होळी सणाची माहिती मराठीत | information about holi in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये होळी सणाची माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही होळी सणाची माहिती मराठीमध्ये (holi information in marathi), (information about holi in marathi), होळी सणाची माहिती मराठी निबंध (essay होळी सणाची माहिती मराठी), होळी सणाची माहिती मराठीत, (holi nibandh marathi) होळी निबंध मराठी, (holi essay in marathi) मराठी मध्ये होळी वर निबंध, माझा आवडता सण होळी (maza avadata san holi), होळी सणाची माहिती मराठी (holi sanachi mahiti marathi) याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

 होळी सणाची माहिती मराठीत | information about holi in marathi

प्राचीन काळापासून होळी सण भारतमध्ये मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. होळी हा भारत मध्ये साजरा होणार रंगाचा सण म्हणून ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये ह्या सणाला फार महत्तव आहे. मराठी महिन्यातील शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन आणि ह्याच महिन्यातील पौर्णिमेला येणारा म्हणजे सण होळी. भारत जसा विविध परंपरेने आणि पद्धतीने नटला आहे त्याचप्रमाणे होळी सण साजरा करायची परंपरा आणि पद्धत हि तेवढीच खास आणि आकर्षक.

म्हणूच कदाचित ह्या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिका दहन, होलिकोत्सव, शिमगा ,धुलीवंदन रंगपंचमी विविध नावाने संबोधले जाते.

होळी च्या पहिल्या दिवशी दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी केली जाते. ज्याला धूलिवंदन किंवा धुळवड असे संबोधले जाते.

होळी हा सण कोकणामध्ये फार उत्साहाने साजरा केला जातो. कोकणामध्ये होळी ला शिमगा असे म्हटले जाते. शहरात नोकरी किंवा धंद्यानिमित्त वसलेले चाकरमानी याच शिमग्यासाठी मोठ्या उत्साहाने आपापल्या गावी परततात. होळी बांधताना मुख्यभागी उभ्या असणाऱ्या खोडाला माड असे म्हणतात. या माडाची पूजा केली जाते आणि मग त्याची होळीच्या मध्यभागी उभारणी केली जाते.

चांगल्या प्रवूतीचा वाईट विचारावर/प्रवूतीवर विजय हा ह्या सणांमागील उद्देश आणि संदेश आहे.

सुखलेल्या झाडांची लाकडे गोळा करून ती एकमेकांवर गोलाकार रचली जातात आणि मग ती पेटवली जाते. होळी भवती गोल चक्कर मारत सगळे गाणी म्हणत नाचतात. असे सांगतात कि होळीच्या ह्या आगी मध्ये सर्व वाईट गोष्टीनचा अंत होतो. होळीची मनोभावे पूजा करून नैवेद्य दाखवला जातो.

महाराष्ट्रात, होळी शिमगा किंवा रंग पंचमी (पाचव्या रंग) म्हणून देखील ओळखली जाते. या उत्सवांमध्ये सर्व होलिका दहन या सामान्य परंपराचा समावेश आहे. दुसर्‍या दिवशी एकमेकांना गुलाल अथवा विविध रंग लावून आणि पाण्याने रंगपंचमी खेळली जाते..

रंगाची उधळण करून हा सण साजरा केला जातो. नाच, गाणी आणि रंग खेळून सगळीकडे धुळवड साजरी केली जाते.

होलिका दहन यावरून या सणाला होळी हे नाव पडले असावे. या सणाबाबत इतिहासात अनेक कथा प्रसिद्ध आहेत .मात्र विशेष म्हणजे लहान मुलांना पीडा /त्रास देणाऱ्या होलिका, ढुंढा आणि पुतना या राक्षसींचे दहन ही यामागे सांगितली जाणारी प्रसिद्ध कथा आहे.

होळीची कहाणी / होळी का साजरी करतात?

प्राचीनकाळी हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस होता. त्याने भगवान शंकरांना प्रसन्न करून वर मागितला कि मला जमिनीवर , पाताळामध्ये किंवा आकाशामध्ये कोणताही देव किंवा दानव मारू शकणार नाही. त्यामुळे तो स्वतःला देवापेक्षा श्रेष्ठ व बलवान समजू लागला. अशाप्रकारे हिरण्यकश्यपू गर्विष्ठ झाला आणि अहंकार बाळगू लागला. 

हिरण्यकश्यपूला एक मुलगा होता ज्याचे नाव प्रल्हाद असे होते. प्रल्हाद विष्णूंचा फार होता भक्त होता. तो सतत भगवान विष्णूंच्या नावाचा जप करीत असे. सतत विष्णूंचा जप केलेले हिरण्यकश्यपूला आवडत नसे म्हणून त्याने आपल्या मुलाला म्हणजेच “भक्त प्रल्हादाला” मारण्यासाठी आपल्या रक्षिसी बहिणीला सांगितले, जिचे नाव होलिका होते. अग्निमध्ये भस्म न होण्याचे वरदान होलिकेला मिळाले होते. म्हणून ती प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हादाच्या अपार भक्तीने भगवान विष्णूंनी त्याचे प्राण वाचवले पण होलिका जाळून भस्मसात झाली. ज्यामुळे दरवर्षी या सणाला होलिका दहन केले जाते. या मागे वाईट गोष्टीवर मात करत चांगल्या मार्गाचा अवलंब  करणे हा हेतू आहे.

होळी निम्मित भारतमध्ये विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तेथे अनेक नट, कलाकार, नेते मंडळी यांना निमंत्रित केले जाते. भारतात विविध ठिकाणी निरनिराळे खाद्यपदार्थ करण्याची पंरपंरा आहे. होळीचा सण पुरणपोळी चा आस्वाद घेतल्याशिवाय अपूर्णच आहे.

पुरणपोळी हा पारंपरिक गोड पदार्थ असुन तो आवर्जून घरोघरी केला जातो. गरमागरम पोळी तूप, दुध आणि कटाच्या आमटीसोबत अगदी मस्त लागते.

होळी हा सण एकमेकांना मध्ये एकता निर्माण करतो, प्रेम, आनंद व उत्साह वाढवतो. हा सण लहान मोठे, भाऊ बहीण, शेजारी-पाजारी सर्वांना सोबत राहून एक दुसऱ्याचे सहकार्य करण्याची शिकवण देतो. आज-काल होळी खेळताना बरेच लोक केमिकलयुक्त रंगांचा वापर करताना दिसतात, हे रंग आपल्या शरीराची त्वचा व डोळ्यांना घातक ठरतात. म्हणून होळी खेळताना कोरड्या गुलाल चा वापर करायला हवा. गुलाल चे कोणतेही नकारात्मक प्रभाव शरीरावर होत नाही. 

आपण जास्तीतजास्त नैसर्गिक रित्या तयार केलेले तसेच पर्यावरण पुरात अश्या रंगांचं वापर केला पाहिजे. अनेक ठिकाणी फुग्यांचा वापर केला जातो आणि ते फुगे एकमेकांना मारले जातात, हे टाळले पाहिजे.

कोणाशीही जोर जबरदस्ती व भांडण न करता प्रेमाने सर्वानी अतिशय प्रेमाने आणि एकत्र येऊन होळी खेळायला हवी.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला होळी सणाची माहिती मराठीमध्ये (holi information in marathi), (information about holi in marathi), होळी सणाची माहिती मराठी निबंध (essay होळी सणाची माहिती मराठी), होळी सणाची माहिती मराठीत, (holi nibandh marathi) होळी निबंध मराठी, (holi essay in marathi) मराठी मध्ये होळी वर निबंध, माझा आवडता सण होळी (maza avadata san holi), होळी सणाची माहिती मराठी (holi sanachi mahiti marathi) हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment