आमची मुंबई निबंध मराठी मध्ये | my mumbai essay in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये मुंबईचे निबंधात्मक वर्णन केले आहे. ही माहिती तुम्ही आमची मुंबई निबंध मराठी मध्ये , my mumbai essay in marathi,  माझे आवडते शहर मुंबई मधील निबंध,  my favourite city mumbai essay in marathi,  माझे आवडते शहर मुंबई मधील निबंध,   my favourite city mumbai essay in marathi ,  majhi mumbai essay in marathi ,  आमची मुंबईवर मराठी निबंध, marathi essay on aamchi mumbai  याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

आमची मुंबई निबंध मराठी मध्ये , My Mumbai essay in Marathi

मुंबई हे भारतातील गजबजलेला शहर म्हणून ओळखले जात. मुंबईला काहीजण मुंबापुरी किंवा मायानगरी असे ही म्हणतात. मुंबई हे सात बेटांवर वसलेले शहर आहे. मुंबईचे हवामान उष्ण व दमट असते. मुंबई मध्ये पावसाचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईमध्ये मासेमारी सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. 

मुंबईचा बहुतांश भाग हा किनारपट्टी भागात येत असल्यामुळे येथे जलवाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणात चालते. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी सुद्धा म्हटले जाते. ब्रिटिश काळामध्ये मुंबईला बॉम्बे असे नाव देण्यात आले होते. मुंबई शहर व उपनगर जिल्हा हा कोकण विभागात मोडतो. 

औद्योगिक वसाहत व शहरीकरणामुळे मुंबईतील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुद्धा करण्यात आली आहे. अनेक प्रभागातून तसेच छोट्या खानी रस्त्यांमधून मुंबईला बृहन्मुंबई बेस्ट (Brihanmumbai Electricity Supply and Transport ) बस सेवा पुरवते. त्याचप्रमाणे मुंबईच्या काही भागामध्ये विद्युत पुरवठा सुद्धा बेस्ट करून केला जातो. बृहन्मुंबई महानगरपालिका या नावाने मुंबईचे महानगरपालिका ओळखली जाते. या महानगरपालिकेचे प्रथम नागरिक महापौर आहेत.

मुंबई मध्ये प्रत्येक वार्ड मागे किंवा प्रभागा मागे एक नगरसेवक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो. या नगरसेवकांचे काम मुंबईतील स्थानिक लोकांचे पाण्याचे, वैद्यकीय किंवा दैनंदिन प्रश्न सोडवणे हे असते.

मुंबई मधील प्रभाग यादी (Mumbai Word list in marathi)

या महानगरपालिकेचे अनेक प्रभागात किंवा वार्ड मध्ये छोटे छोटे भाग पडतात. हे वार्ड /प्रभाग खालीलप्रमाणे आहेत.

  1. भूकटिसंबध क्रमांक 1
  • प्रभाग A
    फोर्ट, बल्लार्ड इस्टेटचा भाग, शाहिद भगतसिंग रोड, पी डीमेलो रोड, मरीन ड्राईव्ह (क्वीन्स हार), एपी मार्ग, कर्नाक रोड (लोकमान्य टिळक मार्ग) आणि कुलाबा
  • प्रभाग B
    या मध्ये पी डीमेलो रोड, आयआर रोड, अब्दुल रहमान स्ट्रीट, आरबी मार्ग, एमए रोड, जेएमआर मार्ग आणि कर्नाक रोड (लोकमान्य टिळक मार्ग) हे प्रभाग आहेत.
  • प्रभाग C
    चंदनवाडी, आयआर रोड, अब्दुल रहमान स्ट्रीट, नेताजी सुभाष रोड, मौलाना शौकतली रोड, त्र्यंबक परशुराम सेंट,
  • अर्देशिर डॅडी जयकर सेंट, विठ्ठलभाई पटेल रोड, बाबासाहेब जे मार्ग, लोकमान्य टिळक मार्ग, वासुदेव बलवंत फडके चौक,
  • आनंदीलाल पोद्दार मार्ग आणि मरीन ड्राइव्ह.
  • प्रभाग D
    ग्रँट रोड, डॉ. डीबीमार्ग, व्हीपी रोड, अर्देशिर दाडी स्ट्रीट, त्र्यंबक परशुराम स्ट्रीट, सुखियाजी स्ट्रीट, नेताजी सुभाष रोड,
    डीएन पुरंदरे मार्ग, वाळकेश्वर रोड, बी. लिंद्रजित रोड, ब्रीच कँडी अप हाजी अली, बोमन बेहराम मार्ग, ऑर्थर रोड, तारदेव रोड, कुंबल्ला आणि मलबार हिल्स, केशवराव खाडे मार्ग, बी. जयकर मार्ग भुलेश्वर नाका पर्यंत, सीशोर पर्यंत एमके रोड क्रॉसिंग.
  • प्रभाग E
    भायखळा, रे रोडचा भाग, पश्चिम साने गुरुजी मार्ग, जहांगीर बोमन बेहराम मार्ग, सुखलाजी स्ट्रीट, दत्ताराम लाड मार्ग, दक्षिण रामचंद्र भट्ट मार्ग, वाडी बंदर आणि मौलाना शौकतई रोड.
  • प्रभाग F उत्तर
    हा प्रभाग रे माटुंगा, ठाणे खाडीचे भाग आणि मानकीकर रोड
  • प्रभाग F दक्षिण
    परळ
  • प्रभाग G उत्तर
    दादर
  • प्रभाग G दक्षिण
    ना.म. जोशी मार्ग , वरळी
  • प्रभाग H पूर्व
    वांद्रे, खार, सांताक्रूझचे पूर्व भाग, सीएसटी रोडचे काही भाग, विलेपार्ले, माहीम आणि धारावी.
  • प्रभाग H पश्चिम
    वांद्रे, खार आणि सांताक्रूझचे काही भाग
  • प्रभाग K पूर्व
    अंधेरी (पूर्व) विलेपार्ले (पूर्व) जोगेश्वरी (पूर्व)
  • प्रभाग K पश्चिम
    अंधेरी (पश्चिम) आणि ओशिवारा.
  • प्रभाग P उत्तर
    मालाड
  • प्रभाग P दक्षिण
    गोरेगाव, मालाड आणि ओशिवारा भाग.
  • प्रभाग R मध्य
    संजय गांधी नॅशनल पार्क (नॅशनल पार्क), गोराई, कुलवेम व्हिलेज (देवीदास लेन) एनडी झोन ​​ते देविदास लेन ते एनसी फडके
    फ्लाय ओव्हर ब्रिज आणि दौलत नगर, स्मशानभूमी रुव्हियर ते नॅन्सी कॉलनी 44′-0 रुंद रोड, चोगले नगर, बोरिवली (पू).
    खटाव इस्टेट, भोर इंडस्ट्रीज 90′-0 वाइड डी.पी. रस्ता, रेल्वे भुयारी मार्ग पोझीर डेपो, 90′-0 बोरसापाडा रोड
    महावीर नगर आरडीपी -4, चारकोप ते खाडीपर्यंत.
  • प्रभाग R उत्तर
    दहिसर
  • प्रभाग R दक्षिण
    कांदिवली या प्रभागांतर्गत ठाकूर संकुल, ठाकूर गाव, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, एमजी रोड कांदिवली (पश्चिम), पटेल नगर, मथुरादास रोड इ.
  • प्रभाग L
    कुर्ला, चांदिवली, साकी नाका, तुंगवा, पवईचा काही भाग.
  • प्रभाग M पूर्व
    गोवंडी व चेंबूरचा काही भाग या प्रभागांतर्गत येतो. (पिन कोड – 400088, 400043 आणि अर्धा क्षेत्र 400074)
  • प्रभाग M पश्चिम
    जी.एम. रोड ते सुमन नगर जंक्शन आणि माहुल ते सोमैया नाला (पिन कोड – 400089, 400071 आणि अर्धा क्षेत्र 400074)
  • प्रभाग N
    घाटकोपर
  • प्रभाग S
    भांडुप
  • प्रभाग T
    मुलुंड

मुंबई मध्ये एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको इमारतींचे शहराचे विशिष्ट भाग
या ३ जागा जागतिक वारसा ( UNESCO World Heritage Sites) म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये क्रॉफर्ड मार्केट, नळ बाजार , बैल बाजार, मनिष मार्केट असे अनेक प्रकारचे बाजार भरवले जातात जिथे विशिष्ट गोष्टी माफक दरामध्ये मिळतात.

पूर्वीच्या काळी मुंबईमध्ये प्रामुख्याने गिरगाव लालबाग परळ चिंचपोकळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापड गिरण्या होत्या. पण गिरणी कामगारांच्या अनिश्चित संपामुळे व मागण्यांमुळे त्या संपुष्टात आल्या. अब्जाधीश लोक राहत असलेल्या शहरांच्या यादी मध्ये मुंबईचा आठवा क्रमांक लागतो. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६.१६ टक्के वाटा एकट्या मुंबईचा आहे.

मुंबईची सात बेटे (Seven Islands of Bombay)

साधारणतः इ. स. १६७० ते ७७ दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नर (जेराल्ड आंजिअर ) ने या सात बेटांवरील खड्डे बुजवून बुजवण्याचे काम हाती घेतले. ज्याचे रूपांतर आताच्या कुलाबा पासून मुलुंड तसेच दहिसर पर्यंत पसरिलेल्या अखंड मुंबई मध्ये झाले.
मुंबईची निर्मिती खालीलप्रमाणे सात बेटापासून झालेली आहे.

माहीम (Mahim)
वरळी (Warli)
परेल (Parel)
कुलाबा (Colaba)
लहान कुलाबा (Little Colaba)
माझगांव (Mazgaon)

मुंबईची भौगोलिक स्तिथी (Geographical location of Mumbai)

मुंबईची लोकसंख्या २ कोटी आहे. तसेच मुंबईला ३०-३५ किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे. पूर्वीपासूनच बेटांचे शहर असल्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सागरी वाहतूक केली जात असे. अनेक नामांकित कंपन्यांची कार्यालये सध्या मुंबईमध्ये आहेत. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी सुध्दा मुंबईत आहे.

मुंबईचे मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन भागात विभाजन झाले आहे. रेल्वेचा नकाशा नुसार मुंबई चे पूर्व पश्चिम व हार्बर अशा तीन विभागात विभाजन झाले आहे. रेल्वेच्या जोडीला मुंबईमध्ये मेट्रोचा प्रकल्प सुद्धा राबवण्यात आला आहे. या प्रकल्पाचे चार ते पाच टप्प्यांमध्ये नियोजन करण्यात आले आहे. या मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास अतिशय सुखकर व जलद होणार आहे.

मुंबईचा महत्त्वाचा खाद्यपदार्थ म्हणजे मुंबईचा वडापाव. हा मुंबईचा वडापाव तुम्हाला मुंबईत कुठेही सहज मिळू शकतो. त्याचप्रमाणे मुंबईचे भेल पुरी , पाणीपुरी सुद्धा प्रसिद्ध आहेत.

मुंबईमध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असे सर्व धर्माचे लोक एकोप्याने राहतात. म्हणूनच दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, होळी, ईद, क्रिसमस असे सर्व धर्मांचे सण मुंबईमध्ये साजरे केले जातात. मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सद्भभावाने गणेश मूर्तीची स्थापना करुन मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढून मूर्तीचे विसर्जन करतात. नवरात्र मध्ये सुद्धा देवीच्या मूर्तीची स्थापना करून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. जगप्रसिद्ध अश्या लालबागच्या राज्याची स्थापना सुद्धा मुंबईत लालबाग येथे केली जाते.

मुंबईला प्रगल्भ समुद्रकिनारा लाभलेला असल्यामुळे त्याच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. दर वर्षी मुंबईतील लाखो करोडो लोकांची तहान वैतरणा तलाव , तानसा धरण, भातसा धरण, विहार तलाव , पवई तलाव , तुलसी तलाव या नद्या / तलाव भागवतात. मुंबईतील नोकरीच्या व उद्योगधंद्यातील संधी पाहता अनेक राज्यातून येणाऱ्या लोकांच्या लोंढयांचा प्रश्न गंभीर बनत चालला.

मुंबई महाराष्ट्रात येत असल्यामुळे मुंबईची प्रादेशिक भाषा मराठी आहे. मुंबईचे जीवनमान हे जलद व धकाधकीचे असते. येथे कोणालाच वेळ नसतो. अलीकडच्या काळात मुंबईमध्ये अनेक गगनचुंबी इमारती उभारण्यात आल्या आहेत. रेल्वेला मुंबईची जीवन वाहिनी असे संबोधले जाते. कारण याच रेल्वेने जवळपास पंधरा ते वीस लाख मुंबईकर दररोज प्रवास करतात. शहरीकरणामुळे मुंबईच्या लोकसंख्येचा प्रश्न फार गंभीर होत चालला आहे. दरवर्षी हजारो ते लाखो लोक इतर राज्यातून तसेच खेड्यापाड्यातून मुंबईमध्ये नोकरीच्या शोधात येतात.

प्रत्येक माणसाची इच्छा असते की माझं स्वतः मुंबईत एक छोटासा का होईना घर असावा. पण घरांच्या किमती पाहता प्रत्येकाची अशी इच्छा पूर्ण होणे थोडेसे कठीण होऊन बसले आहे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय लोक राहतात.

आपली प्रसिद्ध बॉलीवुड इंडस्ट्री सुद्धा मुंबई मध्येच आहे.

त्यामुळे दरवर्षी चित्रपटसृष्टीमध्ये आपला नाव कमावण्यासाठी अनेक कलाकार मुंबईमध्ये येतात. आपल्या संघर्षाच्या काळात याच मुंबईच्या फुटपाथवर राहून अनेक बड्या कलाकारांनी आपल्या कलेच्या जोरावर अनेक यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत.

मुंबई मधील प्रेक्षणीय स्थळे ( places to visit in mumbai )

  • संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
  • छोटा कश्मीर
  • जुहु चौपाटी
  • गिरगाव चौपाटी
  • दादर चौपाटी
  • गेट वे ऑफ इंडिया
  • सिद्धिविनायक मंदिर
  • महालक्ष्मी मंदिर
  • नेहरू तारांगण
  • मत्स्यालय

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला आमची मुंबई निबंध मराठी मध्ये , my mumbai essay in marathi,  माझे आवडते शहर मुंबई मधील निबंध,  my favourite city mumbai essay in marathi,  माझे आवडते शहर मुंबई मधील निबंध, my favourite city mumbai essay in marathi ,  majhi mumbai essay in marathi ,  आमची मुंबईवर मराठी निबंध,  marathi essay on aamchi mumbai  हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

2 thoughts on “आमची मुंबई निबंध मराठी मध्ये | my mumbai essay in marathi”

Leave a Comment