बलिप्रतिपदा कथा । बलिप्रतिपदा माहिती | balipratipada information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये दिवाळीमध्ये येणाऱ्या बलिप्रतिपदेविषयी माहिती दिली आहे. ही माहिती बलिप्रतिपदा कथा , बलिप्रतिपदा माहिती , balipratipada information in marathi , balipratipada mahiti in marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

बलिप्रतिपदा कथा । बलिप्रतिपदा माहिती | balipratipada information in marathi

या दिवसाला दिवाळी पाडवा असेही म्हणतात. हा पाडवा साडे-तीन शुभमूर्तापैकी गणला जातो. बळिराजा हा शेतकऱ्याचा राजा होता . हा राजा जनतेच्या सर्व समस्या सोडवत होता. या बळीराजाचे राज्य पुन्हा येवो म्हणून काही खेडेगावांमध्ये स्त्रिया भावाला ओवाळताना “इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो” असे म्हणण्याची प्रथा आहे. याच दिवशी स्त्रिया घरातील सर्व पुरुषांना ओवाळतात.

असुराचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचन नावाचा पुत्र होता. बळीराजा राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, रजा दक्ष राजा होता. हा राजा दानशूरतेमध्ये अग्रेसर होता आणि देव विष्णूच्या समर्थनासाठी तसेच भक्तीसाठी प्रसिद्ध होता.

त्याची शक्ती व संपत्ती इतकी वाढली की त्याने सर्व देवांचाही पराभव केला. देवी लक्ष्मीला दासी केले. त्यामुळे सर्व देवांचे स्वातंत्र्य हरवले. मग बळीराजाला हरवण्यासाठी विष्णूची निवड करण्यात आली.

एकदा त्याने जाहीर केले की तो यज्ञ , होम हवन करेल आणि यज्ञ दरम्यान कोणालाही हवे ते भेट देईल. भगवान विष्णूने वामनावतार धारण केला आणि बटू वेशात बळीराजा समोर उभे झाले. बळीने विचारले ‘काय पाहिजे तुला’. बटू म्हणाला, ‘ मी मागेल ते तुला द्यावे लागेल असे वचन दे’.

बळी म्हणाला, ‘ मी वचन देतो, तुला हवे ते माग’.

बटू म्हणाला, ‘ तिन्ही लोकांवर तुझे राज्य आहे. मला तीन पावले जमीन दे’.

बळीराजा वचनपूर्ती करणारा राजा होता. वामन तारी विष्णूने प्रचंड रूप धारण केले, एक पाऊल स्वर्गात दुसरे भूलोकावर आणि तिसरे बळीराजाच्या डोक्यावर ठेवले. अशाने बळीराजा पाता लोकात गेला.

गर्विष्ठ झाला तरीही सत्वशील, दानशूर अश्या बळीराजाला भगवान विष्णूने पाहता लोकांचे राज्य बहाल केले आणि वर दिला कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. त्याला आणखी एक वरदान दिले की तो आपल्या लोकांसोबत राहण्यासाठी, पूजनीय होण्यासाठी आणि भावी इंद्र बनण्यासाठी वर्षातून एक दिवस पृथ्वीवर परत येऊ शकतो.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला बलिप्रतिपदा कथा , बलिप्रतिपदा माहिती , balipratipada information in marathi , balipratipada mahiti in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि आणि त्यांच्यापर्यन्त पोचवण्यासाठी (share करायला) विसरू नका.

1 thought on “बलिप्रतिपदा कथा । बलिप्रतिपदा माहिती | balipratipada information in marathi”

Leave a Comment