अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती | ashtavinayak ganpati names and places in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती आणि त्यांची ठिकाणे याबद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती , ashtavinayak ganpati names and places in marathi , (ashtavinayak ganpati names in marathi ), ganpati names in marathi याविषयी माहिती लिहिण्यासाठी वापरू शकता.

Table of Contents

अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती | ashtavinayak ganpati names and places in marathi

अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती | ashtavinayak ganpati names and places in marathi

श्री मोरेश्वर गणपती ( mayureshwar ganpati information in marathi )

मोरगाव ता. बारामती, जिल्हा पुणे.

mayureshwar ganpati images,mayureshwar ganpati temple, mayureshwar ganpati
mayureshwar morgaon ganpati

मयुरेश्वर गणपती माहिती मराठीमध्ये  – mayureshwar ganpati information in marathi

श्री गणेशाचे हे आद्यपीठ होय. क्षेत्र भूस्वानंद भुवन म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील साडे तीन गणेश पीठांपैकी हे आद्यपी स्थानाचे महात्म्य पुराणातील सहाव्या खंडात समाविष्ट आहे. भृशुंडी ऋर्षीच्या सांगण्यावरून ब्रम्हा, शक्ती सूर्य या देवतांनी येथे अनुष्ठान करून गणेश पिठाची स्थापना स्थानी गणेशाने मोरावर बसून सिंधू कमलासुर दैत्याचा संहार मोर हे वाहन त्यावरून म्हणतात. येथील मंदिराची उभारणी ब्रम्हदेवाने केली. चिंचवड येथील महान गणेश उपासक श्री मोरया यांचे जन्म येथे नदीच्या पात्रात त्यांना गणेश मूर्ती सापडली. त्यांनी त्या मूर्तीची चिंचवड येथे स्थापना केली. मोरगाव क्षेत्राचे व्यवस्थापन चिंचवड देव स्थानाकडे आहे.

वर्षातून दोन वेळा गणेशाची पालखी चिंचवडहून चारशे पूर्वी योगींद्र महाराजांचा अवतार झाला. येथे योगींद्र मठाची स्थापना केली व संपूर्ण भारतात गणेश संप्रदायाचा प्रसार केला. गाणपत्य संप्रदायाचे हे प्रमुख केंद्र आहे. त्यांना २२८ वर्षाचे आयुष्य लाभले. त्यांची समाधी मंदिर दर्शनीय आहे. मयुरेश्वर मंदिरात त्यांचा सुंदर पुतळा मयुरेश्वराचे दर्शन घेताना समर्थ रामदासांनी ‘सुखकर्ता दुखहर्ता’ आरती उत्स्फुर्तपणे रचली. येथील दशमीचा उत्सव रात्रभर चालतो. गणेशास तोफाची सलामी जाते. नंतर गणेशाची पालखी गावात मिरवली जाते व गावातील सर्वांच्या वंशावळीचे वाचन होते.

पुरंदर तालुक्यात कन्हा नदीच्या तीरावर उत्तराभिमुख असे मंदिर आहे. भोवती तटबंदी असून मंदिराच्या चारही दिशेला चार मिनारासारखे खांब आहेत. मंदिराला पायऱ्या असून तेथेच नगारखाना व बाजूला पायात लाडू धरलेला उंदीर आहे. पुढे अकरा पायऱ्या चढून गेल्यावर एका दगडी चौथऱ्यावर मोठा आसा काळ्या पाषाणातला, गणपतीकडे तोंड केलेला नंदी आहे. त्या नंदीपुढे मोठे, चपटी, दगडी असे कासव आहे. या कासवापुढे मुख्य मंदीर लागते. ते दगडी पाषाणातले असून तेथेही एक मोठा उंदीर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात डाव्या सोंडेची मयुरेश्वराची मूर्ती आहे. या मूर्तीला तीन डोळे असून डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. मूर्तीच्या बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पितळेच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या आवारात शमी, मंदार, बेल यांची वृक्ष आहेत. 

श्री सिद्धीविनायक गणपती  – shree siddhivinayak mandir siddhatek

सिद्धटेक ता. कर्जत, जि. अहमदनगर

siddhivinayak siddhatek images,siddhivinayak siddhatek temple, siddhivinayak siddhatek
siddhivinayak siddhatek ganpati

भीमा नदीकाठी हे सिद्धिविनायकाचे मंदिर वसलेले आहे. या ठिकाणी विष्णूला सिद्धी प्राप्त झाली म्हणून या गणपतीला सिद्धिविनायक आणि या परिसराला सिद्धटेक असे म्हटले जाते. भगवान विष्णूने येथील गणेश मूर्तीची स्थापना केली. मधु व कौटभ या दैत्यांचा वय करण्यासाठी श्री विष्णूने येथे विनायकाची आराधना केली. विष्णूस येथे सिद्धी प्राप्त झाली म्हणून येथील गणेशास सिद्धीविनायक म्हटले जाऊ लागले.

येथील दक्षिणवाहिनी असणाऱ्या भीमा नदीला पूर आला तरी परिसरात नदीच्या प्रवाहाचा आवाज होत नाही. या नदीवरील दगडी घाट अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची असणारी ही एकमेव मूर्ती असल्याने तिचे सोवळे कडक आहे. गणेशास सकाळी खिचडी, दुपारी महानैवेद्य, संध्याकाळी दूध भात, व रात्री भिजलेल्या डाळीचा नैवेद्य असतो.

हे मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या महाद्वारावर नगारखाना आहे. महाद्वारातून आत गेल्यावर सभामंडप असून त्यापुढे गाभारा आहे. गाभान्यात उजव्या सोंडेची व शेंदूर लावलेली सिद्धिविनायकाची मूर्ती आहे. त्याची एक मुंडी दुमडलेली असून त्यावर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. गाभान्यातील मखर पितळेची असून त्यावर चंद्र, सूर्य, गरुड, नागराज, यांच्या आकृती कोरलेल्या असून दोन्ही बाजूला जय-विजय आहेत.

श्री. बल्लाळेश्वर गणपती – pali ganpati

पाली ता. सुधागड, जिल्हा रायगड

ballaleshwar pali images,ballaleshwar pali temple, ballaleshwar pali ganpati
ballaleshwar pali ganpati

 बल्लाळेश्वर पाली गणपती मराठी माहिती ( ballaleshwar pali information in marathi )

बल्लाळाची कथा गणेश पुराण व मुदगुल पुराणात आहे. कल्याण नावाच्या व्यापाऱ्याचा बल्लाळ हा सुपुत्र. बालपणापासून त्याची विनायकावर श्रध्दा होती. त्याने गावातील इतर मुलांनाही भक्ती मार्गास प्रवृत्त केले. त्यामुळे गावातील मुलांचे अध्ययन व व्यवहाराकडे दुर्लक्ष्य होऊ लागले. हे पाहून त्याच्या पित्याचा क्रोध अनावर झाला. त्याने बल्लाळाच्या गणेशास दूर फेकून दिले.व बल्लाळाचे हाल करून त्यास झाडाला टांगून दिले. बल्लाळाने गणेशाची आराधाना केली.

गणेश त्यास प्रसन्न झाले आणि त्यांच्या इच्छानुसार पाषाणरूपी मूर्तीत येथेच राहिले व बल्लाळेश्वर नावाने ओळखले जाऊ लागले. बल्लाळेश्वर मंदिराच्या अगोदर श्री घोडी विनायकाचे मंदिर आहे. व बल्लाळाच्या पित्याने फेकून दिलेली हीच ती मूर्ती प्रथम या मूर्तीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. येथील बल्लाळेश्वराची पूजा सकाळी ११.३० पर्यंत स्वहस्ते करता येते. माघी चतुर्थीस मध्यरात्री श्री बल्लाळेश्वर स्वहस्ते प्रसादाचे सेवन करतात अशी श्रध्दा असल्यामुळे असंख्य भाविक या समारंभासाठी येतात.

रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात आंबा नदिच्या सान्निध्यात स्वयंभु असे बल्लाळेश्वरांचे मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून सुर्योदय होताच सूर्याची कोवळी किरणे मूर्तीवर येऊन पडतात. मंदिरांच्या आवारात मोठी घंटा असून सभामंडपाला आठ खांब आहेत. पुढील गाभाऱ्यात दोन पायात मोदक घरून बल्लाळेश्वराकडे पाहणाऱ्या उंदीराची मूर्ती आहे.

आतील गाभाऱ्याच्या वरील बाजूस घूमट आकार असून त्यावर अष्टकोनी कमळ आहे. या गाभाऱ्यात बल्लाळेश्वराची डाव्या सोंडेची पाषाणाची मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ विशाल असून डोळयात व बेंबीत हिरे बसविलेले आहेत. चांदिच्या थाळीदर रिध्दी-सिध्दीच्या मूर्ती चवऱ्या डाळीत आहेत.

श्री वरदविनायक गणपती – varad vinayak ganpati

महाड ता. खालापूर, जिल्हा रायगड.

varadvinayak mahad ganpati ,varadvinayak mahad temple, varadvinayak mahad ganpati, mahad varadvinayak ganpati images
varadvinayak mahad ganpati

वरद विनायक गणपती माहिती मराठीमध्ये  ( varad vinayak ganpati information in marathi )

गाणपत्य संप्रदायाचे आदय प्रर्वतक ऋग्वेदातील प्रसिध्द मंत्रद्रस्त्ये व गणानं त्वा या मंत्राचे प्रवर्तक ऋषी मृत्समद यांनी श्री वरदविनायकाची येथे स्थापना केली. गृत्समद ऋषीनी आपल्या मातेला श्राप दिला होता. त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी येथील अरण्यात ओम गं गणपतेय नमः या मंत्राचा अनेक वर्ष जप केला.

गणेश प्रसन्न झाल्यावर त्यांनी गणेशास प्रार्थना केली की त्यांनी येथेच राहून भक्तांची मनोकामना पूर्ण करावी, इच्छा पूर्ण करणारा म्हणून त्यास वरद विनायक म्हटले जाऊ लागले. या मंदिराबाबत एक कथा प्रसिध्द आहे. एका भक्ताला स्वप्नात देवाळाच्या मागील तळयात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या माणसाने शोध घेतला व त्याला मूर्ती मिळाली. त्याच मूर्तीची येथे प्राणपतिष्ठा करण्यात आली आहे.

भाविकांसाठी २४ तास उघडे असणारे हे एकमेव देऊळ आहे. शिवाय दुपारी १२ पर्यंत स्वहस्ते गणेशाची पुजा करता येते. मंदिरात १८९२ पासून सतत नंदादीप तेवत आहे. भक्तांना वर देणार वरदविनायक. १७२५ साली पेशवे काळात हे मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर कौलारू घुमटकर असून पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या चारही बाजूंना दोन-दोन हत्ती कोरलेले आहेत. मंदिरांच्या पश्चिमेला देवाचे तळ आहे तर उत्तरेला गोमुख आहे. मंदिरावर नागाची नक्षी असलेला सोन्याचा कळस आहे.

मंदिराला दगडी नक्षीकाम केलेली महिरप असून गाभाऱ्यात वरदविनायकाची दगडी सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे. गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख व डाव्या सोंडेची आहे. पुण्यातील पेशवे हे थोर गणेशभक्त होते. माधवराव पेशव्यांचे थेऊरला निधन झाल्यावर त्यांनी सती गेलेल्या रमाबाईची समाधी तेथे आहे. मंदिररच्या आवारात थोरल्या माधवरावांची कारकीर्द वर्णन करणारे कलात्मक दालन आहे. हे दालन निरगुडकर फौडेशनच्या वतीने तयार करण्यात आले आहे.

श्री गिरीजात्मक गणपती  ( girijatmaj ganpati )

लेण्याद्री ता. जुन्नर, जिल्हा पुणे

lenyadri ganpati photo ,lenyadri ganpati temple ,girijatmaj ganpati ,girijatmaj ganpati images
Girijatmaj lenyadri ganpati

गिरिजात्मजा गणपती माहिती मराठीमध्ये – girijatmaj ganpati information in marathi

या गणेशाची स्थापना पार्वती मातेने स्वहस्ते केली. येथे ज्या गुहेत तिला श्री गणेश प्रसन्न झाले त्याच गुहेत तिने श्री गणेशाची स्थापना केली. हे स्थान उंच डोंगरावर असून लेण्यांच्या स्वरूपात आहे. गिरीजा म्हणजे पार्वती, मत आणि पार्वतीया पुत्र गणेश म्हणजे तिचा आत्मज. त्यावरून त्यास गिरिजात्मक म्हटले जाऊ लागले.

गजाननाची पुत्र म्हणून प्राप्ती व्हावी म्हणून या गुहेत पार्वतीने बारा वर्षे तपश्चर्या केली व गणेशाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली. त्यानुसार भाद्रपद चतुर्थीस सचेतन होऊन बटुरूपात तो प्रकट झाला तेव्हा त्याला सहा दात व सीन नेत्र होते. गौतम ऋषींचा गणेशास येथे लाभ झाला. सतत १५ वर्षे गणेशाने येथे वास्तव्य केले म्हणून या क्षेत्राचे महात्म्य थोर आहे. येथे एकूण २८ लेण्या आहेत. मंदिर सातव्या लेणीत असून त्याला गणेश लेणी म्हणतात.

६ य्या लेणीत बौद्ध स्तूप असून येथे सात वेळा आवाजाचा प्रतिध्वनी उमटतो. लेणीस जाण्यासाठी ३२१ पायऱ्या आहेत. गणेशाची मूर्ती लेणीच्या भिंतीत स्वयंभू प्रकट झालेली आहे. लेणी परीसर पुरातत्व विभागाच्या अधिकारात पुरा आहे. मंदिरात प्रवेशासाठी पुरातत्त्व विभाग पाच रुपये शुल्क आकारते.

जुन्नरजवळ लेण्याद्री हा लेणी असलेला पर्वत असून गिरीजात्माकाचे मंदिर डोंगरावरील आठव्या गुहेत आहे. देवळात जाण्यासाठी ३६७ पायऱ्या आहेत. डोंगरात कोरलेले हे मंदिर अखंड अशा एकाच दगडात कोरलेले असून दक्षिणाभिमुख आहे. दालनात गणपतीची प्रतिमा असून त्याला एकही खांब नाही. तसेच दालन आकाराने मोठे आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या गिरीजात्माकाच्या मूर्तीवर उजेड असतो. मंदिरात दगडात खोदलेली गिरिजात्मजाची उत्तराभिमुख व ओबडधोबड मूर्ती असून गणेशाची मान डाव्या बाजूला वळलेली असल्याने गणपतीचा एकच डोळा दिसतो.

श्री विघ्नेश्वर गणपती ( ozar vighneshwar )

ओझर ता. जुन्नर, जिल्हा

ozar vighneshwar, ozar vighneshwar temple, ozar vighneshwar images, ozar vighneshwar ganpati
vighneshwar ozar ganpati

ओझर गणपती माहिती मराठीमध्ये ( Ozar Ganpati information in marathi )

पुणे देवांनी मिळून या गणेशाची येथे स्थापना केली. विघ्नसुराचे पारिपत्य करण्यासाठी गणेशाने येथे पारण केला अभिनंदन नावाच्या राजाने इंद्रपद मिळवण्यासाठी यज्ञ सुरु केला ही वार्ता इंद्रासाने यज्ञात किन आणण्याची विघ्न आज्ञा दिली. विघ्नसुर केवळ यज्ञाचा नाश करून थांबला नाही तर त्याने सर्वच देव व धर्माला आव्हान दिले. देवांनी संकट दूर करण्यासाठी गणेशाची आराधना केली.

मग गणेशाने पराशर ऋर्षीया पुत्र म्हणून येथे अवतार घेतला प विघ्नेश्वराचा वध केला. माझे नाव धारण करून आपण येथेच राहावे ही विघ्नेश्वराची प्रार्थना गणेशाने स्वीकारली ते येथे विघ्नेश्वर नावाने राहिले. चिमाजी आप्पानी वसईच्या लढयात विजय मिळवल्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
ट्रस्ट कडून दरवर्षी नाममात्र दरात तीनशे सामुदायिक विवाह येथे लावले जातात. तसेच गजानन सागरात नौका विहाराची सोय करण्यात आलेली आहे. अष्टविनायकातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जाणारा व विनाहरण करणारा ही नदीच्या तीरावर बसलेला असून से गणपतीचे एक जागृत स्थान आहे.

मंदिराला दगडी तटबंदी आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराचा कळस व शिखर सोन्याचा आहे. प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला दगडात कोरलेले भालदार-चोपदार आहेत. महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर दोन उंच दीपमाला नजरेस पडतात. मंदिरात एकात एक अशी सभामंडपाची रचना असून प्रवेश द्वारातून प्रवेश करताच काळ्या पाषाणातील उंदीराची मूर्ती आहे.वर चित्रकाम केलेले आहे.

दोन सभामंडपातून आत गेल्यावर देवाचा गाभारा आहे. गाभान्यात डौलदार कमानीत बसलेली पूर्णा कृतीतील विप्नेश्वराची डायासडिवी मूर्ती आहे. मूर्तीच्या दोन डोळ्यात माणके तसेच कपाळावर व वैबीत हिरे आहेत. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पितळेच्या मूर्ती आहेत. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

श्री महागणपती ( ranjangaon ganpati )

रांजणगाव , ता. शिरुर, जिल्हा पुणे

ranjangaon ganpati, ranjangaon ganpati photo, ranjangaon ganpati mandir, ranjangaon ganpati temple
mahaganpati ranjangaon

रांजणगाव गणपती इतिहास मराठीमध्ये  ( Ranjangaon Ganpati history in marathi )

हे क्षेत्र भगवान शंकरांनी वसविले असून त्यांनीच गणेशमूर्तीची येथे स्थापना केली. गृत्समद ऋषींचा पुत्र त्रिपुरासुर हा गणेशाने दिलेल्या वरामुळे अतिशय उन्मत्त झाला होता. त्याने सर्व देवानाही जिंकले. सर्व देवांच्या विनंती वरून भगवान शंकराने या दैत्याचे पारिपत्य करण्याचे मान्य केले. शंकराने विनायकास प्रसन्न करून घेतले.

कार्तिक शुद्ध पौर्णिमेस याच ठिकाणी शंकराने त्रिपुरासुराचे पारिपत्य केले. त्या वेळपासून या पौर्णिमेस त्रिपुरी पौर्णिमा म्हणण्यात येऊ लागले. पेशव्यांनी येथील अन्याबा देवांना वंश परंपरागत देवाची पूजा करण्याची सनद दिली. मोरया गोसावी यांनी अन्याबा देवांना गणेशाची धातूची मूर्ती प्रसाद म्हणून दिली. त्या मूर्तीची उत्सवात मिरवणूक निघत असते.

भाद्रपद महिन्यात येथे घरोघरी गणेशाची स्थापना करण्याची प्रथा नाही तर मंदिरातील गणेशाची पूजा केली जाते. श्री व्यंकटेश हान्रीच, पुणे यांच्या वतीने रोज सकाळी शिरा वाटप करण्यात येते. अष्टविनायकातील सर्वात शक्तिमान असे मानल्या जाणा-या महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन पद्धतीचे आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की उत्तरायण व दक्षिणायन याच्या मधल्या काळात सूर्याची किरणे महागणपतीच्या मूर्तीवर पडतात.

मंदिराचे प्रवेशद्वार भव्य असे असून प्रवेशद्वारावर जय-विजय हे द्वारपाल आहेत. मंदिरातील सभामंडपातून आत गेल्यावर गाभा-यात महागणपतीची डाव्या सोंडेची मूर्ती आहे. गणपतीने कमळाची आसनमांडी घातलेली आहे. गणपतीला दहा हात आहेत. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. मंदिराचे स्थान इ. स. दहाव्या शतकातील आहे.

चिंतामणी गणपती ( chintamani ganpati theur)

थेऊर, ता. हवेली, जिल्हा पुणे

chintamani ganpati theur, theur ganpati temple, theur ganpati , chintamani theur history in marathi
chintamani theur ganpati

श्री चिंतामणी गणपतीचा इतिहास ( chintamani theur history in marathi )

येथील गणेश मूर्तीची स्थापना कपिल मुनींनी केली. कपिल मुर्नीजवळ एक चिंतामणी नावाचे रत्न होते. हे रत्न त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करीत असे. एकदा गणासूर त्यांच्या आश्रमात आला असता त्यांनी या रत्नाच्या सहाय्याने त्याला पंच पवत्राचे जेवण दिले. हे पाहून गणसुर स्तंभित झाला. त्यास रत्नाचा मोह निर्माण झाला.

त्याने कपिल मुनींकडे या रत्नाची मागणी केली व त्यांनी नकार देताच गानासुराने ते रत्न हिसकावून घेतले. कपिल मुनींनी गणेशाची उपासना केली. विनायकाने प्रसन्न होऊन येथील कदंब वृक्षाखाली गानासुराचे पारिपत्य केले. तेव्हा मुनींनी विनायकाच्या गळ्यात ते रत्न बांधले, तेव्हापासून गणेशाला चिंतामणी नावाने संबोधले जाऊ लागले.

गौतम ऋषींच्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी इंद्राने याच गणेशाची आराधना केली असेही ऐकिवात आहे. या क्षेत्राचे व्यवस्थापन चिंचवड येथील मोरया गोसावी संस्थेकडे आहे. चिंचवडच्या मोरया गोसावींनी तपश्चर्या केली असता विनायकाने वाघाच्या रुपात त्यांना दर्शन दिले.

मुळा व मुठा नद्यांनी वेढलेल्या या थेऊर गावाला पूर्वी कदंब तीर्थ वा चिंतामणी तीर्थ म्हटले जात असे. कदंब वृक्षाच्या खाली हे मंदिर वसलेले आहे. या उत्तराभिमुख मंदिराच्या महाद्वारात प्रवेश केल्यानंतर प्रशस्त आवारात मोठी घंटा असून तेथे शमी व मंदार वृक्ष आहेत. पुढे सभामंडपात यज्ञकुंड आहे. त्यापुढे गाभा-यात डाव्या सोंडेची शेंदूर लावलेली चिंतामणीची स्वयंभु मूर्ती आहे. या पूर्वाभिमुख गणेश मूर्तीच्या डोळ्यात माणिक रत्न आहेत.

धन्यवाद वाचकांनो. जर आपल्याला अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती , ashtavinayak ganpati names and places in marathi , (ashtavinayak ganpati names in marathi ), ganpati names in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

1 thought on “अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती | ashtavinayak ganpati names and places in marathi”

Leave a Comment