चांद्रयान ३ मराठी माहिती | chandrayaan 3 information in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये चांद्रयान ३ बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही चांद्रयान ३ मराठी माहिती , chandrayaan 3 information in marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

चांद्रयान ३ मराठी माहिती | chandrayaan 3 information in marathi

चांद्रयान ३ मराठी माहिती | chandrayaan 3 information in marathi

२० जुलै १९६९ रोजी अपोलो ११ या मिशनद्वारे अमेरिकेच्या नासा अंतराळ संस्थेने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. त्यानंतर रशिया , चीन , जपान , इस्राएल , आणि इतर प्रगत देशांनी चंद्रावर जाण्यासाठी अथक प्रयत्न केले. चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे आज भारत देश याच देशांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसला आहे.

चांद्रमोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये

  • चंद्रयान ३ चे मुख्य काम चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणे आहे.
  • चंद्रयान ३ मध्ये वापरले गेलेले रॉकेट ल-व्ही-एम -३ जवळपास १४३ फिट उंच आणि ६४२ टन वजनी होते.
  • चंद्रयान ३ चे एकूण खर्च ६१५ करोड आहे.
  • चंद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवला गेला आहे , जिकडे अजून पर्यंत कोणीच गेले नाही.
  • चंद्रयान ३ मध्ये एक स्वदेशी लॅण्डर मोड्युल , प्रॉपल्शन मोड्युल आणि एक रोव्हर आहे.
  • चंद्रयान ३ चा मुख्य उद्देश चंद्राच्या पृष्ठ भागावर खनिज ,पाणी आणि जमिनीमध्ये होणाऱ्या हालचालीवर लक्ष्य ठेवून माहिती घेणे आहे.
  • चंद्रयान ३ मिशनचे प्रतिनिधित्व प्रसिद्ध रॉकेट महिला संशोधक ऋतू करिंधाल करत आहेत.

चंद्राच्या पृष्ठभागावरील रासायनिक मूलद्रव्य व खनिजे दर्शवणारा तक्ता तयार करणे. चंद्रावर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम लोह आणि टायटॅनिक ही मूलद्रव्य तसेच रेडॉन , युरियनम व थोरियम हे जड मूलद्रव्य आढळतात. सिलिकॉन हे इलेक्ट्रॉनिक उपकरणासाठी महत्त्वाचे मूलद्रव्य आहे, तर युरोनियम आणि थेरियम ही अणुऊर्जा उत्पादनासाठी उपयुक्त आहेत. आंतरराष्ट्रीय संबंधित व्यवसायाच्या जागतिक जीडीपी मध्ये साडेतीनशे अब्ज डॉलरची भागीदारी आहे. मौर्गन स्टॅनली यांच्यानुसार २०४० पर्यंत हे १.०४ अब्ज डॉलर होईल. अंतराळात संशोधनासाठी चंद्र हे पहिले स्थानक आहे.

चंद्रावरील दुर्मिळ खनिजे आणि मूलद्रवे

हेलियम ३ हे हेलियमचा एक प्रकार आहे. जो पृथ्वीवर अत्यंत दुर्मिळ आहे. परंतु चंद्रावर हेलियम ३ चा अंदाजे दहा लाख टन एवढा साठा आहे. हेलियम ३ चा वापर करून अणुऊर्जा निर्मिती केली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हेलियम ३ मुळे किरणोत्सार होत नाही. म्हणून भारत , रशिया , अमेरिका आणि चीन यासारखे देश हाच चंद्रावरील दुर्मिळ खजिन्याचा साठा मिळवण्यासाठी चंद्रावर जाण्याची धडपड करत आहेत.

भारताने २२ ऑक्टोबर २००८ रोजी चंद्रयान १ चे यशस्वी प्रक्षेपण केले. सोळा दिवसांनी म्हणजेच ०८ नोव्हेंबरला हे या चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आले आणि १४ नोव्हेंबरला इम्पॅक्ट प्रो यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मूलद्रव्यांमध्ये पाण्याचे रेणू गोठलेल्या अवस्थेत आहेत, हे या मोहिमेने पहिल्यांदा दाखवून दिले. ही मोहीम अत्यंत यशस्वीरित्या पार पडली. त्यानंतर २२ जुलै २०१९ रोजी इसरो ने चंद्रयान २ या मोहिमेद्वारे चंद्राच्या उत्तर ध्रुवाजवळ उतरण्याचा प्रयत्न केला. पण काही तांत्रिक अडचणीमुळे लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर जोराने आदळून तुटला. त्यातून बरोबर म्हणजेच चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणारी बाहेर पडू शकली नाही. त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाचे प्रत्यक्ष निरीक्षण करता आले नाही.

ऑर्बिटर म्हणजेच चंद्राभोवती फिरणाऱ्या यानाचा भाग चंद्र कक्षेत प्रस्थापित केला गेला होता. चंद्राचा अभ्यास करणे व मिळणारे माहिती पृथ्वीवर पाठवण्याचे काम हा ऑर्बिटर चोखपणे करत आहे. त्यामुळे ही मोहीम ७०% पर्यंत यशस्वी झाली, असे इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मत आहे. या मोहिमेचा पुढचा भाग म्हणजे चंद्रयान तीन. या मोहिमेचे नियोजन केले आहे. या मोहिमेमध्ये चंद्रयान 2 च्या मोहिमेत झालेल्या चुका दुरुस्त करण्यात आल्या आहेत.

चंद्रयान मोहीम भारतासाठी का महत्त्वाचे आहे?

या मोहिमेमध्ये अनेक बाबींचा अभ्यास होणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागाच्या खाली असणारी उपयुक्त मूलद्रव्य तसेच जड मूलद्रव्याचे उत्खनन भविष्यात करता येणे शक्य होईल का? याचा यामध्ये अभ्यास होणार आहे. ही मुलद्रवे भविष्यात पृथ्वीवर आणता आली, तर मनुष्याचे राहणीमान सुधारेल. चंद्राच्या ध्रुवाजवळ आंधाऱ्या भागाजवळ गोठलेल्या अवस्थेत पाणी सापडले आहे, तसेच चंद्रावर राहण्यास योग्य त्याचा किती वापर करता येईल , याचा अभ्यास देखील या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

चांद्रयानमध्ये डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे योगदान सुद्धा मोठे आहे. कारण जे रॉकेट चांद्रयान अंतराळमध्ये घेऊन जाण्यासाठी लागते, त्यासाठी डॉ एपीजे अब्दुल कलाम यांनी काम केले होते.

चंद्रावरील पाणी आणि अंतराळ केंद्र

चंद्रावरील पाण्यामधून प्राणवायु काढून अंतराळ मोहिमेसाठी त्याचा इंधन म्हणून वापर करता येईल का ? यावर देखील संशोधन सुरु आहे. चंद्रभोवती फिरते अंतराळ स्थानक स्थापन करून तेथूनच वैज्ञानिक प्रयोग करण्याची क्षमता असलेले केंद्र उभारले जाऊ शकते का ? याचा देखील अभ्यास केला जाणार आहे. भविष्यात हेच प्रयॊग पुढे मंगळावर जाण्यासाठी वापरायचे आहेत. त्यामुळे चंद्रवर आणि मंगळवार येण्या-जाण्यात लागणाऱ्या खर्चात किंवा इंधनात बचत होणार आहे.

मंगळावर वसाहत करण्यापूर्वी चंद्रावर वसाहत करून कोणत्या अडचणीचा सामना करावा लागेल , या गोष्टीचा सुद्धा अभ्यास करण्यात येणार आहे. रशियाने सुद्धा आपले लुना-२५ ये यान चंद्रावर पाठवले होते. पण त्यामध्ये चंद्रावर पोहचण्यापूर्वी तांत्रिक बिघाड आला. जानेवारी २३ मध्ये चीन ने चंद्राच्या दुर्गम भागात आपले स्वतःचे चांग इ -४ उतरवले होते.

चंद्रयानसाठी 17 ऑगस्ट खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी चंद्रयान – ३ चे प्रॉपुलशन मॉडेल लँडरपासून वेगळा करेल आणि २३ ऑगस्ट रोजी लँडिंग होईल. चंद्रयान – ३ मध्ये लँडर , रोव्हर आणि प्रॉपुलशन मॉडेल आहे. लँडर व रोव्हर बरोबर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील आणि १४ दिवस प्रयोग करतील. प्रॉपुलशन मॉडेल चंद्राच्या कक्षेत राहून येणारे किरणोत्साराचा अभ्यास करेल. लँडर व रोव्हर चंद्रावर पाण्याचा शोध सुद्धा घेणार आहेत.

लँडिंग चा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लँडिंगचा वेग ३० किमी उंचीवरून अंतिम लँडिंग पर्यंत आणण्याची प्रक्रिया आणि यान आडव्या स्थितीतून उभ्या स्थितीत नेण्याची प्रक्रिया आहे, यातच या यानाची क्षमता सिद्ध करायची आहे. रशियाने ४७ वर्षानंतर आपली मोहीम सुरू केली आहे. आत्तापर्यंत सर्व झालेल्या चंद्रामुळे चंद्राच्या विषुववृत्तावर पोहोचलेल्या आहेत. चंद्राच्या मातीचे नमुने घेऊन बर्फाचे अस्तित्व शोधणे, दक्षिण ध्रुवावरील मातीच्या भौतिक गुणधर्माचा अभ्यास ही या मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला चांद्रयान ३ मराठी माहिती , chandrayaan 3 information in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment