मराठी गोष्टी | Goshti marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये मराठी गोष्टी | Goshti marathi या विषयी माहिती दिली आहे. 

मराठी गोष्टी | Goshti marathi

कोल्हा, लांडगा व घोडा

एका कोल्याने शेतात चरत असलेला घोडा पहिल्यांदाच पाहिला. मग तो एका लांडग्याजवळ जाऊन त्या घोड्याचे वर्णन करून त्याला म्हणाला; लांडगोबा, हे भक्ष्य सुदैवाने आपल्यापुढे आलं आहे. आपण जाऊन तो प्राणी प्रत्यक्ष काय आहे ते पाहू.’ नंतर ते दोघेही त्या घोड्याजवळ आले.

घोड्याने एकदोन वेळा मान वर करून पाहिले पण असल्या संशयी चेहऱ्याने पाहणाऱ्या प्राण्याशी आपण बोलावे असे त्यास वाटले नाही, म्हणून तो खाली बघत चरू लागला. मग कोल्हा आपणहून त्यास म्हणाला, ‘सद्गृहस्था ! तुझे मित्र तुला कोणत्या नावानी ओळखतात, ते समजून घेण्याची या सेवकाची इच्छा आहे.

घोड्याचा स्वभाव थोडासा विनोदी होता. कोल्ह्याचा वरील प्रश्न ऐकून घोडा म्हणाला, गृहस्यहो, माझं नाव माझ्या मागल्या पायाच्या खुरांवर कोरलं आहे ते तुम्ही बाचून पहा आणजे झालं. या उत्तरामुळे कोल्ह्याला संशय आला व तो विचार करून म्हणाला, ‘मी तुमचे नाव नक्की वाचले असते, पण काय करू घरच्या गरीबीमुळे मी काही शिकू शकलो नाही.

त्यामुळे मी अक्षरशत्रू आहे. परंतु माझा हा मित्र फार मोठ्या घराण्यात जन्माला आला असून तो सुशिक्षित आहे. त्याला बऱ्याच विद्या अवगत आहेत.

तेव्हा तुझ्या नावाची अक्षरे तो वाचून दाखविल.’ ही आपली स्तुती ऐकून लांडगा खूष झाला व आपली विद्वत्ता लगेचच प्रकट करावी म्हणून तो घोड्याच्या पायाजवळ गेला. घोड्यानेही पाय शेपटाकडून वर उचलून त्याला उत्तेजन दिले. लांडगा आपल्या पायाच्या टप्प्यांत आलेला पाहताच घोड्याने त्याला सर्व अंगाला जोराने लाथ मारली. त्या तडाख्याने तो लांडगा गडबडत दूर जाऊन पडला व त्याच्या नाकातोंडातून डोक्याशी रक्त वाहू लागले.

हे पाहून लबाड कोल्हा त्याला म्हणाला, ‘ लांडगे दादा या प्राण्याच्या नावाची चौकशी करण्याचे तुला आता काही प्रयोजन नाही. कारण तुझ्या तोंडावर ते नाव आता अगदी कायमचे उमटल्यासारखेच आहे !

तात्पर्य : स्वतःच्या घमंडखोरपणामुळे जो माणूस संकटात सापडतो, त्याने दुसऱ्याच्या सहानुभूतीची अपेक्षा करण्यात अर्थ नाही.

माळी व त्याचा मालक

एक गरीब गावठी माणूस घराच्या बाहेर एक झोपडी भाड्याने घेऊन तेथे राहत होता.

झोपडीसमोरच्या जमिनीत त्याने थोडीशी फळझाडे व भाजीपाला लावला होता. त्या जागेपासून थोड्या अंतरावर एक ससा राहात होता. तो त्या भाजीपाल्याची फार नासाडी करीत असे. त्या त्रासास कंटाळून तो माणूस शहरात आपल्या मालकाकडे गेला व त्याला सर्व हकीगत सांगितली. तो म्हणाला, ‘मालक, तो ससा कशाचीही पर्वा करीत नाही.

त्याच्या अंगी काही विलक्षण जादू आहे, मी दगड, काठ्या त्याच्याकडे फेकून मारल्या तरी तो मार चुकवून खुशाल निघून जातो.’ त्यावर मालक उत्तरला, ‘ठीक आहे. तू काही काळजी करू नकोस. माझे शिकारी कुत्रे त्या सशांना एका क्षणात मारतील. मी उद्या तिकडे येऊन या गोष्टीचा बंदोबस्त करतो.’

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो गृहस्थ आपल्या शिकारी कुत्र्यास घेऊन आपल्या मित्रासह ज्योड्यावर बसून त्या ठिकाणी गेला. शिकारीचे शिंग फुंकून व कुत्रे मोकळे सोडून सगळे रान उठविण्याचा त्याने नोकरास हुकूम दिला. तो सगळा आरडाओरडा ऐकून ससा आपल्या बिळातून बाहेर पडला व जीव वाचविण्यासाठी सगळे भाजीपाल्याचे वाफे तुडवीत पळ सुटला. त्यामागून शिकारी कुत्रे पळू लागले व त्यांच्या पाठोपाठ नोकरही धावत सुटले.

सर्वांच्या मागून तो मालक व त्याचे मित्र आपापले घोडे उडवीत निघाले. त्या सर्वांनी मिळून मळपातील फळझाडांची व भाजीपाल्पाची इतकी नासाडी केली की, घटकेत तो मळा अगदी उजाड दिसू लागला. ते पाहून तो गावठी माणूम मनाशीच म्हणाला, ‘माझ्या सारखा मूर्ख मीच. क्षुल्लक गोष्टीसाठी मोठ्यांची मदत मागण्याची बुद्धी मला कुठून सुचली कोण जाणे, या मालकाच्या कारभारामुळे एका तासात माझं जितकं नुकसान झालं तितकं नुकसान वर्षभरात या मागातील सगळ्या सश्याकडूनसुद्धा झालं नसतं.

तात्पर्य : काही वेळा रोगापेक्षा त्यावर केलेला उपायच फार अपायकारक असतो.

वाघ आणि चिचुंद्री

अरण्यातील एका मोठ्या झाडाच्या दाट सावलीत एक वाघ आपल्या पक्षाची वाट पाहत बसला होता. जवळच एका बिळातून आपले अर्धे अंग बाहेर काढून एक चिचुंद्री त्याच्याकडे पाहात होती. ती दिसताच वाघ तिला म्हणाला, ‘अरे गरीब प्राण्या, मला तुझी फार दया येते.

जो सूर्यप्रकाश जगातील इतर प्राण्यांना अत्यंत सुखकारक असतो, तो तुला सहन होऊ नये अशी योजना करण्यात देवाने मोठा निर्दयपणा दाखविला आहे असं मला वाटतं. तुझ्यासारखे प्राणी म्हणजे अर्धवट मेलेलेच प्राणी होत. तुम्हाला मारून टाकून या दुःखदायक स्थितीतून जर सुटका केली तर त्याचे तुमच्यावर उपकारच होतील. ‘ त्यावर चिचुंद्री ने उत्तर दिले, ‘अरे वाघोबा, माझ्या स्थितीसंबंधाने तू इतकी कळकळ 

दाखविलीस याबद्दल मी तुझे आभार मानते. पण खरंच सांगायचं तर माझ्या त्या परिस्थितीतही मला सर्व सुख मिळतं. ईश्वराच्या निर्दयपणाचे तू जे उद्गार काढले त्यासंबंधी मला इतकंच सांगायचं आहे की, ईश्वराने मला जे गुण दिले त्यावर मी अगदी समाधानी आहे. कोणत्या गुणांची वाटणी कशी करावी हे समजून घेण्याच्या कामी ईश्वराला साहाय्य करण्याची आवश्यकता नाही.

आता हे खरं की, तुझ्यासारखी तीक्ष्ण दृष्टी मला नाही. परंतु दृष्टीचं सगळं काम करण्यासाठी माझे हे लहानसे कान पूर्णपणे समर्थ आहेत आणि या गोष्टीचा अनुभव तुला मी आताच दाखविते. एक, तुझ्या मागल्या बाजूने येत असलेला कसला तरी भयंकर आवाज मला या वेळी अगदी स्पष्ट ऐकू येतो आहे.’ इतके बोलून चिचुंद्री आपल्या बिळात गेली व एका शिकाऱ्याने सोडलेल्या बंदुकीची गोळी छातीत शिरून तो वाघ तेथेच ठार झाला.

तात्पर्य : दुसऱ्याचे नसते दोष दाखवून त्याची काळजी करीत बसण्यापेक्षा, स्वतःच्या दोषामुळे प्राप्त होणाऱ्या संकटांविषयी सावधानता ठेवणे शहाणपणाचे गेय.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला मराठी गोष्टी | Goshti marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment