माझा आवडता मित्र निबंध मराठी | my best friend essay in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये मित्रा विषयी निबंध लिहला आहे. ही माहिती तुम्ही माझा आवडता मित्र निबंध मराठी , my best friend essay in marathi , माझा प्रिय मित्र , माझा मित्र निबंध , माझा प्रिय मित्र वर निबंध याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

माझा आवडता मित्र निबंध मराठी | my best friend essay in marathi

मला अनेक मित्र आहेत पण शरद हा माझा खरा उत्तम मित्र आहे. आम्ही रोज सकाळी एकत्र शाळेमध्ये जातो तसेच शाळा सुटल्यावर सुद्धा एकत्रच घरी येतो. शरदचे घर माझ्या घरापासून जवळच आहे. तो माझ्यापेक्षा दोन महिन्यांनी मोठा आहे.

शाळेत असताना मधल्या सुट्टी मध्ये आम्ही दोघे एकत्र जेवण करतो. त्याला बटाटा आणि भेंडीची भाजी फारच आवडते. त्याचप्रमाणे आमच्या घरी मासे बनवल्यावर मी त्याला जेवण्यासाठी आमंत्रित करतो.

शरद आणि माझं नातं एका मित्रापेक्षा मोठ्या भावासारखा आहे. त्याचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि दयावान आहे. काही क्षुल्लक कारणामुळे आमच्या दोघांमध्ये भांडणे होतात. पण नंतर काही दिवसांनी आम्ही पुन्हा एकत्र येऊन काही न झाल्यासारखेच वागतो. 

शरदला मोठे होऊन डॉक्टर बनायचे आहे. गोरगरीब रुग्णांना मोफत सेवा देण्याचा त्याचा हेतू आहे. तसेच डॉक्टर झाल्यावर इस्पितळ उघडून दीनदुबळ्या लोकांसाठी माफक दरात वैद्यकीय सेवा पुरवून समाजकार्य करण्याचे त्याचे स्वप्न आहे.

तो आमच्या वर्गातील एक गुणवंत विद्यार्थी आहे. सर्व शिक्षक त्याच्या हुशारीचे कौतुक करतात आणि त्याला शाबासकी देतात. गणित आणि विज्ञान हे त्यांचे आवडते विषय आहेत. 

मागच्याच महिन्यात शरदचा वाढदिवस साजरा झाला. त्याला मी त्याचा आवडतो पेन गिफ्ट म्हणून दिला होता.

शरदच्या घरी आई , बाबा , आजी , आजोबा आणि एक लहान बहीण असा परिवार आहे. त्याला एक लहान बहिण असून तो कुटुंबामध्ये मोठा आहे. शरद चे बाबा गणिताचे शिक्षक आहेत. ते अतिशय शिस्तप्रिय आणि ज्ञानी आहेत. त्यांचेच शारदमध्ये सुद्धा उमटले आहेत. शरदची आई गृहिणी आहे. त्याची लहान बहीण आमच्याच शाळेत इयत्ता २ री मध्ये शिकते.

शरद त्याच्या आजी किंवा आजोबां बरोबर दररोज संध्याकाळी बागेमध्ये फिरायला येतो. त्यांच्या बरोबर कधीकधी मी पण असतो. आजोबा आम्हाला त्यांच्या बालपणीच्या गोष्टी सांगतात. आम्ही त्या गोष्टीमध्ये रमून जातो.

मी नेहमी स्वतःला नशीबवान समजतो की , शरद सारखा माझा एक चांगला मित्र आहे. मला खात्री आहे की , तो मला प्रत्येक संकटात मदत करेल. 

माझा मित्र शरद जीतका विज्ञानावर विश्वास ठेवतो , तितका धार्मिक सुद्दा आहे. आम्ही दर मंगळवारी गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जातो. दर्शन घेऊन झाल्यावर बाहेर बसणाऱ्या भिक्शुकांना काहीतरी खाऊ तो नक्कीच देतो.

त्याचे असा म्हणणे आहे की , जे गरीब जेष्ठ नागरिक आहेत किंवा शारीरिक अपंगत्व आलेली व्यक्ती असेल तर त्यांना आपण दान करण्यास काहीच हरकत नाही. पण लहान मुलांना भीक देणे टाळावे , कारण त्यांना जर सहज भीक मागून पैसे मिळाल्यास ते मोठे यशस्वी होणार नाहीत.

शरदच्या सर्व इच्छा , आकांशा पूर्ण होवोत आणि देव नेहमी सुखी ठेवो हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला माझा आवडता मित्र निबंध मराठी , my best friend essay in marathi , माझा प्रिय मित्र , माझा मित्र निबंध , माझा प्रिय मित्र वर निबंध हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment