नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये लहान-लहान गोष्टी मराठी मध्ये | small story in marathi with moral या विषयी माहिती दिली आहे.
लहान-लहान गोष्टी मराठी मध्ये | small story in marathi with moral
दोन कुत्र्या
एका कुत्रीस काही दिवसातच पिले होणार होती म्हणून तिने दुसऱ्या कुत्रीस विनंती केली की, बाई एक महिनाभर तुमचं घर मला राहायला द्या. माझं बाळंतपण झालं म्हणजे मी तुमचं घर तुमच्या स्वाधीन करीन.
दुसऱ्या कुत्रीने ‘ठीक आहे’ म्हणून पहिल्या कुत्रीच्या विनंतीस मान दिला व घर रिकामे करून दिले.
एक महिना झाल्यावर घरमालकीण कुत्री त्या बाळंतीण झालेल्या कुत्रीस भेटण्यास गली आणि अगदी मर्यादेने म्हणाली, ‘बाई तुमचं सर्व बाळंतपण सुखरूपपणे पार पडलं हे पाहून मला आनंद होत आहे. तुम्ही आता घराबाहेर पडून आपल्या पिलांसह बाहेर हिंडूफिरू लागलात म्हणजे मला फार समाधान वाटेल.’ ह्या भाषणातील अर्थ समजून पहिली कुत्री म्हणाली, ‘खरंच बाई, मलाही मोठी लाज वाटते. तुमची जागा मी फारच दिवस अडवून ठेवली आहे. त्यामुळे तुम्हाला फार त्रास होत असेल. पण काय करणार ? माझी पिल्ले फारच लहान, अशक्त आहेत. ती अजून चालू शकत नाहीत. तेव्हा अजून थोडे उपकार माझ्यावर करा व पंधरा दिवस मला येथे राहू द्या.’
घरमालकीण मोठी भिडस्त होती त्यामुळे तिने अजून पंधरा दिवसांची मुदत दिली. ही मुदत संपली तरी कुत्री घराबाहेर पडण्यास तयार होईना.
तेव्हा घरमालकीण कुत्री तेथे येऊन तिला म्हणाली, ‘अग, तू अजून घराबाहेर पडत नाहीस. अशाने मला तुला बळजबरीनं बाहेर काढावं लागेल. असं काही व्हावं अशी तुझी इच्छा आहे का ?” वर पहिली कुत्री तिला म्हणाली, ‘अस्स काय ? ठीक आहे ! मग तू मला कशी घराबाहेर काढतेस मी पाहते. तू बळजबरीने काढशील तेव्हाच मी येथून हालेन.’
तात्पर्य : आपली एखादी गोष्ट दुसन्यास देण्यापूर्वी ती त्याकडून परत मिळेल किंवा नाही याची पूर्ण चौकशी करावी.
खेडयातला उंदीर व शहराला उंदीर
एक साधा भोळा खेडचावला उंदीर होता. स्पाच्याकडे एक भष्टपष्ट व गोजिरवाणा असा शहरावला उंदीर आला. खेडयातल्या उंदराने आपल्या पाहुण्याचा चांगला आदरसत्कार केला. आपल्या घरातले काही पदार्थ, जवळच्या शेतातील कोवळी कणसे, वाटाण्याच्या शेंगा व माकरीचे तुकडे त्याला दिले.
पण खेडयातले हे अन त्या शहरातल्या उंदराला आवडले नाही. मग तो त्या खडघातल्या उंदराला म्हणाला, ‘अरे, तुला जर राग येणार नसेल तर मी थोडं मनमोकळेपणाने बोलतो, अरे अशा ह्या कंटाळवाण्या जागेत तू राहतोस कसा ? हे रान, आसपास गवत, झाडं, डोंगर नि पाण्याचे आहेत यांशिवाय दुसरं काही नाही. इथल्या पक्ष्यांच्या किलबिलाटापेक्षा माणसाचा आवाज बरा नाही का? ओसाड रानापेक्षा राजधानी बरी म्हणायची. विचार कर आणि ही जागा सोडून माझ्याबरोबर तुलाच सुख मिळेल.’
हे सगळे वर्णन ऐकून त्या खेडयातल्या उंदराला मोह झाला व दोघे सकाळी खेडपातून निघून रात्री शहरात पोहचले. थोडे पुढे गेले तर तेथे त्यांना एक मोठा वाडा दिसला. आदल्या दिवशीच तेथे लग्नसमारंभ झाला होता. त्या वाड्याच्या आत जाऊन ते पाक घरात शिरले. तेथे नाना प्रकारचे पदार्थ होते. पण माणसे कोणी नव्हती. ते पाहून त्या
खेड्यातल्या उंदराला मोठा आनंद झाला. तेव्हा शहरातला उंदीर त्याला म्हणाला, ‘तू खोलीच्या मध्यभागी बस. मी एक एक पदार्थ देईन, तो खाऊन पहा आणि त्याची चव कशी काय आहे ते मला सांग !’ मग तो एकेक पदार्थ आपल्या पाहुण्याला देऊ लागला व तो चाखून ‘अहाहा ! काय चविष्ट पदार्थ आहे हा ! ‘ असे म्हणून तो खेड्यातला उंदीर त्याचे कौतुक करू लागला. अशा प्रकारे एक तास मोठ्या आनंदात गेला.
इतक्यात स्वैपाक घराचे दार उघडले गेले व ते पाहून दोघेही उंदीर एका कोनाड्यात जाऊन लपले. इतक्यात दोन मोठे बोके तेथे आले व त्यांनी मोठ्याने आवाज केला. तो ऐकून खेड्यातला उंदीर भीतीने घाबरला, त्याची छाती धडधडू लागली. मग तो हळूच शहरातल्या उंदराला म्हणाला, ‘अरे, असंच जर तुझं शहरातलं सुख असेल तर ते तुझं तुलाच लखलाभ होवो. मला खेडंच बरं, तिथल्या रानातल्या शेंगा बऱ्या पण रात्रांदेवस जिवाला भीती असणारी ही इथली पक्वान्न मला नकोत.
तात्पर्य : शहरात सुख फार पण त्याप्रमाणे दुःखेही फार. खेडयात मजा कमी पण त्या मानाने दुःखे व संकटेही कमी असतात.
लोभी माणूस
एका लोभी माणसाने आपला सगळा पैसा शेतात पुरून ठेवला होता. तेथे दिवसातून दोन वेळा जाऊन त्या पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठे समाधान मानीत असे. ते त्याचे वागणे त्याच्या नोकराने पाहिले व त्याने तर्क केला की, आपला मालक या जागेकडे नेहमी पाहतो, तेव्हा तेथे काहीतरी पुरले असावे.
रात्री त्याने तेथे जाऊन खणून पाहिले तर आत बरेच धन त्याला दिसले. ते घेऊन तो धन गेला. दुसऱ्या दिवशी तो लोभी माणूस नेहमीप्रमाणे तेथे येऊन पाहतो तर सगळे धन चोरीला गेलेले त्याला दिसले. मग तो डोके बडवून घेत रडू लागला. तेव्हा त्याचा शेजारी त्याच्याजवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागले.
लोभी माणसाने घडलेली हकीकत त्याला सांगितली. ते ऐकून शेजारी म्हणाला, “अरे मला वाटतं की तसं तुझं काहीच गेलं नाही. आपला पैसा येथेच आहे, असं समजून तू पूर्वीप्रमाणेच या जागेकडे पहात जा म्हणजे झालं.”
तात्पर्य : लोभी मागसे पैसे असून दरिद्री व अशांना पैशाचा उपयोग न होता दुसरेच कोणीतरी त्याचा उपयोग करून घेतात. जवळ असलेला पैसा वापरायचा नाही तर तो चोरीस गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ …!
धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला लहान-लहान गोष्टी मराठी मध्ये | small story in marathi हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.