माझी आजी मराठी निबंध | my grandmother essay in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये आजी विषयी माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही माझी आजी मराठी निबंध , mazi aaji essay in marathi , my grandmother essay in marathi , माझी आजी निबंध, majhi aaji nibandh in marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

 माझी आजी मराठी निबंध | my grandmother essay in marathi

आई नंतरची घरातील दुसरी स्त्री म्हणजे आजी.

जेव्हा मी खूप लहान होतो तेव्हा ती माझी रोज तेलाने मालिश करत असे आणि आंघोळ ही घालत असे.
मी लहान असताना ती कधी कधी स्वतःच्या हाताने मला जेवण भरवत असे. तिचा स्वभाव खूपच प्रेमळ आणि मनमिळावू आहे. तिचं वय जास्त असले तरीही ती माझ्या आईला घरकामात मदत करते.

आजीचे बालपण

माझ्या आजीचे वय 70 वर्षे आहे. तिचा जन्म कोकणातील (मोरवण, चिपळूण) या छोट्या खेडेगावात झाला आहे. ती लहान असतानाच तिचे आई , बाबा वारले. म्हणून माझ्या आजीचा सर्व सांभाळ तिच्या काकांनी केला. तिच्या लग्नानंतर ती  पहिल्यादा मुंबई मध्ये आमच्या जुन्या घरी पहिल्यांदा राहायला आली.

तिचा हजरजबाबीपणा तिच्या बोलण्यातून जाणवत असे. जुन्या काळातील एकत्र कुटुंब पद्धती मुळे तिच्या लग्नानंतर तिच्यावर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. ती तिने लीलया पेलली. तसेच ५ वर्षे अंथरूणाला खेळून पडलेल्या तिच्या सासूची निपक्षपातपणे सेवा तिने केली होती.

जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला ती रोज रात्री झोपताना एक गोष्ट सांगत असे. त्या गोष्टीतून काय बोध घ्यायचा यावर ती मार्गदर्शन करीत असे. तिचा चष्मा खूप जाड भिंगाचा आहे. तिचे दात कमकुवत झाल्यामुळे तिला काही पदार्थ खाताना त्रास होतो. ती आम्हा भावंडांना बागेत फिरायला घेऊन जाते. पण वयोमानानुसार तिला हळू चालावे लागते.

कधी माझं भांडण माझ्या मित्रांसोबत झालं तर ती माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते. टीव्हीवर एखादे भजन लागले तर त्याचे शब्द ती सहजपणे गुणगुणत असते. कारण तिला भजन आणि जुनी गाणी म्हणायला खूप आवडतात. आजीचा चे बालपण गावी गेल्यामुळे गावासारखे सुख तिला शहरात तितकेसे लाभले नाही. म्हणून ती अधूनमधून गणपतीमधून , होळी , दिवाळी अशा सणासुदीला  गावी फेरफटका मारून येत असे.

तिला जेवण बनवायला आवडते. म्हणूनच ती अतिशय रुचकर पदार्थ बनवते. तिचे आवडते पदार्थ म्हणजे आंब्याचे लोणचे आणि टोमॅटोची भाजी होय. तिचे शिक्षण चौथी पर्यंत झाले होते पण तिला मराठी लिहिता आणि वाचता येते. तसेच तिला मराठीमध्ये सही सुद्धा करायला येते. तिचा ७५ वा वाढदिवस आम्ही मोठ्या थाटामाटात साजरा करणार आहोत.

त्याग म्हणजे काय हे माझ्या आजीकडूनच शिकायला पाहिजे. तिला माहेरकडून तिच्या लग्नामध्ये ५ तोळ्याचा सोन्याचा हार भेट म्हणून मिळाला होता. जेव्हा माझे आजोबा गंभीर रित्या आजारी होते, तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता तिने हा सोन्याचा हार विकला. अश्याप्रकारे आजोबांच्या आजारपणासाठी पैसे उभे केले. 

आजीचा वृद्धापकाळ

वृद्धापकाळामुळे तिचे गुडघे दुखतात. त्यामुळे तिच्या रोज चार ते पाच गोळ्या खाव्या लागतात. तिला ब्लड प्रेशर तसेच डायबिटीस ने ही जखडले आहे. स्नायू व हाडे कमकुवत झाल्यामुळे कधी कधी ती व्यायामाचा कंटाळा करीते. तिचे मोतीबिंदूचे ऑपरेशन सुद्धा झाले आहे. मी एक दिवस आड तिच्या गुडघ्यांचे मालीश करतो. तेवढेच तिच्या गुडघ्यांना आराम मिळतो. वृद्धापकाळामुळे तिला दर तीन-चार महिन्याला डॉक्टर कडे चेकिंग साठी जावे लागते.

मागील वर्षी जेव्हा तिचा ब्लडप्रेशरचा त्रास वाढला होता, तेव्हा तिला पंधरा दिवसांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या पंधरा दिवसांमध्ये दररोज रात्री मी तिला बाबां बरोबर जेवणाचा डब्बा द्यायला जात होतो. त्या पंधरा दिवसांमध्ये मला तिची खुप आठवण आली होती.

आजी म्हणजे घरचा वैद्य

तिला झोपेत चाचपडण्याची सवय आहे. पण सध्याच्या तिच्या वयोमानानुसार तिची झोप सुद्धा कमी झाली आहे. मला जरा कुठे लागलं किंवा खरचटलं तर ती लगेच हळद घेऊन उभी असते. तिला अनेक आजार किंवा व्याधींवर चे घरगुती व आयुर्वेदिक उपाय माहिती आहेत. म्हणून आम्ही तिला घरचा वैद्य असे म्हणतो.

तिला देवाची भक्ती तसेच पूजा करायला सुद्धा आवडते. फावल्या वेळेत ती देवाचे नामस्मरण करीत असते. तिला आपल्या देशातील धार्मिक स्थळे तसेच देवदर्शन करण्याची खूप इच्छा आहे. ती तरुण असताना घरासाठी आर्थिक हातभार लागावा म्हणून ती घरच्या घरी शिवणकाम सुद्धा करत असे. 

म्हणूनच मी देवाकडे रोज प्रार्थना करतो की माझ्या आजीच्या सर्व दुःख यातना तसेच आजार पळून दूर जावेत आणि तिला सुखी व समृद्ध पूर्ण आयुष्य लाभो. 

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला माझी आजी मराठी निबंध , mazi aaji essay in marathi , my grandmother essay in marathi , माझी आजी निबंध, majhi aaji nibandh in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment