डॉ एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध | dr abdul kalam essay in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या विषयी माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही डॉ एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध , dr abdul kalam essay in marathi , apj abdul kalam essay in marathi , dr apj abdul kalam essay in marathi , abdul kalam essay in marathi , abdul kalam biography in marathi , apj abdul kalam biography in marathi pdf  याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता. 

डॉ एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध | dr abdul kalam essay in marathi

अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव ( a p j abdul kalam full name )

डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम असे आहे.

डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा वाढदिवस ( a p j abdul kalam birthday )

डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला.

भारतात त्यांना “मिसाईल मॅन ऑफ इंडिया” या नावाने सुद्धा ओळखले जाते. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडू जिल्ह्यातील रामेश्वरम मधील छोट्याशा गावी झाला. त्यांचे बालपण अतिशय खडतर व हलाखीचे होते. त्यांचे वडील व्यवसायाने नाविक होते. त्यांना १० भावंडे होती. घराला आर्थिक हातभार लागावा म्हणून लहान असताना ते वर्तमानपत्र विकत असे. सायकल वरुन वर्तमानपत्र विकत असताना ते मधल्या वेळेत पूर्ण वर्तमानपत्र वाचून काढत. ते पूर्णपणे शाकाहारी अन्न ग्रहण करत होते.

मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून त्यांनी एअर नॉटिकल विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांना एका प्रोजेक्टसाठी पैशांची गरज होती. त्यांच्या बहिणीने आपले सर्व दागिने गहाण ठेवून त्यांना सर्वतोपरी मदत केली होती. पण त्यांनी बनवलेला डिझाईन त्यांच्या शिक्षकांना आवडले नाही. म्हणून त्यांनी पुन्हा मेहनत घेऊन फक्त तीन दिवसांमध्ये रात्रंदिवस काम करून एक नवीन आणि सर्वोत्तम डिझाईन बनवले. त्यांनी चांगल्या गुणांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांना २ ठिकाणाहून मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात आले.
१. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स
२. एअर फोर्स

त्यांना एअर फोर्स ला जाण्याची इच्छा होती. एकूण २५ मुलाखतदारा पैकी फक्त ८ जणांची निवड करण्यात आली आणि त्यांचा ९ वा क्रमांक आला होता. त्यांनी निराश न होता मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा तो निर्णय सर्वोत्तम ठरला. त्यांना मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये बढती मिळाली. तेथे त्यांना विक्रम साराभाई यांच्या संघामध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९६३ मध्ये त्यांनां विशेष प्रशिक्षणासाठी नासा मध्ये पाठवण्यात आले.

तेथे त्यांना नासा ने कायमचे अमेरिकन नागरिकत्व, ५ पटीने मानधन देण्याच प्रस्ताव पुढे ठेवला. क्षणार्धात त्यांच्या मनात अनेक विचार आले. शेवटी त्यांच्या मनातील देशभक्ती मुळे त्यांनी भारतातच काम करण्याचा निर्णय घेतला आणि नासाच्या प्रस्तावाला नकार दिला.
मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स साठी काम करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुरवातीला त्यांच्या कडे काम करण्यासाठी ऑफिस सुद्धा नव्हते.

त्यानं कोणीतरी विचारले, यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत?
ते म्हणाले चार गोष्टी लक्षात ठेवा.
१. ध्येय ( aim )
२. त्या ध्येयासाठी सर्व माहिती गोळा करा ( acquire knowledge ).
३. मेहनत ( hard work )
४. हार न मानणे ( perseverance )

डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी सांगितलेला प्रसंग

मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स साठी त्यांना एका प्रोजेक्ट डायरेक्टर बनवण्यात आले होते. त्यावेळी मुख्य डायरेक्टर म्हणून विक्रम भट काम पाहत होते. त्या क्षेपणास्त्राची चाचणी अयशस्वी झाली होती. कोणत्याही क्षेपणास्त्राची किंमत करोडो रुपयांपर्यंत असते. पत्रकार परिषद घेताना एपीजे अब्दुल कलाम त्यांच्या बाजूला बसले होते. त्यामुळे पूर्णतः ते घाबरले कारण ते या प्रोजेक्ट साठी प्रोजेक्ट डायरेक्टर होते.

विक्रम भट म्हणाले आम्हीं प्रयत्न केला पण अयशस्वी झालो. अश्याप्रकरे विक्रम भट यांनी पूर्ण जबाबदारी आपल्या अंगावर घेतली सर्वांना सांगितले या प्रोजेक्टसाठी काम करणारी टीम अतिशय उत्कृष्ट आहे. जरी आता ते अयशस्वी झाले असले तरी पुढच्या वेळी नक्की यशस्वी होतील. नंतर बरोबर एका वर्षानंतर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रयत्नांना यश आले आणि क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली.

तेव्हा विक्रम भट म्हणाले कलाम आता तुम्ही जा आणि पत्रकार परिषद घ्या आणि सांगा की आम्ही यशस्वी झालो आहोत. अशाप्रकारे विक्रम भट यांच्याकडे असणारे नेतृत्व गुण अब्दुल कलाम यांना खूप भावले होते.

डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे देशप्रेम

त्यांचे देशप्रेम सर्वश्रृत आहे. देशाच्या जडणघडणीत त्यांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानामुळे भारत सरकार ने त्यांना भारतरत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. एके दिवशी त्यांचा साखरपुडा ठरला होता. पण त्यांनी स्वतःला संशोधनामध्ये इतका झोकून दिला होत की ते साखरपुड्याला सुध्दा अनुपस्थितीत राहिले. अश्याप्रकारे आपल्या विवाहाची काळजी न करता आपल्या देशाची सेवा त्यांनी केली.

त्यांनी २००२ ते २००७ या कालावधीमध्ये भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कामकाज पाहिले आहे. ते उत्कृष्ट असे वक्ता, लेखक, संशोधक तसेच महान असे व्यक्तिमत्व असलेले होते. एका कार्यक्रमात ते जेव्हा पोहचले तेव्हा त्यांच्या निदर्शनास आले की त्यांना बसण्यासाठी विशिष्ट अशी खुर्ची चे नियोजन केले आहे. त्यांनी तेथील लोकांना त्वरित सांगून अतिशय साधी आणि सर्वांना समान आसन असलेली खुर्ची ठेवण्यास सांगितले. यावरून त्यांचा साधेपणा आणि त्यांची विनम्रता दिसून येते .

कलाम सरांनी घेतलेला जगाचा निरोप ( a p j abdul kalam death date )

आय. आय. ऍम, अहमदाबाद या महाविद्यालयात लेक्चर देताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. अश्याप्रकारे त्यांनी दिनांक २७ जुलै २०१५ रोजी जगाचा निरोप घेतला.

जरी कलाम सर आपणात नसले तरी त्यांनी केलेली भाषणे, सवांद, त्यांचे विचार / विचारसरणी लाखो, करोडो लोकांच्या मनात आजही घर करून आहे. त्यांचे प्रत्येक भाषण नवोदित तरुणांना स्फूर्ती देणारे आहे.

डॉ अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके (a p j abdul kalam books )

अग्निपंख ( wings of fire )
प्रज्वलित मने ( ignited minds )
भारत २०२० ( india २०२०) 

डॉ ए पी जे अब्दुल कलाम विचार ( a p j abdul kalam thoughts / quotes )

स्वप्नाचे रूपांतर विचारात होते आणि विचारांचे कृतीत रुपांतर होते.
स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत पाहता, ते म्हणजे जे तुम्हाला झोपू देत नाही.
तुमच्या ध्येयात यशस्वी होण्यासाठी तुमच्या ध्येयाप्रती एकच मनाची भक्ती असणे आवश्यक आहे.
उत्कृष्टता ही निरंतर प्रक्रिया आहे, अपघात नाही.

डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार ( a p j abdul kalam awards  )

अब्दुल कलाम यांना १९८१ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला.
त्यानंतर त्यांना १९९० मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.
अब्दुल कलाम यांना १९९७ मध्ये भारतरत्न तसेच राष्ट्रीय एकात्मतेसाठी इंदिरा गांधी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर १९९८ मध्ये वीर सावरकर पुरस्कार, २००० मध्ये रामाजुन पुरस्कार, २०१३ मध्ये वॉन ब्रॉन पुरस्कार प्राप्त झाले.

त्याचप्रमाणे अब्दुल कलाम यांनी जवळपास  ४० विद्यापीठांमधून ७ मानद डॉक्टरेट मिळवल्या आहेत.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला डॉ एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध , dr abdul kalam essay in marathi , apj abdul kalam essay in marathi , dr apj abdul kalam essay in marathi , abdul kalam essay in marathi , abdul kalam biography in marathi , apj abdul kalam biography in marathi pdf हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

1 thought on “डॉ एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध | dr abdul kalam essay in marathi”

Leave a Comment