नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये महात्मा गांधी यांच्याविषयी माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही महात्मा गांधी विषयी मराठीमध्ये निबंध (mahatma gandhi essay in marathi), महात्मा गांधीजींची माहिती (information about mahatma gandhi), महात्मा गांधीजींचे भाषण (mahatma gandhi marathi bhashan), महात्मा गांधीजींचे आत्मचरित्र (mahatma gandhi biography in marathi) याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.
महात्मा गांधी निबंध मराठी | mahatma gandhi essay in marathi
महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे. तसेच त्यांना महात्मा (महान असा आत्मा ) , बापू , राष्ट्रपिता या नावाने ही ओळखले जाते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर इ.स. १८६९ रोजी पोरबंदर या ठिकाणी झाला. त्यांचा विवाह इ.स. १८८३ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी झाला. त्यांच्या बायकोचे नाव कस्तुरबा माखनजी असे होते. गांधीजींना एकूण चार मुले होती. त्यांची नावे हरिलाल , मणिलाल, रामदास आणि देवदास असे होते. त्याच्या शालेय शिक्षणाचा आलेख पाहता ते एक साधारण विद्यार्थी होते. “रघुपति राघव राजाराम, पतित पावन सीताराम…” हे त्यांचे आवडते भजन होते.
गांधीजींचे शिक्षण
इ.स. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी महिला सशक्तीकारण ,राष्ट्रीय धार्मिक व जातीय एकजुटता, आत्मनिर्भरता व अस्पृश्यतेचा विरोध या विषयावर देशभर अनेक कार्यक्रम केले. गांधीजींनी अस्पृश्यते वर कधीच विश्वास ठेवला नाही. त्यांनी इंग्रजांच्या रोलेट ऍक्टचा विरोध केला .
संपूर्ण राष्ट्र ने त्यांना साथ दिली. देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी त्यांनी सत्य आणि अहिंसा मार्गाचा वापर केला. त्याकाळात ते अनेकदा तुरुंगात सुद्धा गेले . त्यांनी अनेक सत्याग्रह सुद्धा केले. बिहार मधील नील सत्याग्रह, दांडी यात्रे मधील मिठाचा सत्याग्रह, खेडामधील किसान सत्याग्रह हे त्यांच्या आयुष्यातील प्रमुख सत्याग्रह आहेत. ब्रिटिशांविरोधात त्यांनी इ .स. १९४२ मध्ये “भारत छोडो” आंदोलन सुरु केले. गांधीजींच्या अथक प्रयन्तानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.
गांधीजींनी आपले पूर्ण आयुष्य सत्याग्रह (सत्य शोधून त्याचा आग्रह करणे) करून सफल केले. गांधीजींनी त्यांच्या उभ्या आयुष्यात खालीलप्रमाणे अकरा तत्वांचा स्वीकार केला होता.
सत्य, अहिंसा, शरीरश्रम, ब्रह्मचर्य, स्वदेशी, अस्पृश्यतेचा त्याग, निर्भयता, सर्वधर्म स्वभाव, अस्तेय, आस्वाद, अपरिग्रह.
इ. स. 1891 मध्ये लंडन येथुन भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी वकिली ची प्रॅक्टिस सुरू केली. पण त्यात त्यांना जास्त यश मिळाले नाही. भारतातील एका खाजगी कंपनी ने त्यांना साऊथ आफ्रिका येथे कामासाठी त्यांच्या कुटुंबासह पाठवले. तेथे त्यांनी जवळ जवळ वीस वर्षे काढली.
इ.स. १९१५ मध्ये राजवैद्य जीवराम कालिदास यांनी गांधीजींना सर्वप्रथम “महात्मा ” या नावाने संबोधले होते. गांधीजींना भारतात राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते. 6 जुलै 1944 रोजी प्रथमच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींचा उल्लेख राष्ट्रपिता म्हणून केला होता. तेव्हापासून 2 ऑक्टोबर हा दिवस जागतिक शांतता दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्य काळात त्यांनी परिधान केलेली गांधी टोपी अतिशय प्रसिद्ध होती, जी खादी पासून बनवण्यात आली होती. देशांतर्गत कापड तसेच हातमाग उद्योगाला चालना मिळण्यासाठी ते आपल्या दैनंदीन जीवनात खादीचा जास्तीतजास्त वापर करत असे.
मिठाचा सत्याग्रह
मिठाच्या सत्याग्रहाला दांडी सत्याग्रह असेही म्हणतात . इ स १९३० मध्ये महात्मा गांधीजींनी ब्रिटिश सरकारच्या मिठावर लावलेल्या कराच्या कायद्याविरोधात सविनय कायदेभंग चळवळ सुरु केली. या ऐतिहासिक सत्याग्रहाची सुरुवात गांधीजींनी आपल्या निवडत ७८ अनुयायांना सोबत घेऊन अहमदाबाद साबरमती आश्रम ते दांडी गाव पर्यंत पायी प्रवास करत केली.
०६ एप्रिल १९३० रोजी हाथ मध्ये चिमूटभर मीठ घेऊन मीठ विरोधातील कायद्यांचा भंग केला. या आंदोलनातून गांधीजींच्या सविनय कायदेभंग चळवळ ची सुरुवात झाली. या आंदोलनादरम्यान देशातील बऱ्याच बड्या नेत्यांना अटक झाली तसेच ६०,००० हुन अधिक लोकांना तुरुंगात डांबण्यात आले होते.
भारत छोडो आंदोलन
भारत छोडो आंदोलन आंदोलनाची सुरुवात दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी म्हणजेच ८ ऑगस्ट १९४२ रोजी झाली होती. महात्मा गांधीजींनी अखिल भारतीय काँग्रेस समितीची मुंबई येथे बैठक बोलावून या आंदोलनाची पायाभरणी केली होती. हे आंदोलन भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गांधीजींच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
३० जानेवारी १९४८ रोजी दिल्ली येथे एका प्रार्थना सभे साठी जात असताना नथुराम गोडसेने त्यांच्या वर गोळ्या झाडल्या. तेथेच त्यांनी “हे राम” म्हणत प्राण सोडले. अशारितीने गांधीजींची हत्या झाली असताना देखील ते अमर राहिले.
धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला (mahatma gandhi essay in marathi , mahatma gandhi marathi bhashan, gandhi jayanti bhashan in marathi ), महात्मा गांधी विषयी निबंध , गांधी जयंती भाषण हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.
4 thoughts on “महात्मा गांधी निबंध मराठी | mahatma gandhi essay in marathi”