माझे आवडते फळ आंबा निबंध | essay on mango in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये आंबा या फळाविषयी माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही माझे आवडते फळ आंबा निबंध , essay on mango in marathi ,information about mango in marathi , essay on amba in marathi ,10 lines on mango tree in marathi, my favourite tree essay in marathi ,my favourite fruit mango essay in marathi , आंब्याविषयी मराठी मध्ये निबंध   याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता. 

आंबा हा फळांचा राजा आहे. सर्वसाधारणपणे , आंबा हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे फळ आहे. उत्कृष्ट अशा चव आणि गोडी मुळे आंब्याला कोकणचा राजा असे म्हणतात. आंब्यासाठी लागणारे अनुकूल हवामान भारतात असल्यामुळे त्याचा उगम दक्षिण किंवा दक्षिणपूर्व आशियामध्ये झाला असावा ,असा अंदाज वर्तवण्यात येतो. आंबा हे भारत तसेच पाकिस्तान चे राष्ट्रीय फळ आहे. त्याचप्रमाणे आंब्याचे झाड फिलिपिअन्स चे “राष्ट्रीय चिन्ह” आहे आणि बांगलादेश चे राष्ट्रीय झाड आहे.

एकट्या भारतात आंब्याच्या जवळपास १३०० जाती आढळून येतात. आंबा या फळाचा मोसम एप्रिल ते जून या महिन्यामध्ये असतो. आंब्याच्या झाडाला वर्षातून फक्त एकदाच फळ येते. भारतामधून ९०% हापूस आंबा बाहेरील देशात निर्यात केला जातो . आंब्याचे फळ जर झाडावरून लवकर काढले तर तो काळा पडण्याची शक्यता असते . अशाप्रकारे लवकर काढल्यामुळे त्यामुळे ग्राहकांची फसवणूक सुद्धा होते. 

माझे आवडते फळ आंबा निबंध | essay on mango in marathi

आंब्याच्या झाडाची उंची साधारणपणे ३४ ते ४० मी. पर्यंत असते. आंब्याचे पान हे लांबीला १५ ते ३५ से. मी. व रुंदीला ६ ते १६ सेमी असते. आंब्याच्या फळाचे वजन कमीत कमी १०० ग्रॅम व जास्तीत जास्त ५ किलो पर्यंत असू शकते. खरेदी-विक्री करताना आंब्याचे मूल्यमापन किलो मध्ये किंवा नग (डझन) मध्ये करतात.

कच्या आंब्याला कैरी असे म्हणतात. या कैरी ची चव आंबटगोड असते ,त्यामुळे त्यापासून कैरीचे लोणचे , पनं बनवतात. कैरी चा रंग हा हिरवा असतो. पूर्ण पिकल्यानंतर त्याचा रंग केशरी , पिवळा किंवा लालसर होतो. आंब्याच्या प्रजातीनुसार त्याच्या  कोयीचा पृष्ठभाग हा धागेदार किंवा सपाट असतो.

आंब्यापासून मुरांबा बनवतात. आंब्यापासून आंबोळ्या बनवतात. आंब्यापासून आमरस बनवतात , ज्याचा उपयोग लग्न समारंभ मध्ये गोड धोड म्हणून वापरतात. आंब्याच्या मध्यभागी बी असते तिला कोय असे म्हणतात. तसेच आंब्याचा रस काढून त्यापासून शीतपेये , मिठाई सुद्धा बनवले जातात. 

भारतीय संस्कृती मध्ये आंब्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आंब्याची पानांचा वापर तोरण बनवण्यासाठी केला जातो, जे आपण घरातील दारांना लावू शकतो. मुख्यतः लग्न समारंभात, मंगल कार्यात, सणांच्या दिवशी किंवा शुभप्रसंगी   आंब्याच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. कलशामध्ये आंब्याचा टाळा (कलम ने केलेल्या आंब्याची फांदी) नारळाबरोबर ठेवला जातो. 

जगामध्ये (प्रामुख्याने हापूस ) आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जगातील एकूण उत्पादनांपैकी जवळजवळ ५६% उत्पादन हे एकट्या भारतात होते. परदेशामध्ये आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.  दरवर्षी लाखो रुपयांचा आंबा निर्यात केला जातो. निर्यात करण्याआधी त्याची गुणवत्ता चाचणी केली जाते. महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी हापूस तसेच देवगड हापूस ह्या प्रजाती उत्कृष्ट दर्जाच्या मानल्या जातात. डिसेंबर महिन्यामध्ये आंब्याच्या झाडाला मोहोर येतो.  तर एप्रिल ते मे महिन्यामध्ये आंब्याचे फळ विक्रीसाठी बाजारामध्ये येते

आरोग्यच्या दृष्टीने आंब्याचे महत्व

आंब्या मध्ये अ, क जीवनसत्व मोठ्या प्रमाणांत आहे. तसेच उष्मांक(calories), प्रथिने (proteins ),  तांबे(Copper), पोटॅशिम (Potassium) ,फायबर (Dietary fiber), ब६ जीवनसत्व (Vitamin B6), ब५ जीवनसत्व  (Vitamin B5)  हे घटक देखील थोड्याफार प्रमाणात असतात. संशोधनातून असे निदर्शनात आले आहे की, आंब्यामधील पोषक द्रव्यामुळे आपली पचनशक्ती, रोगप्रतिकारशक्ती वाढते.  तसेच काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.

भौगोलिक परिस्थीनुसार आंब्याच्या खालीलप्रकारे प्रजाती आढळून येतात.

 • हापूस
 • हेमसागर
 • रुमाली
 • लंगडा
 • तोतापुरी
 • नीलम
 • पायरी
 • मलगोवा
 • बनारसी
 • जमादार
 • चौसा
 • गोवाबंदर
 • गोपाळभोग
 • पीटर
 • सुकाल
 • सफेदा
 • फझरी
 • हेमसागर
 • कृष्णभोग 

आंबा साठी खालीलप्रमाणे गीत सुद्धा प्रसिध्द आहे.
आंबा पिकतो रस गळतो
कोकणचा राजा झिम्मा खेळतो.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला (information about mango in marathi , essay on amba in marathi ,10 lines on mango tree in marathi, my favourite tree essay in marathi ,my favourite fruit mango essay in marathi) आंब्याविषयी मराठी मध्ये निबंध  हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका. 

1 thought on “माझे आवडते फळ आंबा निबंध | essay on mango in marathi”

Leave a Comment