माझे वडील निबंध मराठी | my father essay in marathi

भाऊनमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये वडिलांबद्दल निबंध लिहिला आहे. ही माहिती तुम्ही my father essay in marathi , माझे वडील निबंध मराठी मधून , maze baba nibandh in marathi , maze baba essay in marathi , maze baba nibandh , essay on maze baba in marathi, short essay on my father in marathi याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता. मला अपेक्षित आहे की , तुम्हाला तो नक्की आवडेल.

माझे वडील निबंध मराठी मधून | my father essay in marathi

माझ्या बाबांचा जन्म २६ ऑगस्ट १९५७ रोजी रत्नागिरी जिल्यातील चिपळूण या गावी त्यांच्या आजोळी झाला. मी आणि दादा त्यांना पप्पा म्हणून हाक मारतो. ते फार काही शिकले नाहीत, पण ते कुशल कारागीर आहेत. ते फार मेहनती आहेत. त्यांचं ५ इयत्ते पर्यंतच बालपण खेडेगावात गेले. त्यामुळे गावातील त्याने मित्र आजही त्यांना फोन करून विचारपूस करतात.

आमचे कुटूंब आणि बाबा ( my family and my father)

माझे बाबा हे आमच्या आजोबांचे दुसरे अपत्य आहेत.
माझ्या बाबांना एक लहान बहीण आहे. त्या आतेला आम्ही माई आत्या म्हणतो. तसेच मोठे भाऊ आहेत. त्यांना आम्हीं आप्पा म्हणातो. माझ्या बाबांचे टोपण नाव अण्णा आहे. सर्व त्यांना याच नावाने हाक मारतात. माझे बाबा त्यांच्या भावंडांमध्ये कमी शिकलेले असले तरी त्यांच्या अंगी असलेले गुण वाखाणण्याजोगे आहेत. आम्ही बाबांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतो.

उभ्या आयुष्यामध्ये आईला कधी उलटे बोलले नाहीत, तिच्याशी भांडले नाहीत किंवा तिच्यावर हात उचलला नाही. स्त्रियांचा मान राखणे हे त्यांचे परम कर्तव्य होते. संसाराचा गाडा हाकण्यामध्ये आईची मदत त्यांना होत होती यावर त्यांचे लक्ष होते. त्यांचे आजीवर सुध्दा जीवापाड प्रेम होते तसेच आजोबांच्या छत्रछायेखाली त्यांना सुरक्षित वाटे.

आम्हीं लहान असताना आम्ही कुठे चुकलो तर पप्पा आम्हाला खूप मारायचे. त्यांच्या मागे त्यांचा हेतू कधीच वाईट नव्हता. ओरडल्यांनंतर ते आम्हाला स्वतःहून जवळ करायचे. ते बाहेरून जरी कठोर असले तरी आतून रसाळ आहेत. त्यांना आम्हाला शिस्त लावायची होती.

त्यांना शहरातील गोंगाटापेक्षा गावांमधील शांतता आवडते. म्हणूनच दसरा, दिवाळी, होळी, गणेशचतुर्थी या सारख्या सणांना तसेच लग्न समारंभासाठी गावी जाण्यास ते नेहमी उत्सुक असतात.

बाबांचे गावातील जीवन ( life of father at village )

बाबा सांगत होते, लहान असताना जेव्हा ते गावी होते तेव्हा खूप मज्जा करायचे. गावाच्या मंदिरामध्ये ते भजन म्हणायचे. गुरांना घेऊन माळ रानात चरायला घेऊन जात असे. तसेच गायी म्हशींना धुण्यासाठी नदीवर घेऊन जात असे. त्यांना अभ्यासात इतका पण रस नव्हता. कारण लहान असताना त्यांना मार्गदर्शन करणारे असे कोणीच नव्हते. पण आता त्यांना शिक्षणाचे खरे महत्व कळाले आहे.

गावचा विषय निघाला की ते सांगतात, आता पूर्वीसारखी मजा राहिलेली नाही. गावामध्ये अनेक छोट्या कारणामुळे भांडणे होतात. म्हणून ते सध्या गावी जाण्यास उत्सूक जास्त नसतात. या कारणामुळे त्यांना कधीकधी खंत वाटते.

चालताना कधी आपल्याला ठेच लागली तर आपण लगेच ‘आई ग…!” असे म्हणतो. पण आपल्या पूर्ण आयुष्यात आपल्याला अश्या ठेचा लागू नयेत म्हणून बाबा ढाल बनून आपल्या संकटांना तोंड देत असतात. जर आपल्यासमोर कोणतेही मोठे संकट आले किंवा समस्या आली तर आपण “बापरे …!” असा म्हणतो. म्हणजेच  मोठ्या मोठ्या संकटांना तोंड देण्यासाठी बापच लागतो, असे म्हणायला हरकत नाही. जो स्वतः मात्र फाटकी बनियान वापरतो , पण आपल्या मुलांना दर दिवाळीला नवीन कपडे घेतो. जो स्वतःची भूक विसरतो पण आपल्या मुलाला मुलांना  मिठाई आणि चांगला-चुंगलं खायला घालून कशाचीही कमी भासू देत नाही. अश्या अनेक आपण एका कुटूंबातील सदस्य म्हणून आपल्या शेवटच्या श्वासपर्यंत नेहमीच समर्थन दिला पाहिजे.

अनेक कवींनी आई वरती लेख, कविता लिहल्या पण वडीलावर कविता लिहिणारे फार कमी असतात. आमच्या बाबांनी आम्हा दोन्हीं भावंडाना समान वागणूक दिली, कधी दूजाभाव केला नाही. त्यांनी उभ्या आयुष्यात खूप खस्ता खाल्ल्या आहेत. त्यांना मला अभियंता आणि मोठ्या दादा ला डॉक्टर होताना बघायचे आहे. त्यांचे हे स्वप्न आम्हीं एक दिवशी नक्कीच पूर्ण करणार.

माझ्या बाबांची मेहनत ( hardwork of my father)

लग्नानंतर जवळपास १० वर्षे त्यांनी शिवणकाम केले. आमच्या घराजवळ राहणारे सर्वच नागरिक त्यांच्याकडे कपडे शिवण्यासाठी येत असे. त्यानंतर पुढील काही वर्षामध्ये त्यांनी रिक्षा घेतली आणि वयाच्या साठ वर्षापर्यंत त्यांनी रिक्षाच चालवली. ही रिक्षा त्यांनी कर्ज काढून घेतली होती. नंतर त्यांनी ते कर्ज पूर्ण चुकते केले. सकाळी न्याहरी नंतर ते रिक्षा चालवायला जात असे, ते रात्री १०-११ वाजे पर्यंत चालवत असतं.

त्यांनी आजोबांकडे एक रुपया ही कधी मागितला नाही. सर्व त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर उभे केले. आम्हा दोन्ही भावंडाना त्यांनी शिक्षणासाठी कधी कसर सोडली नाही. मला आणि दादाला उच्चशिक्षित करण्यासाठी त्यांच्या आयुष्याची सर्व तुटपुंजी खर्च करायला ते तयार होते.

जरी त्यांचे शिक्षण कमी झाले असले तरीही, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची खूप आवड आहे. आता सुध्दा ते मोबाईल घेऊन यूट्यूब वर अनेक व्हिडिओ बघतात. त्याप्रमाणे प्रात्याशिक करून बघतात. त्यांनी विक्सच्या डबी मध्ये छोटे एलइडी (LED) बसवून रात्रदिवे तयार केले आहेत.

नकोसे झालेले वडील ( fathers ignored by current youth )

माझ्या बाबांना कोणत्याही प्रकारचे व्यसन नाही. त्यांनी आम्हाला बजावून सांगितले होते, तुम्ही कोणतेही व्यसन करताना आढळलात तर तुम्हाला घरातून हाकलून देईन. पण काहींना हेच वडील नकोसे झाले आहेत, का तर त्यांच्या कडे लक्ष द्यायला आताच्या पिढीकडे वेळ नाही. त्यामुळे या कलयुगामध्ये उलटे घडत आहे. मुले आपल्याला वडिलांना वृद्धाश्रमात पाठवत आहेत. ज्या काळात त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवा आहे, अशा वेळी दुर्लक्ष करत आहेत. देव करो त्यांना सुबुद्धी देवो म्हणजे या जगात कोठेही वृद्धाश्रम बनवण्याची गरज भासणार नाही.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला my father essay in marathi , माझे वडील निबंध मराठी मधून , maze baba nibandh in marathi , maze baba essay in marathi , maze baba nibandh , essay on maze baba in marathi, short essay on my father in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

1 thought on “माझे वडील निबंध मराठी | my father essay in marathi”

Leave a Comment