माझी बहीण मराठी निबंध | my sister essay in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये माझी बहीण ( my sister essay in marathi ) हा मराठी निबंध लिहिला आहे. ही माहिती तुम्ही my sister essay in marathi , माझी बहीण मराठी निबंध , my sister essay in marathi, essay on my big sister in marathi, essay on sister in marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

माझी बहीण मराठी निबंध | my sister essay in marathi

माझ्या मोठया बहिणीचा नाव मनीषा आहे. तिचा जन्म सिंधुदुर्ग जिल्यातील एका छोटाश्या गावी म्हणजेच आमच्या आजोळी झाला. जन्माच्या वेळी तिची प्रकृती जरा गंभीर होती. पण डॉक्टरांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे काही दिवसांनी आमची छोटी परी ठीक झाली.

सध्या ती डॉक्टर आहे आणि आमच्या घरापासून काही अंतरावर तिचा स्वतःचा दवाखाना आहे. लहानपणासूनच आमची ताई अभ्यासात खूप हुशार आहे. आमच्या मराठी माध्यमिक शाळेमध्ये १०वी ला ९५.४० गुणांनी प्रथम येण्याचा मान तिने पटकावला आहे.

ती खूप मेहनती आहे. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आमच्या ताईने अथक परिश्रम, जिद्द ,चिकाटी यांच्या जोरावर वैद्यकीय शास्त्रात प्रगती केली आहे. आमच्या ४ पिढ्यांच्या कुटुंबातील ताईच फक्त एकमेव डॉक्टर झाली आहे.

वैद्यकीय शिक्षणासाठी ती कोल्हापूरला शिकायला होती. तेथे ती हॉस्टेलमध्ये नं राहता मैत्रीण सोबत रहायची कारण हॉस्टेलचे भाडे आम्हाला परवडणारे नव्हते.

तेथें ती रोज ६ वाजता उठायची. उठल्यावर स्वतः साठी आणि काही मैत्रिणीसाठी नाश्ता करायची. नंतर ती ७ ते ९ अभ्यास करायची. त्यानंतर स्वतःसाठी जेवणाचा डब्बा तयार करून महाविद्यालयात जायची. संध्याकाळी ५ वाजता महाविद्यालयातून आलयावर सर्वासाठी ती चहा आणि नाश्ता आवडीने बनवत असे. नंतर ती संध्याकाळी ६ ते ८ असा अभ्यास करून रात्रीच्या जेवणाची तयारी करीत असे. रात्री पुन्हा २-३ तास अभ्यास करून झोपून सकाळी लवकर उठत असे.
अशाप्रकारे तिची रोजची दिनचर्या मला पूर्ण पाठ होती.

तिला लहान असताना कोणीच सांगणारे किंवा शैक्षणिक पायवाटा मार्गदर्शन करणारे नव्हते. तिनेच स्वतः मित्र मैत्रीण, नातेवाईक, इंटरनेट मधून माहिती काढून यशाची शिखरे पादाक्रांत केली.

आमच्या ताईला मेकअप करायला आवडत नाही. आमची ताई म्हणजे “साधी राहणी आणि उच्च विचारसरणी” या वाक्याला सार्थक अशी व्यक्ती आहे. ती अतिशय रुचकर असे जेवण बनवते. तिने बनवलेले नवनवीन पदार्थ आम्ही खाण्यास उत्सुक असतो. याच बरोबर तिला नवीन नवीन ठिकाणी फिरायला तसेच वाहन चालवायला सुद्धा आवडते.

मला ती नेहमीच मार्गदर्शन करते. ती पूर्णपणे स्वावलंबी आहे. तिला स्वतःला कष्ट करायला आवडतात. ती कोणाची दीड दमडी सुद्धा घेत नाही. माझा गणित विषयाचा अभ्यास तिनेच घेतला होता, म्हणूनच मला दहावीला गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळाले.

my sister essay in marathi , माझी बहीण मराठी निबंध , my sister essay in marathi, essay on my big sister in marathi, essay on sister in marathi

तिला नेहमीच गोरगरीब तसेच रांजले गांजले यांची सेवा करायला आवडते. तिला स्वतःचे मोठे इस्पितळ उघडायचे आहे, त्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करायला तयार आहे. ज्या मध्ये तिला शस्त्रक्रिया ,औषध उपचार अगदी माफक दरात उपलब्ध करून द्यायचे आहे.वर्षातून कमीत कमी एकदा तरी ती रक्तदान करते. मरणोत्तर तिला स्वतःचे अवयवसुद्धा दान करायचे आहेत.

दरवर्षी वर्षातून जवळपास दोन ते तीन वेळा डॉक्टरांचा एक उपक्रम असतो ज्यामध्ये ती सहभागी होते. या उपक्रमांतर्गत ती खेड्या पाड्यातील रूग्णांना मोफत सेवा पुरवते. तिच्या अश्या मेहनती स्वभावामुळे आमच्या घरातील कपाट तिच्या पदकांनी , प्रमाणपत्र आणि बक्षिसांनी भरले आहे.

आमची ताई खूप प्रेमळ स्वभावाची आहे. तिच्या मध्ये भूतदया जन्मजातच आहे. म्हणून ती रस्त्यावरच्या कुत्र्याला बिस्किट्स खायला देते, मांजरीना दूध पियायला देते. ती म्हणते, “या मुक्या प्राण्यांवर आपण प्रेम नाही करणार तर कोण करणार.” एकेदिवशी तर तिने एका जखमी कबुतराला प्राणीमात्रांना सोपवून दवाखान्यात नेले आणि तो बरा झाल्यावर त्याच्या नैसर्गिक अधिवासात पुन्हा सोडून दिले.

अशी आमची ताई यांच्या पण घरी सुन म्हणून जाईल त्यांची भरभराट होईल. त्यांना वाटेल की आमच्या घरात एका लक्ष्मी रुपाने एक सून म्हणून आली आहे. म्हणूनच असे म्हणतात कि, मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी मुलगी ही त्या दिव्याची वात आहे. माझ्या बहिणीसारख्या अनेक कर्तृत्ववान स्त्रियांचा आपण सन्मान केला पाहिजे.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला my sister essay in marathi , माझी बहीण मराठी निबंध , my sister essay in marathi, essay on my big sister in marathi, essay on sister in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

2 thoughts on “माझी बहीण मराठी निबंध | my sister essay in marathi”

Leave a Comment