लहान-लहान गोष्टी मराठी मध्ये | small story in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये लहान-लहान गोष्टी मराठी मध्ये | small story in marathi या विषयी माहिती दिली आहे. 

लहान-लहान गोष्टी मराठी मध्ये | small story in marathi

शेपूट नसलेला कोल्हा

एका कोल्ह्याचे शेपूट लोखंडी सापळ्यात सापडले असता ते तोइन तो पळाला. प्रथम त्याला आनंद झाला की प्राणावरचे शेपटीवर निभावले. पण जेव्हा तो आपल्या मंडळीत जाऊ लागला ना त्याला आपल्या लांडेपणाचे फार वाईट वाटून तो मनात म्हणाला, ‘मी मेलो असतो तर बरं झालं असतं. पण ही अप्रतिष्ठा वाईट, पण जे झाले त्याला उपाय नाही. आता हेच कसं शोभवून नेलं म्हणजे झालं…! 

यासाठी काय बरं युक्ती करावी ?

याचा तो विचार करीत असता त्याला एक युक्ती सुचली तो अशी की आपण सर्व कोल्हे मंडळींना एकत्र जमवून सांगावे की, “माझी शेपटी मी तोडून टाकून ही भूषणाची नवी पद्धत काढली आहे. ही चांगली आहे अन् तसं तुम्हीसुद्धा अवश्य करावं.” मग त्याने सगळ्या कोल्ह्यांना आपल्या घरी बोलावले व आपल्या युक्तीप्रमाणे त्यांच्यापुढे भाषण दिले.

तो म्हणाला, “अहो, या शेपटीपासून काहीच फायदा नाही. आपल्याला शेपटी म्हणजे ओझंच. शेपटी तोडून टाकल्पानं एक प्रकारचं सौंदर्य येऊन शिवाय पळण्यातली अडचण दूर होते. मी ह्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे नि शेपटी तोडल्यापासून सुखी आहे. ते सुख तुम्हालाही प्राप्त व्हावं असं मला वाटलं.”

इतके बोलून आपने कितीजण ऐकतात हे पाहण्यासाठी तो सगळांकडे पाहू लागला. इतक्यात एक म्हातारा कोल्हा त्याचे लबाडी ओळखून मान चाकडी करून म्हणाला, “अहो, पंडित महाराज, आपली हुशारी पुरे शेपटी काढल्यामुळे तुमचं कल्याण झालं असेल, यात शंका नाही. अन् आमच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्हीही आपली शेपटी कापून टाकू. तोपर्यंत तुम्ही आम्हाला आग्रह करू नये हेच बरं.”

तात्पर्य : आपली अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आपले दोप हे नसून गुण आहेत असे बरेचजय सांगतात पण शहाणे लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत.

उंदीर , कोंबडा आणि मांजर

एका उंदराचे पिलू प्रथमच बिळातून बाहेर पडले होते, ते थोडा वेळ इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर

आईला म्हणाले, “आई, या लहानशा जागेतून मी जरा मोकळ्या जागेत आज जाऊन आलो तर किती मजा पाहिली, रस्त्याच्या बाजूने फिरत असता मी दोन प्राणी पाहिले. एक प्राणी गडबड्या स्वभावाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा होता. तो जेव्हा जेव्हा मान हलवी तेव्हा तेव्हा त्याचा तुराही हालत असे. मी त्याची मजा पाहात होतो तोच त्याने आपले दोनही हात हालविले व मोठ्याने ओरडला. दुसरा प्राणी मात्र शांत व सभ्य होता. त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो देखणा होता व त्याच्या वागण्यामुळे त्याच्याशी मैत्री व्हावी असे मला वाटले. हे ऐकून उंदरी त्याला म्हणाली, ‘वेड्या पोरा ! तुला काहीच अक्कल नाही. नुसत्या दिसण्यावर जाशील तर फसशील, हे लक्षात घे. तू जो प्राणी प्रथम पाहिला व ज्याच्या आवाजाची तुला भिती वाटली तो बिचारा कोंबडा निरुपद्रवी असून एखादेवेळी त्याच्या मांसाचा थोडासा तरी भाग आपल्याला मिळण्याची शक्यता असते, पण रेशमासारख्या मऊ अंगाचा जो दुसरा प्राणी तू पाहिलास ते दुष्ट, लबाड आणि क्रूर असे मांजर असून उंदराच्या मांसाशिवाय त्याला दुसरा पदार्थ फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव. 

तात्पर्य : बाह्य देखावा व सौन्दर्य याच्यावरून कोणाच्या अंतरंगाची परीक्षा करता येत नाही.

समुद्र आणि नद्या

एक पंडीत मोठा गर्विष्ठ होता. तो आपल्या विद्यार्थ्यांना एकदा तत्वज्ञान शिकवत असता एका विद्यार्थ्याने त्याला सहजपणे विचारले, “गुरुजी, अगस्ति ऋषींनी समुद्र प्राशन केला असे पुराणात सांगितले आहे, तर ही गोष्ट शक्य आहे का ? पंडिताने मोठ्या आध्यातेने उत्तर दिले, ‘शक्य आहे, इतकेच नव्हे मी सुद्धा स्वतः तुला समुद्र पिऊन दाखवतो. जर असे झाले नाही तर मी तुला एक हजार मोहरा देईन.”

पैज ठरविल्यानंतर काही वेळाने पंडित शुद्धीवर आला व भलत्याच गोष्टीविषयी पैज लावल्याबद्दल त्याला फार पश्चात्ताप झाला.

मग तो कलिदासाकडे गेला व पैंजेची गोष्ट त्याला सांगून म्हणाला, ” ह्या एवढ्या संकटातून मला सोडवाल तर मी तुमचा फार आभारी होईन.”

पंडिताच्या मूर्खपणाची कालीदासाला दया येऊन त्याने त्याला मदत करण्याचे कबूल केले. दुसऱ्या दिवशी तो विद्यार्थी, पंडित, कालीदास व गावातले बरेच लोक समुद्रावर गेले. कालीदासाच्या सांगण्याप्रमाणे पंडिताने खूप तांबे बरोबर आणले होते. ते पाहून पंडिताच्या मूर्खपणाचे लोकांना आश्चर्य वाटले. तो काय करतो याची मोठ्या उत्कंठेने वाट पाहू लागले. काय करायचे ते कालीदासाने आधीन सांगितले होते.

त्याप्रमाणे, ज्या विद्यार्थ्याबरोबर पैज लावली होती त्याच्याकडे पाहून तो म्हणाला, ” अरे, ठरल्याप्रमाणे समुद्राचं सगळं पाणी पिऊन टाकण्यात मी तयार आहे, पण ज्या नद्या समुद्राला येऊन मिळाल्या आहेत, त्यांचं पाणी बंद करण्याची तुझी तयारी आहे का ? नुसतं समुद्रातलं पाणी पिण्याचं मला कबूल आहे. त्यात जे नद्यांचं पाणी येत असतं ते पिण्याचं मी कबूल केलं नाही, हे तुला माहीत आहेच.”

हे बोलणे ऐकून तो विद्यार्थीी काहीच बोलू शकला नाही व पंडिताच्या हुशारीबद्दल सगळ्या लोकांनी त्यांचे फार कौतुक केले.

तात्पर्य : समयसूचकता हा गुण वेळ आल्यास संकटातून मुक्तता करायला मदत करतो.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला लहान-लहान गोष्टी मराठी मध्ये | small story in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment