पावसाळा निबंध मराठी | essay on rainy season in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये पावसाळा विषयी मराठी निबंध या विषयी माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही पावसाळा ऋतू मराठी निबंध (essay on rainy season in marathi ), पावसाळा निबंध मराठी (pavasala nibandh marathi), पावसाळा निबंध मराठी मध्ये (pavsala nibandh in marathi), माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध(maza avadta rutu pavsala nibandh), पावसाळा विषयी मराठी निबंध (rainy season essay in marathi) याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

पावसाळा निबंध मराठी , essay on rainy season in marathi

आपल्या पहिल्या चाहुलीने सर्वांना मंत्रमुग्ध करणारा ऋतू म्हणजे पावसाळा होय. पावसाळा हा तीन ऋतुपैकी महत्वाचा मानला जातो. कारण पावसामुळे मनुष्य ,प्राणी पक्षी यांना मुबलत प्रमाणात पाणी मिळते. भारतामध्ये साधारणतः जून ते ऑगस्ट या महिन्यामध्ये पाऊस पडतो. मृग नक्षत्रापासून पावसाची सुरुवात होते. निसर्गाने जणू गालिचाच पांघरलेला आहे, असे विहंगमय दृश्य पावसाळ्यामध्ये पाहावयास मिळते. भारतीय उपखंडात पडणाऱ्या पावसाला मान्सून असे म्हणतात. आभाळातून पडणारे पावसाचे पाणी हे स्वच्छ आणि नितळ तसेच पिण्यास लायक असते.

पावसाळा सुरु झाला कि आपल्या मनात खालीलप्रमाणे बालपणीची प्रसिद्ध कविता आठवते.  

येरे येरे पावसा तुला देतो पैसे
पैसे झाला खोटा पाऊस आला मोठा
ये ग ये ग सरी माझे मडके भारी
सर आली धावून मडके गेले वाहून

पावसाळ्यामध्ये मोर पिसारा फुलवून नाचू लागतो. पहिल्या पावसामध्ये सर्वत्र मातीचा सुगंध दरवळतो. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर नद्या, नाले, ओढे, विहिरी तुडूंब भरून वाहू लागतात. डोंगरावरून पांढरेशुभ्र असे धबधबे वाहू लागतात. झाडांना पालवी फुटते, सगळीकडे चैतन्यमय वातावरण निर्माण होते. पावसामुळे झाडे टवटवीत होतात तसेच आनंदाने बहरू लागतात. 

बळीराजा म्हणजेच शेतकरी पावसाची मोठ्या आतुरतेने वाट बघत असतो. पावसाची सुरुवात होताच शेतकरी पिकाची लावणी करायला सुरुवात करतो. अनेक महान कवींनी पावसावर कविता, चारोळ्या, बालगीते, भावगीते लिहिली आहेत. पावसाळ्यामध्ये झाडाखाली उभे राहणे धोक्याचे असते.

कारण झाडावर वीज पडून मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. भारतामध्ये हवामान खात्यामार्फत पावसाच्या आगमनाचा कालावधी, परतीचा प्रवास तसेच पडणाऱ्या पावसाचे मोजमापन केले जाते. हे  मोजमापन हे  मिमी.(मिलीमीटर / milimetre ) मध्ये करतात. उदा. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी सरासरी २०० मिमी पाऊस पडतो 

भारतातील काही भागामध्ये गारांचा पाऊस सुद्धा पडतो. कधी कधी गारा आणि पाऊस मिश्रित पाऊस पडतो तर कधी गाराविरहित पाऊस पडतो. पाऊस पडताना सूर्य किरणे पडली तर आपल्याला सुंदर असे इंद्रधनुष्य देखील पाहावयास मिळते. पावसाळ्यामध्ये भिजू नये म्हणून घराबाहेर जाण्यासाठी आपल्याला छत्री किंवा रेनकोट वापरावा लागतो.

पाऊस कसा पडतो याचे शास्त्रीय कारण : 

पाऊस पडण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला जलचक्र असे म्हणतात. सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ बनते. वाफ बनण्याच्या या प्रक्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात. या बाष्पांचे चे वस्तुमान कमी असल्यामुळे ते हवेमध्ये तरंगतात व उंचच उंच जातात. हवेतील वाऱ्यामुळे जसजसे हे सूक्ष्म थेंब एकत्र येऊन त्यांचे मोठं मोठे थेंब होऊ लागतात तसतसे त्यांचे अवकाशमध्ये मोठ्या ढगात रूपांतर होते. हेच ढगातील सूक्ष्म थेंब आकाराने व वजनाने वाढतात आणि एकमेकांवर आपटतात. अश्याप्रकारे अनुकूल परिस्थितीनुसार भूतलावर पाऊस पडतो.

मोठा प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे परिणाम:

जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर पूरजन्य परिस्तिथी निर्माण होते तसेच ढगफुटी, महाप्रलय घडतात. अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरते त्यामुळे सगळीकडे रोगराई पसरून अनेक साथीचे रोग उद्धभण्याची संभावना असते. अतिवृष्टी झालयामुळे झाडे कोलमडून पडतात, लोकांच्या गाड्या वाहून जातात. तसेच अनेक जनावरे, माणसे मृत्यमुखी देखील पडतात.

कित्येक लोकांचा विजेचा झटका लागून किंवा अंगावर वीज पडून मृत्यू होतो. जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते. जंगलातील मानवाचा वाढलेला हस्तक्षेप, वाढते शहरीकरण, जागतिक तापमान वाढ, झाडांचे केलेली कत्तल अशी काही प्रमुख कारणे मानली जातात.

कमी प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे परिणाम:

पावसाचे प्रमाण कमी झाले किंवा पडलाच नाही तर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. कित्तेत प्राणी किंवा जनावरे पाण्याअभावी मृत्यूमुखी पडू शकतात. अनेक नद्या, ओढे, विहिरी, धरणे आटतात. त्यामुळे खेडेगावांमध्ये किंवा शहरामध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न उध्दभवू शकतो. अनेक स्त्रियांना पाण्याच्या शोधामध्ये मैलोनमैल वणवण फिरावे लागते.    

अवकाळी पाऊस

मागील काही वर्षांपासून पाऊस नेहमीप्रमाणे जून ने ऑगस्ट महिन्यामध्ये न पडता बाकी महिन्यामध्ये (उन्हाळा किंवा हिवाळ्या मध्ये ) पडतो त्यास अवकाळी पाऊस असे संबोधले जाते. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे, बागायतदारांचे मोठे नुकसान होते. ज्यांचा परिणाम अप्रत्यक्षरीत्या शेतमालावरील किंमतीवर वर होतो किंवा लाखो टन माल वाया जातो.

भारतातील सर्वात जास्त प्रमाणात पाऊस पडणारी ठिकाणे

गावाचे किवा शहराचे नाव , राज्याचे नाव

 • चेरापुंजी Cherrapunji, (मेघालय  megahlaay)
 • अगुंबे Agumbe, (कर्नाटक  karnataka)
 • महाबळेश्वर Mahabaleshwar, (महाराष्ट्र maharashtra )
 • आंबोली Amboli, (पणजी panji) 
 • पसीघाट Pasighat, (अरुणाचल प्रदेश Arunachal Pradesh)
 • गंगटोक Gangtok, (सिक्कीम Sikkhim)

देशातील सर्वात कमी प्रमाणात पाऊस पडणारी ठिकाणे

गावाचे किवा शहराचे नाव , राज्याचे नाव

 • राजस्थान  (Rajasthan),
 • पश्चिम पंजाब चा भाग  (western Punjab),
 • कच्छ चे रण ,गुजरात   (The Rann of Kachchh in Gujarat)
 • जम्मू काश्मीर चा उत्तरेकडील भाग  (northern of Jammu & Kashmir)
 • लेह आणि लढाक चा भाग ( part of Leh and Ladakh)

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला पावसाळा ऋतू मराठी निबंध (essay on rainy season in marathi ), पावसाळा निबंध मराठी (pavasala nibandh marathi), पावसाळा निबंध मराठी मध्ये (pavsala nibandh in marathi), माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध(maza avadta rutu pavsala nibandh), पावसाळा विषयी मराठी निबंध (rainy season essay in marathi) हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment