संगणक वर मराठी निबंध | essay on computer in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये संगणकाविषयी माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही संगणक वर मराठी निबंध , essay on computer in marathi , Computer essay in Marathi, संगणक आपला मित्र निबंध मराठी , संगणक निबंध मराठी याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

 संगणक वर मराठी निबंध | essay on computer in marathi

आजच्या या एकविसाव्या शतकात अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे च संगणक आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनला आहे. या डिजिटल युगासाठी संगणक हा एक वरदानच ठरला आहे. संगणक हे असे उपकरण आहे जो दिलेल्या आज्ञांचे अचूकपणे पालन करतो. आधुनिक संगणक ज्या आज्ञांचे पालन करतो त्याला आज्ञावली (कॉम्प्युटर प्रोग्राम) असे म्हणतात. या आज्ञावली संगणकाच्या अनेक कामांसाठी उपयोगी आणल्या जातात. 

संगणक हा मूळतः मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, सीपीयू अशा अनेक भागांनी बनलेला असतो. तसेच स्पीकर प्रिंटर स्कॅनर हेडफोन हे उपकरण सुद्धा संगणकाला जोडलेली असतात. जसे माणूस दुसऱ्या माणसाबरोबर संवाद साधण्यासाठी भाषेचा उपयोग करतो.
त्याचप्रमाणे संगणकाला फक्त दुहेरी (binary) भाषा कळते. ही दुहेरी भाषा शून्य आणि एक (०१०१) यांना मिळून बनलेले असते.

जेव्हा एकापेक्षा जास्त संगणक एकमेकांशी जोडले जातात त्याला संगणकाचे जाळे (computer network) असे म्हणतात. अशा प्रकारे जेव्हा देशातील, जगातील, शहरातील संगणक एकमेकांशी जोडले जातात त्याला इंटरनेट असे म्हणतात. संगणकामधील ज्या भागाला पण स्पर्श करू शकतो त्याला हार्डवेअर असे म्हणतात. संगणकामधील जो भाग आज्ञावली द्वारे चालतो त्याला सॉफ्टवेअर असे म्हणतात. संगणकाच्या या आज जाळ्यामुळे आपण जगातील कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधू शकतो.

संगणक वर मराठी निबंध , essay on computer in marathi , Computer essay in Marathi, संगणक आपला मित्र निबंध मराठी , संगणक निबंध मराठी

संगणकाच्या जाळ्यांचे खालीलपैकी प्रकार पडतात.

संगणकाचे जाळ्यांचे प्रकार ( Types of computer networks in marathi ) 

लोकल एरिया नेटवर्क Lan 

हे संगणकाचे जाळे छोट्या अंतरापर्यंत सीमित असते. याचा उपयोग छोट्या शाळा महाविद्यालय खाजगी कंपनी किंवा संस्थेमध्ये जास्त प्रमाणात केला जातो. याचे अंतर जवळ जवळ 15 ते 20 मीटरपर्यंत असते.

वाईड एरिया नेटवर्क Wan

वाईड एरिया नेटवर्क एकमेकांना लिज लाईन ने जोडलेले असतात. लिज लाईनच्या दोन्ही बाजूंना राउटर जोडलेला असतो आणि हा राउटर लोकल एरिया नेटवर्क ( lan ) शी जोडलेला असतो. पण लिज लाईन अतिशय महाग असल्यामुळे इतर तंत्रज्ञान वापरून सुद्धा ( wan ) ची जोडणी केलेली असते.

मेट्रोपोलिटिअन एरिया नेटवर्क Man

हे संगणकाचे जाळे मोठ्या महानगरांना जोडून ठेवते. यामध्ये अनेक मोठी शहरे मोठ्या इमारती यांचा अंतर्भाव केला जातो. म्हणजेच या नेटवर्क मध्ये असणाऱ्या दोन संगणकामधील अंतर तीन ते चार हजार किलोमीटर पर्यंत असते.

वर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क (व्ही पी एन) VPN

हे संगणकाचे अंतर्गत जाळे असते. नावाप्रमाणेच हे खाजगी नेटवर्क असते. यामध्ये बाहेरील संगणकांना व्यक्तींना जोडण्याची परवानगी नसते. याचा उपयोग नामांकित खासगी कंपन्या, बँक, आंतरराष्ट्रीय शाळा मोठ्या प्रमाणात करतात.

संगणकाचे भाग ( parts of computer in marathi )

संगणकाच्या भागाला अनुसरून त्याच्या भागांचे खालीलपैकी दोन प्रकार पडतात.

इनपुट डिव्हाईसेस

या प्रकारच्या उपकरणांमध्ये आपणास संगणकाला आज्ञा द्यायची असते.

या प्रकारच्या उपकरणांमध्ये आपणास संगणकाला आज्ञा द्यायची असते.

आउटपुट डिव्हाइसेस

या प्रकारच्या उपकरणांमध्ये आपल्याला संगणकाकडून अनेक स्वरूपामध्ये माहिती मिळते.

मॉनिटर

मॉनिटर चे काम संगणकाला दिलेल्या आज्ञांचे पालन करून त्याचे चित्रीकरण करणे असे असते.  पडद्या नुसार याचे 15 इंच 17 इंच 21 इंच 32 इंच (Screen) अशा आकारामध्ये वर्गीकरण केले जाते. याचा वापर आपण चित्रपट, दृश्य , छायांकन बघण्यासाठी किंवा करण्यासाठी करू शकतो.

माऊस

संगणकाला नियंत्रित करण्यासाठी मऊस हे अतिशय महत्त्वाचे उपकरण आहे. याला दोन ते तीन बटणे असतात. त्याच्या साहाय्याने आपण संगणकाच्या पृष्ठभागावर कुठे ही क्लिक करू शकतो. संगणकाच्या पृष्ठभागावर हा एक बिंदू किंवा पॉईंट दर्शवतो.

कीबोर्ड  कळफलक

या उपकरणाचा वापर संगणकाला टाईप करून आज्ञा देण्यासाठी होतो. या उपकरणांमध्ये शंभर ते दीडशे पर्यंत कळफलक असतात.

प्रिंटर

संगणकामधील डिजिटल स्वरूपातील माहिती जर आपल्याला लेखी स्वरूपामध्ये हवी असेल तर आपण या उपकरणाचा उपयोग करू शकतो. बाजारामध्ये अनेक प्रकारचे प्रिंटर उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ लेझर प्रिंटर , इंकजेत प्रिंटर, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, 3d प्रिंटर.

हार्ड डिस्क

या उपकरणांमध्ये संगणकाच्या सर्व माहितीची कायम स्वरूपात संग्रहित केलेली असते. याचे मोजमापन  केबी (kilobytes) एमबी (megabytes)  जीबी(gigabytes) टीबी(terabytes) पिबी (pentabytes) यामध्ये करतात. तसेच यूएसबी usb, साटा SATA अशा जोडणीच्या प्रकारात सुद्धा आढळून येतात.

सीपीयू

याला सेंटर प्रोसेसिंग युनिट किंवा प्रोसेसर असे म्हणतात. हा संगणकाचा कणा असतो. माणसाच्या मेंदू प्रमाणेच हा संगणकाच्या इतर भागांना आज्ञा देण्याचे काम करतो. त्याचे मोजमापन फ्रिक्वेन्सी मध्ये केले जाते. उदाहरणार्थ २ मेगाहर्ड्स, १.५ मेगाहर्ड्स,. 

संगणकाचे महत्व (Importance of computer in marathi)

सध्याच्या युगामध्ये संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे , ते जर नसेल तर तुम्हाला नोकरी सुद्धा मिळणार नाही.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये संगणकाचे महत्व मोलाचे आहे. उदाहरणार्थ भ्रमणध्वनी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्याच्याशिवाय आपला एक दिवस सुद्धा जाणार नाही.

संगणकाचा उपयोग (uses of computer in marathi)

  • मोठी गणितीय आकडेमोड करण्यासाठी.
  • रेल्वे बस विमान हॉटेल सिनेमा यांच्या तिकीट बुकिंग साठी.
  • जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून व्यक्तिशी संवाद साधण्यासाठी.
  • खगोलशास्त्र, रसायनशास्त्र यामध्ये संशोधन करण्यासाठी.
  • कार्यालयीन कामासाठी उदाहरणार्थ पत्र, निवेदन.
  • ध्वनीचित्रफिती तून नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी.
  • अनेक रोगांचे निदान करण्यासाठी.
  • तसेच इस्पितळांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी.
  • अनेक औद्योगिक किंवा ग्राहक उत्पादने नियंत्रित करण्यासाठी संगणक वापरले जातात.
  • मनोरंजन क्षेत्रामध्ये चित्रपट, हास्यपट, अनिमेशन बनवण्यासाठी तसेच त्यामध्ये बदल करण्यासाठी.

संगणकाचे फायदे ( advantages of computer in marathi )

  • संगणक कोणतेही काम अतिशय वेगात करतो त्यामुळे वेळेची बचत झालेली आहे.
  • अनेक कामगारांचे काम एकदा संगणक करू शकतो म्हणून कामगारांचा खर्च वाचला आहे.
  • आपल्या कामाची क्षमता वाढवण्यासाठी.
  • अपंगांची मदत करण्यासाठी.
  • कोणतेही काम स्वयंचलित करण्यासाठी किंवा त्याचे निरीक्षण करण्यासाठी.
  • संगणकाच्या जाळ्याशी जोडून ठेवण्यासाठी.
  • क्षणार्धात संदेश पोचवण्यासाठी. 

संगणकाचे तोटे ( disadvantages of computer in marathi )

  • डोळ्यांना होणारा त्रास
  • पाठीला होणारा त्रास
  • व्यसन लागणे
  • फसवणुकीचे अनेक प्रकार घडले
  • महागड्या संगणकाचा देखभालीसाठी लागणारा खर्च जास्त आहे.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला संगणक वर मराठी निबंध , essay on computer in marathi , Computer essay in Marathi, संगणक आपला मित्र निबंध मराठी , संगणक निबंध मराठी हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment