छान छान गोष्टी | Chan Chan goshti

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये छान छान गोष्टी | Chan Chan goshti कथन केल्या आहेत. खालील कथा तुम्ही लहान मुलांना गोष्टी सांगण्यासाठी वापरू शकता. या पूर्ण वाचा आणि आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. 

छान छान गोष्टी | Chan Chan goshti

मुंगी व कोशातला किडा

एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता. ते पाहून मुंगी म्हणाली, ‘ अंररे, काय ही तुझी स्थिती ? मला वाटेल तिकडे फिरता येतं. पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे असं म्हटले पाहिजे.’ यावर किडा काहीच बोलला नाही. पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुनः तेथे गेली असता त्या किडयाचे फक्त कवच मात्र तेथे पडले असून तो किडा कोठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसते. ती इकडे तिकडे फिरत आहे तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी तिला वारा घालत असताना तिला दिसला. तो तिला म्हणाला, ‘अग, त्या दिवशी बंदिवान म्हणून तू माझी कीव करीत होतीस, माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती बरी असं म्हणत होतीस, तोच कोशातला किडा मी आहे हे लक्षात घे. आपल्याला वाटेल तिकडे फिरता येतं अशी बढाई मारायची असेल तर खुशाल मार. तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो. ‘ इतके बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला.

तात्पर्य : संकटात असलेला माणूस पुनः कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने नाही असे त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बढाई मारणे हा मूर्खपणा होय.

खूप मित्र असलेला ससा

अरण्यात सर्व प्राण्यांची ओळख असलेला एक ससा होता. त्याला आपले मित्र खूप आहेत, याबद्दल आनंद वाटत असे. एकदा सकाळी एका शिकाऱ्याने त्याचा पाठलाग केला असता त्याने आपल्याकडून होईल तितकी घडपड केली व काही युक्त्या केल्या तरी त्याचा काही उपयोग झाला नाही. तेव्हा त्याने घोड्याला आपल्या पाठीवर बसवून घेण्यासाठी विनंती केली व त्याला सांगितले. ‘तूं जर मला पाठीवर घेतलेस तर त्याला माझा तपास लागणार नाही. घोड्याने उत्तर दिले, तूं संकटात आहेस हे पाहून मला फार वाईट वाटतं, पण तुझे इतर मित्र जवळच आहेत ते तुला नक्कीच मदत करतील.’ ससा पुढे बैलाकडे गेला. तेव्हा बैल म्हणाला, “मी मोठ्या आनंदाने मदत केली असती पण मला अगदी जरुरीचं काम आहे, मला ते केलं पाहिजे, मी पुन्हा कधीतरी तुला मदत करीन.’ पुढे ससा बोकडाकडे गेला तेव्हा बोकड म्हणाला, ‘ मला बरं वाटत नाही. माझ्या पाठीवर बसल्पाने तुला इजा होईल.’ मग तो मेंढीकडे गेला तेव्हा ती म्हणाली, ‘माझा काय उपयोग ? मी फार हळू चालते, शिवाय शिकारी कुत्र्याची भीती मला सुद्धा वाटते.’ शेवटी निराश होऊन सश्याने एका वासराला विचारले, तेव्हा वासरू म्हणाले, ‘जे काम माझ्यापेक्षा अनुभवी व शक्तीशाली मंडळींनी सोडून दिलं ते माझ्यासारख्या तरुण व अनुभवशून्य मुलाने कसं हाती घ्यावं…? 

मी तुला पाठीवरून नेलं तर बाकीच्यांना राग येईल. माझं तुझ्याविषपीचं प्रेम तुला माहीत आहेच, पण नाईलाजास्तव उत्तम मित्रांना सुद्धा एकमेकांपासून दूर राहावं लागतं. ते पहा, शिकारी कुत्रे आलेच ? तो दुर्दैवी ससा लवकरच पकडला गेला व प्राणास मुकला.

लांडगा आणि करडू

कुंपण घातलेल्या एका कुरणात एक मेंढ्यांचा कळप चरत होता. घनगर एका झाडाखाली वाजवत बसला होता व त्याचे कुत्रे झोपी गेले होते. अशा वेळी भूकेने अर्धमेला झालेला एक लांडगा कुंपणाच्या फटीतून आत डोकावतो आहे असे एका करडाने पाहिले. तेव्हा ते त्याला म्हणाले, ‘अरे, तू येथे काय करतो आहेस ?’ लांडगा म्हणाला, थोडसं कोवळं गवत यथेच्छ खाऊन वर झऱ्याचा स्वच्छ पाणी पिणं यासारखं उत्तम भक्ष्य व पेय नाही. हे दोनही पदार्थ तुला नेहमी मिळतात. तुझं भाग्यच मोठं ! ज्या पदार्थासाठी मी इतकी धडपड करतो ते तुला आयते मिळालेले पाहून मला मोठा आनंद होतो. कारण आपल्या नशिबी नाहीतरी निदान दुसऱ्याचे सुख पाहून तरी आनंद मानावा असे सत्पुरुषांचे वचन आहे.’

हे पांडित्य पाहून करडू म्हणाले, ‘नुसतं थोडसं गवत व पाणी यांच्यावर तू आपला निवाई| करीत असता तू मांसभक्षक आहेस असा गवगवा लोकांनी करावा हे चांगलं नाही. यापुढे आपण दोघेही भावासारखे वागू व एकाच ठिकाणी चरत आनंदानं राहू !” इतके बोलून ते मूर्ख व अनुभव नसलेले करडू कुंपणाच्या फटीतून बाहेर आले व लगेचच त्या दुष्ट लांडग्याच्या भक्ष्यस्थानी पडले.

तात्पर्य : लबाडी व ढोंगीपणा याबद्दल ज्याची प्रसिद्धी आहे, अशा माणसाच्या बोलण्यास भुलून त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे आपला जीव धोक्यात घालणे होय.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला छान छान गोष्टी | Chan Chan goshti हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या या लेखाबद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment