते आणि किल्याची सर्व सूत्रे स्वतःच्याच ताब्यात घेतली होती. अश्याप्रकारे अवघ्या १९ वय वर्षे असलेल्या कान्होजींनी सिद्धी कासम , इंग्रज , पोर्तुगीज , डच यांचा फौजांचा दणदणीत पराभव केला. म्हणूनच सुवर्णदुर्गावर कायमचा भगवा फडकत राहिला.

कान्होजी आंग्रें दर्यासारंग

सिधोजी गुजर यांच्या निधनानंतर सरखेल हे पद वयाच्या २९ व्या वर्षी कान्होजी आंग्रें यांना मिळाले होते. छत्रपती राजाराम महाराजांनी सरखेल पदवी बरोबरच दर्यासारंग ही पदवी सुद्धा बहाल केली.

इसवी सन १६४० मध्ये शहाजीराजांनी उत्तर कोकणात चळवळ केलेल्या यशस्वी हल्ल्यात शहाजीराजांकडून लढणारे तुकोजी आंग्रे हे कान्होजींचे वडील होते. इसवी सन १६५९ मध्ये शिवाजीराजांनी सुवर्णदुर्गची किल्लेदारी तुकोजींना दिली होती.

सुवर्णदुर्ग वर वडिलांच्या हाताखाली वडिलांकडून कानोजी आरमारी शिक्षण घेत होते. नंतर ते कुलाब्याचे आरमार प्रमुख सिद्धोजी गुजर यांच्या हाताखाली काम करू लागले. नंतर नंतर कान्होजी स्वतः आरमार फिरवू लागली राजाराम राजांनी कान्होजींना आरमारात दुय्यम अधिकारी म्हणून नेमले. राजाराम राजांनी जिंजीत जाऊन तेथे प्रधानमंडळ नेमले. तेव्हा सिद्धूजींना राजाने जिंजीत बोलावले, तेव्हा सर्कल पदाची जबाबदारी कान्होजींवर सोपवली.

कान्होजी आंग्रें आरमाराचे मुख्याधिकारी

कान्होजींना मराठा आरमाराचे मुख्याधिकारी केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोकण किनारपट्टीवरची ठाणे आणि किल्ले कान्होजींनी मोगलांकडून जिंकून घेतली. महाराणी ताराबाईंनी कान्होजींच्या या पराक्रमावर खुश होऊन त्यांना अधिकारी आणि सेनासर खासखेल या पदव्या देऊन मुंबई ते सावंतवाडी हा समुद्रकिनारा कान्होजींच्या ताब्यात दिला.

पोर्तुगीज इंग्रज हे स्वतःला समुद्राचे स्वामी समजत होते. राजे समजत होते, पोर्तुगीज तर समुद्रात फिरणाऱ्या प्रत्येक जहाजांवर कर बसवून परवाने देत असत. ज्यांच्याकडे पोर्तुगीजांचे परवाने नसतील, त्या जहाजांना पोर्तुगीज खुशाल लुटत असत, पण ह्याच पोर्तुगीजांना सोबत इंग्रज सिद्धीला स्वतःचे परवाने घेऊन व्यापार करायला समुद्रात वापरायला भाग पाडून स्वतःचा धाक कान्होजींनी निर्माण केला होता.

विजयदुर्ग खांदेरी गुलाब्यावर तर कान्होजींच्या आरमाराशी लढताना इंग्रज पोर्तुगीत डच सिद्धी यांचे प्रचंड आरमार असतानाही हतबल झाले होते. परकीयांना त्यांची जहाजे कोकण किनारपट्टीच्या प्रदेशातून नेताना कान्होजींची दहशत वाटत होती.उत्तम जहाजे, उत्तम प्रतीचा दारूगोळा, उत्तम प्रतीच्या तोफा, तोफखान्यावरचे उत्तम गोलंदाज, उत्तम दर्यावर्ती , कोकण किनारपट्टीच्या भौगोलिक रचनेचे ज्ञान, निसर्गाचे भान, होकायंत्र आणि उत्तम प्रतीच्या दुर्बीण अशा सगळ्या गोष्टींनी सुसज्ज असे आरमार कोकण किनारपट्टीच्या भागात नेहमीच अग्रेसर राहिले होते.

कान्होजी शरीराने धष्टपुष्ट व दीपाळ होते. बळकट बांद्यामुळे कान्होजींना समोरची व्यक्ती वचकून असे. आचार ताकदीचे, शूर वृत्तीचे कान्होजी आपले सहकार्यांशी मात्र प्रेमळपणाने वागत . शांतपणाने निर्णय घेण्याची क्षमता कान्होजींकडे होती. कान्होजींचे हुकूम सक्तीचे असत. त्यांच्या हुकमांची अंमलबजावणी जशीच्या तशीच झाली पाहिजे, असा कान्होजींचा अट्टाहास होता.

कान्होजींना फितुरी आवडत नसे, तसा जर कोणी सापडला, तर त्याला जबर शिक्षा होत. असे प्रसंगी कडेलोटही केला जात असे. पण अशा आरोपींच्या कुटुंबीयांना कानोजी वाऱ्यावर सोडत नसत त्यांच्या अन्नपाण्याची सोय ते लावून देत असत. कान्होजींना तीन पत्नी होत्या, मथुराबाई ,लक्ष्मीबाई , गहिनाबाई कान्होजींना सहा मुले आणि एक मुलगी होती. सेकोजी , संभाजी, मानाजी, तुळाजी, एसजी , धोंडजी आणि लाडू बाई.

कान्होजी आंग्रें पुण्यतिथी / मृत्यू

इंग्रज, पोर्तुगीज, डच आणि सिद्धीच्या समुद्रातील आरमारी शक्तींना पायबंध आणि हालचालींना मर्यादा आणणाऱ्या दर्यावर कान्होजींचा चार जुलै १७२९ रोजी मृत्यू झाला. कान्होजींची समाधी रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे आहे.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला कान्होजी आंग्रे मराठी माहिती , kanhoji angre marathi , kanhoji angre speech in marathi , kanhoji angre hisotry information in marathi , kanhoji angre information in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment