लता मंगेशकर मराठी माहिती | lata mangeshkar information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये लता मंगेशकर बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही लता मंगेशकर मराठी माहिती , lata mangeshkar information in marathi , लता मंगेशकर यांची माहिती , lata mangeshkar mahiti , lata mangeshkar marathi mahiti याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

लता मंगेशकर मराठी माहिती | lata mangeshkar information in marathi

लता मंगेशकर मराठी माहिती | lata mangeshkar information in marathi

मध्यप्रदेशमधील इंदोर शहरामध्ये २८ सप्टेंबर १९२९ आली लतादीदींचा जन्म झाला. बालपणी त्यांचे पाळण्यातले नाव हृदया तसेच हेमा होते. पण नंतर लता या नावानेच त्या ओळखल्या जाऊ लागल्या. वडील पंडित दीनानाथ मंगेशकर शास्त्रीय गायक आणि रंगभूमीवरील प्रसिद्ध नट होते. सुरुवातीस संगीताचे बाळकडू आपल्या वडिलांकडूनच मिळणाऱ्या लताने वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली.

१९४२ लता तेरा वर्षांची असताना वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे कुटुंबातील आशा, मीना आणि हृदयनाथ या भावंडांची जबाबदारी तिने आपल्या खांद्यावर पेलली. मंगेशकर परिवाराचे आप्तमास्टर विनायक यांनी लतादीदींना खूप आधार दिला. आपल्या पहिली मंगळागौर १९४२ च्या चित्रपटात एक छोटी भूमिका केली. लताने त्यात अभिनय केला आणि गायिका म्हणूनही नावारूपाला आली.

१९४५ नवयुग कंपनीच्या कार्यालयाचे मुंबईमध्ये स्थलांतर झाले. तेव्हा दीदी मुंबईमध्ये कामाच्या शोधात पायी वणवण फिरत होत्या. त्याच काळात उस्ताद अमानतली खान यांच्याकडे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण त्यांनी चालू ठेवलं. त्या काळात हिंदी सिनेमा नूर जहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई अंबालेवाली यांच्यासारख्या प्रतिभावान आणि जड आवाजाच्या गायिका लोकप्रिय होत्या. यात लतादीदींचे वर्णी लागण मात्र कठीण होतं. अशातच संगीतकार गुलाम हैदर यांनी लतादीदींना योग्य मार्गदर्शन केलं. यांचा लतादीदींच्या गायकीवर इतका विश्वास होता की ते म्हणायचे लता चुकूनही बेसूर गात नाही.

दिलीपकुमार यांनी १९४८ मध्ये लतादीदींच्या उर्दू उच्चारांवर टीका केली. तेव्हा लतादीदींनी हार न मानता शफीय मौलवीकडून उर्दू उच्चारांचे धडे घेतले आणि लतादीदींच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. १९४९ च्या महल या चित्रपटाने यातलं लतादीदींचा “आयेगा आनेवाला” हे गीत इतके लोकप्रिय झालं की सगळे संगीतकार लतादीदींना चित्रपटाच्या नाईकेचा आवाज म्हणून पाहू लागले. १९५० च्या दशकात लतादीदींकडून अनेक संगीतकारांनी गाणी गाऊन घेतली. त्यापैकी अनिल विश्वास, शंकर जय किशन , सचिन देव बर्मन, सी. रामचंद्र, हेमंत कुमार, सलील चौधरी, खैय्याम , रोशन, मदन मोहन , कल्याणजी आनंदजी आणि उषा खन्ना ही मोठ्या संगीतकारांची नावे आहेत.

त्याचबरोबर मराठी संगीतकार सुधीर फडके आणि वसंत देसाई यांच्यासारख्या नामांकित संगीतकारांसाठी लतादीदींनी अनेक गाणे गाईले आहे. “आजा रे परदेसिया” या मधुमती चित्रपटातील गाण्यासाठी लतादीदींना सर्वप्रथम फिल्म फेर पुरस्कार मिळाला. शास्त्रीय संगीताची उत्तम जाण असणाऱ्या या गायिकेने १९५० च्या दशकात संगीतकार नौशादसाठी बैजू बावरा , मुगले आजम आणि कोहिनूर या चित्रपटांमध्ये अप्रतिम गाणी गायली.

शंकर जय किशन यांच्या जवळजवळ सर्व चित्रपटांच्या नायिकेचा आवाज लता दीदी यांचाच आहे. १९६० च्या दशकात निर्विवादपणे लतादीदी हिंदी सिनेमा सृष्टीच्या प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या. या काळातील अनेक गाणी अजरामर आहेत. हेमंत कुमार यांची रचना असलेल्या “बीस साल बाद” या चित्रपटातील “कही दीप जले कही दिल” या गाण्यासाठी लतादीदींनी दुसरं फिल्म पटकावलं.

भारत चीन युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली, म्हणून लतादीदींनी गायलेल्या ए मेरे वतन के लोगो या गाण्याने साक्षात पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यात अश्रू आणले. लक्ष्मीकांत प्यारेलाल म्हणतात जर लता पुरुषी आवाजात गात असती तर आमची सगळीच गाणी तीनच गाईली असती. संगीतकार मदन मोहन आणि लता यांची सांगड असलेली सगळीच गाणी अतिशय लोकप्रिय ठरलेली आहेत.

मधल्या काळात रॉयल्टी च्या विषयावरून लतादीदींनी मोहम्मद रफी यांच्यासोबत गाणंही बंद केलं होतं. लतादीदींचे म्हणणं होतं की निर्मात्यांसोबत गाण्याची रॉयल्टी गायकांनाही मिळायला हवी, पण याबाबतीत लतादीदींना इतर गायकांनी पुरेसं समर्थन दिले नाही. हिंदी सिनेमा सृष्टीतला हा आघाडीचा आवाज मराठी संगीतातही पार्श्वगायिका म्हणून नावारूपाला आलेला होता.

१९६० च्या दशकामध्ये भालजी पेंढारकर एक मराठी संगीतकार शोधत होते. तेव्हा लतादीदींनी स्वतः संगीत देण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यांच्या नावाची लोकप्रियता लक्षात घेता भालजी पेंढारकर म्हणाले की, जर संगीताचा प्रयत्न फसला तर तुझ्या लोकप्रियतेत फरक पडेल. तेव्हा लतादीदींनी स्वतःच नाव न घेता “आनंदघन” या नावाने संगीत दिले. “आनंदघन” या नावाने संगीत दिलेले काही चित्रपट राम राम पाहुणे , मराठीतुका मेळावा, मोहित्यांची मंजुळा , साधी माणसं आणि तांबडी माती अश्या अनेक मराठी चित्रपटांना संगीत देणाऱ्या लतादीदींना साधी माणसं या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला.

मराठी संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे आणि सुधीर फडके तसेच हिंदीतील संगीतकार मदन मोहन, आरडी बर्मन यांच्यापासून थेट जतिन ललित आणि ऑस्कर विजेता ए. आर. रहमान पर्यंत सगळ्यांसाठी लतादीदींनी अनेक गाणे गायलेली आहेत. लतादीदींना भारताची गानकोकिळा म्हणून ओळखले जाते.

भारताची शान असणाऱ्या या लतादीदींनी मुकेश , मन्नाडे , मोहम्मद रफी, किशोर कुमार , हेमंत कुमार यांसारख्या अनेक पार्श्वगायकांसोबत गाणी गायली आहेत. भारतातील २० हून अधिक प्रादेशिक भाषांमध्ये २५ हजार पेक्षा जास्त गाणी गाणाऱ्या लतादीदींचे नाव गिनीज बुकात नोंद केले आहे.

लतादीदींचे कौतूक जगातील अनेक नामांकित व्यक्तींनी केलेला आहे. त्यातले काहीजण म्हणतात लता म्हणजे आठवण साक्षात सरस्वती त्यांच्या गळ्यात विराजमान आहे. अनेक फिल्मफेर पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या लतादीदींना पद्मभूषण , पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कारासारख्या नामांकित पुरस्कारांनी गौरवलेला आहे.

भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न लाभलेल्या लतादीदींचा सगळ्यात संगीत प्रेमींना अभिमान वाटतो. लतादीदींचा भारतात जन्म झाला, या गोष्टीचा भारत यांना सार्थ अभिमान आहे.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला लता मंगेशकर मराठी माहिती , lata mangeshkar information in marathi , लता मंगेशकर यांची माहिती , lata mangeshkar mahiti , lata mangeshkar marathi mahiti हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment