लहान मुलांच्या मराठी गोष्टी | student small story in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये मराठी गोष्टी , student small story in marathi या विषयी माहिती दिली आहे. 

लहान मुलांच्या मराठी गोष्टी | student small story in marathi

रान डुक्कर आणि गाढव

एके दिवशी एक रानडुक्कर आणि एक गाढव यांचे चांगलेच भांडण जुंपले. रानडुक्कराला वाटले, आपल्याला सुळे आहेत, शिवाय आपले डोके गाढवापेक्षा मोठे आहे. आपण त्याला सहज मारू शकू. म्हणून तो गाढवाच्या अंगावर चालून गेला. डुकराच्या तीक्ष्ण सुळ्यापुढे आपण टिकणार नाही हे ओळखून गाढवाने त्याचाकडे पाठ केली आणि त्याला जोरजोरात लाथा मारायला सुरुवात केली.

डुकराची अगदी गाळण उडाली तेव्हा तो गाढवाला म्हणाला, अरे हे काही योग्य नाही. समोरासमोर टक्कर द्यायची सोडून तू लाथा मारशील असं मला वाटलं ही नाही.

तात्पर्य : स्वतःच्या शक्तीवर अधिक विश्वास ठेवू नये.

गोठ्यातील सांबार 

एका सांबराला पारध्याच्या कुत्र्यांनी झाडीतून हुसकावले तेव्हा ते पळत पळत एका खेड्यातील गुरांच्या गोठ्यात शिरले व कडब्याच्या गंजीत लपून राहिले. तेव्हा गोठ्यातील एक बैल त्याला म्हणाला, अरे, तू येथे येऊन काय करायचं ठरविलं आहेस ? तू ज्या मरणाला भिऊन इथे लपतो आहेस, ते मरण इथेच तुला फार लवकर येईल.’ त्यावर सांबर त्याला म्हणाले, ‘मित्रा, जर तुम्हीसर्व कृपा करून गप्प रहाल तर माझा निभाव लागेल, संधी साधून मी लवकरच इथून बाहेर पडेन.’

संध्याकाळपर्यंत ते सांबर तेथेच राहिले. संध्याकाळ होताच प्रथम कडब्याच्या पेंढ्या घेऊन गुराखी गोठ्यात आला. त्याच्या दृष्टीस ते पडले नाही. त्यानंतर वाड्यातील कारभारी आला. त्याचेही लक्ष त्याकडे गेले नाही.

आपल्याकडे कोणाचेही लक्ष नाही या गोष्टीचा सांबराला फार आनंद झाला. ते बैलास म्हणू लागले, ” मित्रा, आज मी वाचलो, तो तुमच्यामुळेच. तुमच्याइतके परोपकारी कोणीही नसेल.” हे ऐकून त्यातील एक बैल त्याला म्हणाला, आता तू येथे न थांबता आपल्या घरी निघून जावंस हे बरं ! देव करो अन् तू आहेस तोवर या वाड्याचा मालक येऊ नये, कारण त्याच्या तक्ष्णि दृष्टीपुढे तुला या गंजीआड लपता येणार नाही.”

असे बोलत असतानाच त्या वाड्याचा मालक तेथे आला व नोकरांवर ओरडाओरडा करीत रागारागाने इकडे तिकडे फिरू लागला. तोच त्याला गंजीआड लपलेले सांबर दिसले. ते पाहताच तो ओरडू लागला, ‘ सांबर…! सांबर…! धावा रे, धावा…! ‘

मालकाणे ओरडचे ऐकून चार नोकर काठ्या घेऊन धावत आले व त्या सांबरास त्यांनी ठार मारले.

तात्पर्य : ज्या ठिकाणी भीती आहे, त्या ठिकाणी दैवयोगाने एक दोन वेळा बचाव झाला असता, तसा कायम होईल असे समजू नये.

मधमाशी व साधी माशी

एका मधमाशीने एक साधी माशी आपल्या पोळ्याजवळ आनंदाने उडत असताना पाहून तिला रागाने विचारले,

“तू इथे काय करतेस ?
हवेतल्या राण्यांच्या संगतीत आंगतुकासारखे शिरणे तुझ्या सारखीला योग्य आहे का ? “

यावर साधी माशी म्हणाली,
“खरोखरच तुला राग यायला मोठे कारण घडले यात संशय नाही, तुझ्यासारख्या भांडखोर प्राण्याशी संबंध ठेवणारे वेडे असले पाहिजेत, असं मला खात्रीनं वाटतं.”

रागानं संतापलेल्या मधमाशीने विचारले, “असं कां ? हे मला सांग बरं…! आमचे कायदे उत्तम असून आमचे राज्य जगात सर्वोकृष्ट धोरणावर चाललेलं आहे. आम्ही अत्यंत वा फुलांवर आमची उपजीविका करून मध तयार करण्याचं काम करतो, तो मध अमृतासारखा गोड असतो. त्पाउलट तू नेहमी कुजलेल्या पदार्थावर आपली उपजीविका करतेस.”

माशी म्हणाली, “आम्हाला जसं राहाता येतं तसं आम्ही राहतो, मला वाटतं की गरिबी हा काही दोष नाही, पण राग हा खात्रीने दोष आहे. तुम्ही तयार केलेला मध गोड असतो हे मला मान्य आहे, पण तुमचं अंतःकरण मात्र द्वेषानं पूर्ण कडवटलेले आहे, कारण, शत्रुवर सूड उगविण्याच्या भरात तुम्ही तुमचा स्वतःचाही नाश करून घेता व रागात तुम्ही इतका अविचारीपणा करता की शत्रूपेक्षा तुम्ही आपलं स्वतःचंच अधिक नुकसान करून घेता.

बुद्धी कमी असलेली एक वेळ परवडेल, पण तिचा आपल्याला जास्त शहाणपणाने उपयोग करता आला पाहिजे, हे लक्षात ठेवाल तर बरं होईल.”

तात्पर्य : उत्तम गुणाचा वाईट उपयोग करणारे लोक आहेत.

कोल्हा आणि लांडगा

एक कोल्हा एकदा एका लांडग्याला म्हणाला, “मित्रा माझी स्थिती किती वाईट आहे याची तुला कल्पना नाही. एखादा म्हातारा कोंबडा किंवा मरायला टेकलेली अशक्त कोंबडी यांच्या मांसावर मला निर्वाह करावा लागतो. त्यामुळे मी अगदी कंटाळल्यासारखा झालो आहे. शिवाय भक्ष्य मिळवताना आपला जीव धोक्यात घालण्याचा प्रसंग तुला क्वचितच येत असेल. मला भक्ष्याच्या शोधासाठी गावठाणात लपतछपत फिरावं लागतं.

तुझं तसं नाही. तू आपलं भक्ष्य रानात; कुरणात मिळवू शकतोस. ही तुझी विद्या मला शिकवशील तर बरं होईल. तुझ्या हाताखाली शिक्षणासाठी राहिल्याने कोल्ह्याच्या वंशात जन्म घेऊन पहिल्याने मेंढी मारून खाण्याचा मान मला मिळेल, अशी माझी अपेक्षा आहे. तू मला शिकवलंस तर आपले श्रम फुकट गेले असं म्हणायची वेळ तुझ्यावर नकीच येणार नाही.”

लांडगा म्हणाला, ‘ठीक आहे, मी प्रयत्न करून पाहतो. प्रथम तू पलिकडच्या शेतात माझा भाऊ मरून पडला आहे त्याच कातडं पांघरून ये.’

तसं करताच लांडग्याने त्याला निरनिराळे धडे शिकवले. गुरगुरणे, चावणे, लढाई करणे, मेंढ्याच्या कळपावर तुटून पडणे, एखादी मेंढी उचलून नेणे या गोष्टीचे शिक्षण कोल्ह्याला दिले. सुरुवातीला हे सगळे कोल्ह्याला लवकर जमेना. पण तो मुळातच हुषार असल्याने ते सगळे तो लवकरच व्यवस्थित करू लागला.

त्याची हुशारी पाहून लांडग्याला आश्चर्य वाटले, शेवटी एक मोठा मेंढ्याचा कळप कोल्ह्याला दिसताच त्याच्यावर तुटून पडून एका क्षणात त्याने मेंढ्या, धनगर व त्याचे कुत्रे यांची अगदी दाणादाण उडवून दिली. त्याने एक मोठी मेंढी आपल्या तोंडात धरली व तिला मारणार तोच शेजारच्या शेतातून कोंबड्याचा आवाज ऐकू आला. तो ओळखीचा आवाज ऐकताच आपल्या नव्या वेषाचे त्याला भान राहिले नाही व त्याने ते लांडग्याने कातडे फेकून दिले व गुरुचा निरोपही न घेता तो तडक त्या कोंबड्याकडे धावला.

तात्पर्य : मूळचा स्वभाव कितीही शिक्षण झाले तरी जात नाही.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला मराठी गोष्टी , student small story in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment