विश्वास नांगरे पाटिल जीवन चरित्र | vishwas nangare patil biography in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये विश्वास नांगरे पाटिल यांच्या विषयी माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही विश्वास नांगरे पाटिल जीवन चरित्र ( vishwas nangare patil biography in marathi ), विश्वास नांगरे पाटिल यांच्याविषयी माहिती (vishwas nangare patil information in marathi), (biography of vishwas nangare patil) , विश्वास नांगरे पाटिल यांचे भाषण (vishwas nangare patil speech in marathi ), विश्वास नांगरे पाटिल यांचे विचार (vishwas nangare patil thought in marathi) याविषयी निबंध / परिच्छेद  लिहिण्यासाठी वापरू शकता.

विश्वास नांगरे पाटिल जीवन चरित्र | vishwas nangare patil biography in marathi

विश्वास नांगरे पाटील यांचे पूर्ण नाव विश्वास नारायण नांगरे पाटील असे आहे. त्यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९७३ रोजी सांगली (महाराष्ट्र राज्य) जिल्ह्यातील कोकरुड (बत्तीस शिराळा) या गावी एका मध्यमवर्गीय सर्वसामान्य कुटुंबात झाला. वयाच्या तेविसाव्या वर्षी ते (IPS) भारतीय पोलिस सेवेमध्ये अधिकारी म्हणून रुजू झाले. ते १९९७ च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. 

 त्यांचा रूपाली पद्माकर मुळे यांच्याशी १९९९ साली विवाह झाला असून यांना रणवीर नावाचा मुलगा आणि जान्हवी नावाची मुलगी सुद्धा आहे. त्यांच्या स्फूर्तीदायक आणि प्रेरणादायक वक्तृत्वामुळे ते अनेक विद्यार्थ्यांच्या मनात आजही घर करून बसले आहेत.

१९९७ मध्ये जेव्हा त्यांच आयपीसमध्ये सिलेक्शन झाले तेव्हा त्यांचे शिक्षण फक्त बीए इतिहास एवढंच होत. जे त्यांनीं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून पूर्ण केले होते. प्रशिक्षणाच्या वेळी त्यांनी उस्मानिया यूनिवर्सिटी मधून व्यवस्थापन (Master in business administration)  पूर्ण केले होते.

त्यांनी M.A ची पदवी मुंबई विद्यापीठातून संपादन केली आहे. तसेच एल एल बी ची पदवी नांदेड विद्यापीठातून मिळवली आहे. त्यानंतर वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी १९९७ मध्ये आपली कारकीर्द विक्री कर अधिकारी (sales tax officer) म्हणून सुरुवात केली. त्याच वर्षी विक्री कर निरीक्षक (sales tax inspector), डेप्युटी कलेक्टर आणि आयपीएस असे घवघवीत यश संपादन करणारे एकमेव पोलिस आधिकरी आहेत.

त्यांनी फक्त पोलिस खात्यासाठी काम न करता अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यामुळेच त्यांचा अनेक स्यवमसेवी संस्थांनी तसेच  सामाजिक संघटनांनी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

त्यांना खेड्यातील युवा पिढी बद्दल विशेष आकर्षण होते कारण त्यांचेही सुरुवातीचे जीवन (बालपण) खेडेगावातच गेले होते. याचा दाखला देताना ते खालील वाक्याला एका भाषणामध्ये म्हणाले होते.

“या रान फुलांना जर काळी कसदार जमीन , चांगला खत पाणी मिळाल तर ती अशी रुजतात , अशी उमलतात , अशी फुलतात तर त्यांच्यासमोर मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरातील गुलाब, कमळ , मोगरे फिके पडतात. “

त्यांनी भय मुक्त गाव अभियान ही सामाजिक सुरक्षिततेची योजनाही राबवली आहे. या योजनेअंतर्गत अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम तसेच पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पसायदान संगणक केंद्र लातूर , अंकुश धावडे व्यायामशाळा (gymnasium) अहमदनगर, विष्णू वालेकर स्पर्धा परीक्षा केंद्र अहमदनगर अशा शहीद झालेल्या पोलिसांच्या नावाने अनेक केंद्र त्यांनी स्थापित केली आहेत. 

विश्वास नांगरे पाटील यांचे वडील गावचे सरपंच आणि पैलवान सुध्दा होते. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी रोज तालमीत जावे आणि पैलवान होयला पाहिजे. त्यांच्या वडिलांनी त्यांना पोलिओचा डोस सुद्धा दिला नव्हता कारण त्यांचा असं म्हणत होते की “पैलवान चा पोरगा आहे त्याला काय होतंय”. लहान असताना त्यांना पोलिओचा ताप आला होता पण एका डॉक्टरचा प्रयत्नाने ते लवकर बरे झाले.

पैलवानाचा व समाजाचा मुलगा असल्यामुळे त्यांना शाळेमध्ये थोडी मुभा होती. ते सहाव्या इयत्तेत असताना एके दिवशी नव्या शिक्षिका त्यांच्या वर्गात येणार होत्या. त्या नवीन शिक्षिकेने विश्वास यांना त्यांच्या खुर्चीत बसलेले पाहिले आणि जोरात कानसुलात लगावली.

त्या म्हणाल्या “अरे विश्वास तू स्वतःला काय समजतोस, सरपंचांच मुलगा… पैलवानाचा मुलगा… असाच मोठा होशील…गावगुंड होशील… किड्या मुंगी सारखा जगशील आणि मरून जाशील…तुझ स्वतःचा अस्तित्व काही राहणार नाही.

त्यांना हे शब्द झोंबले आणि परिस्थितीची जाणीव झाली. त्यांनी मनाचा निश्चय केला की मला स्वतःची ओळख बनवायची आहे. म्हणून त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या इंग्लिश (न्यू इंग्लिश स्कूल) शाळेमध्ये प्रवेश घेतला. या शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना सकाळी आठ वाजता बस पकडावी लागे. तसेच संध्याकाळी पाच वाजता घरी परतण्यासाठी बस पकडावी लागे.

त्यावेळी रस्ते खराब असल्यामुळे त्यांच्या दोन ते तीन तास प्रवासा मध्येच जात असे. याच काळात त्यांचे वडील जिल्हा परिषदेचे सभापती झाले होते. त्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची असल्यामुळे त्यांनी वडिलांना सक्त बजावले होते की तुम्ही माझ्या शाळेमध्ये कुठल्याही कार्यक्रमास येऊ नये. विश्वास यांची अभ्यासाबद्दल ची आवड गायकवाड सरांनी ओळखली होती.

याच सरांनी विश्वास त्यांना आपल्या घरीच राहण्याचा सल्ला दिला जेणेकरून प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेचे नियोजन अभ्यासाठी होऊ शकते. त्यांचे दहावीचे वर्ष असल्यामुळे गायकवाड सरांनी अभ्यासासाठी रोज सकाळी त्यांना तीन वाजता उठण्याची सवय लावली.हीच सवय त्यांना पूर्ण त्यांच्या आयुष्यात कामी आली.
अशा प्रकारे १९८८ साली ८८ टक्के मार्क मिळवून ते दहावीच्या परीक्षेत तालुक्यामध्ये पहिले आले.

त्यावेळी राजीव गांधी यांचा काळ असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक, संगणक या क्षेत्रांचे वारे वाहत होते. मराठी माध्यमातून मराठी साहित्य घेऊन भारतामध्ये तिसरे आलेल्या आयपीएस भूषण गगराणी यांचे व्याख्यान ऐकून ते प्रभावित झाले. म्हणून त्यांनी अकरावी साठी कला शाखे मध्ये प्रवेश घेतला. त्यांना कला (B.A ) शाखेमधून मध्ये विद्यापीठाकडून सुवर्णपदक मिळाले आहे.

मुंबईला (राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था) SIAC ला त्यांनी प्रवेश घेतला आणि तेथे सहा महिने अभ्यास केला.पण पहिल्याच प्रयत्नात ते नापास झाले. एमपीएससीची परीक्षा दिली असल्यामुळे ते मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले होते पण त्यांनी कोणतीच पदी नेमणूक झाली नव्हती. यामुळे त्यांना १९९७ ला मानसिक ताण आला होता. त्यांच्या वडिलांच्या सल्ल्याने त्यांनी पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात केली.

कल्याण जवळील आंबिवली येथे त्यांनी आपल्या आतेभावकडील घरी आश्रय घेतला. रोज सकाळी ३ वाजता उठून पाहिली रेल्वे पकडून ते पाच वाजेपर्यंत मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्टेशनला पोहोचायचे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते तळमळीने अभ्यास करायचे. अशाप्रकारे जवळजवळ त्यांनी आठ महिने प्रवास करून अभ्यास केला. अखेर (डेप्युटी कलेक्टर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर ,पीएसआय… आयपीएस…) अश्या १३ तेरा परीक्षा या 8 महिन्याच्या काळात ते न थांबता उत्तीर्ण झाले.

त्यांच्याजवळ प्रबळ इच्छाशक्ती होती. याच इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी अनेक शिखरे पादाक्रांत केली होती. त्यांना खालील प्रमाणे आयपीएसच्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता.

विश्वास या जगामध्ये तू कशाला आला आहेस?

ते म्हणाले, “सर मी या ठिकाणी संघर्ष करायला आलो आहे. आतापर्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलो आहे. जर तुम्ही मला या व्यवस्थेमध्ये (system) प्रवेश करण्याची संधी दिली तर या व्यवस्थेतील वाईट संधींचा विनाश करण्यासाठी संघर्ष करायचा आहे.

त्यांचे हे उत्तर मुलाखत घेणाऱ्यांना आवडले आणि त्यांना १९९७ ल सर्वात जास्त म्हणजेच ३०० पैकी २१० गुण मिळाले.

विश्वास नांगरे पाटील यांना मिळालेले पुरस्कार

  • एक गाव एक गणपती पुरस्कार
  • नगर भूषण पुरस्कार
  • रोटरी एक्सलन्स ॲवॉर्ड

विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिलेली आणि प्रकाशित केलेली पुस्तके ( vishwas nangare patil books )

  • मन मे है विश्वास (मराठी)
  • कर हर मैदान फतेह (मराठी)

 धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला विश्वास नांगरे पाटिल जीवन चरित्र ( vishwas nangare patil biography in marathi ), विश्वास नांगरे पाटिल यांच्याविषयी माहिती (vishwas nangare patil information in marathi), (biography of vishwas nangare patil) , विश्वास नांगरे पाटिल यांचे भाषण (vishwas nangare patil speech in marathi ), विश्वास नांगरे पाटिल यांचे विचार (vishwas nangare patil thought in marathi) हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment