माझे गाव निबंध मराठी | my village essay in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये आपल्या गावाविषयी निबंध लिहिला आहे . ही माहिती तुम्ही  माझे गाव निबंध मराठी , my village essay in marathi , माझे गाव मराठी निबंध लेखन , essay on my village in marathi  याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

माझे गाव निबंध मराठी | my village essay in marathi

आमचे गाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागर तालुक्यामध्ये आहे. आमचे गाव कोकणातील निसर्गरम्य असा ठिकाणी आहे. आमच्या गावातून छोटीशी नदी वाहते. आमच्या गावामध्ये नळ योजना दोन वर्षाआधी पासून सुरू झाली. पण त्या आधी आमच्या गावांमधील महिलांना कपडे धुवण्यासाठी नदीवर जावे लागत असे. आमच्या गावाची लोकसंख्या १५,००० आहे. 

माझ्या गावाविषयी माहिती ( information about my village )

आमच्या गावामध्ये मुंबई वरुन एसटी फक्त दोनदा येते. त्याचप्रमाणे दिवसातून 4 वेळा सकाळ , संध्याकाळ तालुक्याच्या ठिकाणीं जायला एसटी गावामधे उपलब्ध असते. उच्च शिक्षणानंतर खेडेगावांमध्ये कमी प्रमाणात नोकरी तसेच व्यवसाय विषयक संधी असल्यामुळे आमच्या गावातील तरुण-तरुणी मोठा प्रमाणात शहराकडे वळली आहेत. याखेरीज, हापूस ,काजू खरेदी-विक्री , कुकूटपालन ,शेळीपालन , दूध संकलन इतर व्यवसाय मोठ्या प्रमाणात केले जातात.

दर सोमवारी तालुक्याच्या ठिकाणी आठवडा बाजार असतो तिथे जायला सकाळी 8 वाजता एसटी असते. सणासुदीच्या काळात याच बाजारात खरेदसाठी नागरिकांची झुंबड उडते. आजूबाजूच्या अनेक छोट्या मोठ्या गावांमधून सर्व नागरीक खरेदी विक्री करण्यासाठी येथे येतात. माझ्या मामाचे फळांचे दुकान सुद्धा येथेच आहे. आम्ही कधी गेलो तर आम्हाला ते डझनभर फळे मोफत देतात.

गावामधे जिल्हापरिषदेची शाळा आहे पण तालुक्याच्या ठिकाणच्या इंग्लिश माध्यमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रोज पोषण आहार दिला जातो. गावातील अनेक वाडी मधील गरीब घरातील विद्यार्थी येथे शिकायला येतात आणि आपला भविष्य घडवत असतात. आमच्या गावातील शाळा जरी जिल्हा परिषदेची असली तरी त्यांचा शिकवण्याचा दर्जा उत्कृष्ट प्रतीचा आहे.

आमच्या गावातील मंदिरे ( temples in my village )

आमच्या गावामध्ये दत्त मंदिर आहे. दत्तजयंतीला या मंदिरामध्ये मोठा उत्सव असतो. त्याचप्रमाणे गावामध्ये चंडिका माता, सोनसाळवी मंदिरे सुद्धा आहेत. दरवर्षी आमच्या गावामध्ये होळी, गणेश चतुर्थी, गोकुळाष्टमी, नवरात्र उत्सव, दिवाळी हे मोठ्या उत्साहात व आनंदात साजरे केले जातात. वर्षाच्या इतर दिवशी जरी घरे बंद असली तरी या सणांसाठी गावाबाहेर नोकरीधंदा निमित्त असलेले सर्व नागरिक गावी परततात.

आमच्या गावातील शिमगा ( holi in my village )

फाल्गुन महिना आला की सर्वांना गावची ओढ लागते ती शिमग्यासाठी म्हणजेच होळीसाठी. होळीच्या दरम्यान कोकणातील प्रत्येक घरामध्ये ग्रामदेवतेचे आगमन होते. ग्रामदेवतेच्या मूर्ती पालखी स्वरूपात विराजमान करून पूर्ण गावामधे नाचत नाचत खेळवण्यात येते. होळीपासून ते दसऱ्यापर्यंत भजन, खेळे, नाटकं, दशावतार असे अनेक कार्यक्रम राबिवले जातात.

आमच्या गावातील गणेशोत्सव / गणेश चतुर्थी ( ganpati celebration in my village )

आमचे गाव कोकणात असल्यामुळे तेथे गणेश उत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा केला जातो. गावातील प्रत्येक घरोघरी गणपती बाप्पा ची प्रतिष्ठापना केली जाते. दररोज मनोभावे आरती व पूजा-अर्चा केली जाते. गावातील अनेक मित्रमंडळी, नातेवाईक एकमेकांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतात. गावातील सर्वाचे विघ्न दूर होऊन सुख समृद्धी लाभूदे यासाठी प्रार्थना करतात.

आमच्या गावामध्ये छोटे सरकारी आरोग्यकेंद्र सुद्धा आहे. जेथे सर्दी, ताप, खोकला, लसीकरण, प्रसूती इ. आजारावर उपचार केले जातात. पण कोणत्याही मोठ्या किंवा गंभीर स्वरूपाच्या आजारावर उपचार करण्यासाठी आम्हाला जिल्हा रुग्णालय किंवा खाजगी रुग्णालयात जावे लागते.

आमच्या गावामधे शेती गहू , नाचणी तसेच मुळा , पालक , मेथी , माठ , घेवडा , वाल इ पिकांचे उत्पादन केले जाते. चार वर्षांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसामुळे आणि वादळामुळे आमच्या गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने मदतीची घोषणा केली होती पण ती कागदा पुरतीच मर्यादित राहिली. प्रत्यक्ष कोणालाच मदत मिळालीच नाही.

आमच्या गावातील पर्यटन ( tourism in my village )

आमचे गाव समुद्र किनाऱ्यापासून जवळ असल्यामुळे ऐन सुट्ट्यांच्या कालावधी मध्ये पर्यंटकाची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमते. त्यामुळे गावातील नागरिकांना मदत उद्योग धंद्याचे साधन उपलब्ध होते आणि पर्यटनाला चालना मिळते. तसेच आम्ही सुद्धा नारळी पोफळीच्या बागा पाहण्यासाठी उत्सुत्क असतो. तेथील एखाद्या छोट्या हॉटेल मध्ये चविष्ट अश्या माश्याची चव चाखतो. पुढील दोन दिवस तरी त्या माश्याची चव जिभेवर रेंगाळत असते.

निसर्गाने आमच्या गावाला भरभरून दिले आहे. पण आपण त्याची कदर केली आणि निगा राखली तर तो आपणांस हानी पोहचवणार नाही. नाहीतर त्याचं रुद्र रूप पाहायला जास्त वेळ लागणार नाही. म्हणूनच मला असा वाटतं , माझा गावं कितीही प्रगत जरी झालं तरी निसर्गाचे सौंदर्य अबाधित राहावं.

धन्यवाद वाचकांनो. जर आपल्याला  माझे गाव निबंध मराठी , my village essay in marathi , माझे गाव मराठी निबंध लेखन , essay on my village in marathi  हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment