वाघ विषयी माहिती मराठी निबंध | essay on tiger in marathi

नमस्कार  मित्रांनो , आम्ही या लेख मध्ये वाघ चे वर्गीकरण , त्याचे राहणीमान , वाघ नसतील तर काय झाले असते , वाघांची संख्या कमी होण्या मागची कारणे , व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (tiger project / tiger reservation) याविषयी माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही माझा आवडता प्राणी वाघ (maza avadta prani wagh),वाघ विषयी माहिती मराठी निबंध (tiger information in marathi) , राष्ट्रीय प्राणी वाघ (essay on national animal tiger in marathi) , Information about tiger in marathi, (essay on tiger in marathi) वाघ विषयी माहिती मराठी निबंध याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता. 

वाघ विषयी माहिती मराठी निबंध | essay on tiger in Marathi

वाघ विषयी माहिती मराठी निबंध | essay on tiger in Marathi

माझा आवडता प्राणी वाघ आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. वाघाचे माहेरघर म्हणून भारताची ओळख आहे. वाघ हा मांजर कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे. वाघ हा जंगलातील गुहे मध्ये राहतो. जगातील ७० टक्के वाघ भारतात आहेत. वाघ हा भारत देशाचे शौर्य चे प्रतीक आहे.

वाघाच्या शरीराचा आकार त्याच्या प्रादेशिक परिस्थिती नुसार असतो.  जसे सायबीरियन वाघ हे लांबीला ३.५ मीटर पर्यंत असतात व त्यांचे वजन ३०० किलोपर्यंत असते. भारतातील वाघ हा माध्यम आकारातील असून  लांबीला २.९ मीटर पर्यंत असतात व त्यांचे वजन १५०-२३० किलोपर्यंत असते. वाघांचे शिकारीचे क्षेत्र हे जवळ पास ६० ते १०० चौ.किमी तर वाघिणीचे चे क्षेत्रफळ हे  १५ ते २० चौ किमी च्या आसपास असते. म्हणून ते दाट ते अतिशय घनदाट जंगले पसंद करतात. दरवर्षी २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिवस म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो.

वाघ विषयी माहिती मराठी निबंध | essay on tiger in marathi

वाघ हा एकटा राहणार प्राणी असून आपले क्षेत्र झाडावर मूत्राचे फवारे मारून तसेच  झाडावर नखे ओरबाडून आखून ठेवतात. नर वाघ आपल्या क्षेत्रात अनेक वाघिणींना सामावून घेतो, पण तोच नर वाघ इतर नर वाघांना आपल्या क्षेत्रात येण्यास मज्जाव करतात. 

जसे प्रत्येक माणसाचे हाथाचे ठसे वेगळे असतात , तसेच प्रत्येक वाघाचे अंगावरचे पट्टे वेगळे असतात . तसेच प्रत्येक वाघाच्या पंज्याची ठेवणंही वेगळी असते. जंगलातील वाघाचे आयुष्यमान जवळपास २० ते २५ वर्षांचे असते. तसेच वाघीण एकाचवेळी ४ ते ५ पिल्लानं जन्म देते. जंगलामध्ये वाघाची डरकाळी जवळ जवळ ३ किलोमीटर दूरपर्यंत ऐकता येते. वाघाची चाहूल लागतात जंगलातील सर्व प्राणी , पक्षी, वानर सावध होतात.

वाघ हा पूर्णपणे मांसाहारी प्राणी आहे . वाघ हा मुख्यतः मध्यम ते मोठ्या आकाराच्या प्राण्याची शिकार करतो . सांबर हे वाघाचे आवडते खाद्य असून रानडुक्कर , हरीण , नीलगाय , रानम्हैस , चितळ , भेकर इत्यादी प्राण्याची शिकार सुद्धा करत असतो. वाघ हे बहुतांशी एकट्याने शिकार करतात .

वाघाचा तशी वेग ६५ किमी/तास पर्यंत असतो तसेच त्याची एक झेप  ५ ते ६ मीटर पर्यंत जाऊं शकते . एकदा शिकार सापडली कि वाघ त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय ती शिकार सोडत नाही . वाघ हा जास्तीकरून जंगलामध्ये राहणे पसंद करतो , पण उन्हाळ्याचा दिवसामध्ये पाण्याच्या शोधात तो जंगलाच्या बाहेर सुद्धा येऊ शकतो. दरवर्षी हजारो ते  लाखो परदेशी पर्यटक भारतात फक्त वाघ बघण्यासाठी व्याघ्र प्रकल्पांना भेट देतात.

वाघांचे वर्गीकरण | types of tigers in marathi

भौगोलिक परिस्थिती नुसार वाघाचे खालील प्रमाणे वर्गीकरण करता येते

बंगाल वाघ : हा वाघ प्रामुख्याने भारत , नेपाळ , भूतान तसेच बांग्लादेश येथे आढळून येतो

सायबेरियन वाघ : हा वाघ ईशान्य आशिया, पूर्व सायबेरिया पासून उत्तर-पूर्व चीन आणि बहुधा उत्तर कोरिया पर्यंत आढळतो

साऊथ चायना वाघ : हा जास्तकरून दक्षिण चीन मध्ये आढळतो

इंडोचाइनीस वाघ: प्रामुख्याने म्यानमार , थायलँड , लाओस येथे आढळतात

मलेशियन वाघ: हे वाघ पेनिनसुला  मलेशिया किंवा पश्चिम मलेशिया येथे आढळतात

वाघ नसतील तर काय झाले असते…! | what if tiger wont exists

वाघ नसतील तर इतर प्राण्यांची संख्या अनियंत्रित प्रमाणात वाढेल. तसेच अन्नसाखळी तुटेल, निसर्ग संपदेवर ताण पडेल आणि निसर्ग चक्र बिघडून जाईल. वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थाच्या दुर्ष्टीने खूप महत्वाचे आहे. वाघ असलेल्या जंगलात लाकडू तोड आणि जंगलावर अवलंबून असलेले लोक भीतीपोटी जात नाहीत. त्यामुळे जंगल सुरक्षित राहते.

वाघ जंगलात आहेत म्हणून ठराविक बंधने तरी पाळली जातात. आज वाघांच्या अस्तित्वामुळेच हजारो एकर जंगल अबाधित आहेत . शंभर वर्षांपूर्वी भारतात चाळीस हजार वाघ होते, पण मानवाच्या जंगलातील हस्तक्षेपामुळे आता ते तीन हजार च्या आसपास उरले आहेत.

वाघ आहे म्हणून तेथे जैविक विविधता सुखाने नांदते आहे. वाघांचे अस्तित्व हे केवळ त्या प्रजातीसाठी नाही तर संपूर्ण जंगलासाठी महत्त्वाचे आहे. वाघ नष्ट झाले तर जंगलांमध्ये मानवी हस्तक्षेप वाढेल आणि कालांतराने जंगल संपुष्टात येतील. एका सर्वेक्षणानुसार असे निदर्शनास आले आहे कि, इ.स. २०७० पर्यंत पश्चिम बंगाल येथील सुंदनबंन येथे एकही वाघ शिल्लक राहणार नाही.

वाघांची संख्या कमी होण्या मागची कारणे

तशी वाघांची संख्या कमी होण्यामागची अनेक कारणे आहेत. प्रमुख कारण म्हणजे त्यांची अवैध शिकार, माणसाचा जंगलातील वाढलेला हस्तक्षेप , वृक्षतोड , वाढत्या शहरीकरणामुळे कमी झालेली जंगले , जंगलातील वणवे तसेच महापूर. वाघांना पूर्णपणे नामशेष होण्यापासून वाचवायचा असेल, तर आपल्याला समाजप्रबोधन तसेच जनजागृती करावी लागेल. नाहीतर आपल्या नातवंडांना , पतवंडाना वाघांना फक्त चित्र आणि फोटो मध्ये बघण्याची वेळ येईल.

व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (tiger project / tiger reservation)

इसवी सन २००५ साली  राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (नॅशनल टायगर कॉन्झर्व्हेशन ऑथॉरिटी अर्थात एनटीसीए)  प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. भारतामध्ये वाघाची शिकार करणे हे वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ याअंतर्गत दंडनीय अपराध आहे.

सहसा करून वाघ हा मानवाची शिकार करत नाही . पण जर त्या वाघाने माणसाला सतत आपले भक्ष्य बनवले तर त्या वाघाला नरभक्षी वाघ असे म्हणतात. अश्या वाघाला ठार कारण्यासाठी सरकार फतवा काढते ,आणि वन्य अधिकारी व शिकारी यांना सोबत घेऊन त्या वाघाला ठार करण्यात येते.

भारतामधे जवळपास ५१ वाघ्य्र संवर्धन प्रकल्प आहेत . त्यापैकी खालील ठिकाणी वाघांची संख्या शंभर च्या वर आहे

बंडीपूर राष्ट्रीय उद्यान , कर्नाटक

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान , उत्तराखंड

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान , आसाम 

नागरहोल राष्ट्रीय उद्यान , कर्नाटक

वाघाविषयी विषयी वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न | questions on tiger in marathi

भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.

वाघाचा मुख्य आहार कोणता?

सांबर , रानडुक्कर , हरीण , नीलगाय , रानम्हैस , चितळ , भेकर या प्राण्यांची शिकार म्हणजेच वाघांचे खाद्य होय. तसेच वन्यजीव (संरक्षण) कायद्याअंतर्गत कठोर शिक्षा केली जाते.

संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त वाघ कोणत्या देशात आहे?

संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त वाघ भारतात आहेत.

भारत सरकारने वाघाची शिकार रोखण्यासाठी कोणते प्रयन्त केले?

भारताने वाघांची शिकार रोखण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली.

वाघाचे शिकारीचे क्षेत्रफळ किती असते? 

नर वाघाचे शिकारीचे क्षेत्रफळ ६० ते १०० चौ.किमी तर वाघिणीचे १५ ते २० चौ किमी असते.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला (essay on tiger in marathi) वाघ विषयी माहिती मराठी निबंध / (tiger information in marathi) वाघ विषयी माहिती मराठी , Information about tiger in marathi  हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.  

2 thoughts on “वाघ विषयी माहिती मराठी निबंध | essay on tiger in marathi”

Leave a Comment