मराठी गोष्ट | Marathi gosht | Marathi ghost

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये मराठी गोष्ट | Marathi gosht | Marathi ghost या विषयी माहिती दिली आहे. 

मराठी गोष्ट | Marathi gosht | Marathi ghost

स्वप्न पडलेले प्रवासी

तिघेजण रानातून प्रवास करीत असता त्यांच्या अंदाजापेक्षा प्रवास जास्त लांबीचा ठरला व त्यांच्या जवळचे सामान संपले. फक्त एकाला पुरेल इतकेच अन्न राहिले. तेव्हा उरलेल्या अन्नाची व्यवस्था करावी याबद्दल प्रश्न उत्पन्न झाला. एकाने सुचविले की, सर्वांनी झोपावे व ज्याला अतिशय चमत्कारिक स्वप्न पडेल त्याने राहिलेले अन्न घ्यावे.’ याला सर्वांनी मान्यता दिली व ते सगळे झोपी गेले.

मध्यरात्री दोघे उठले व एकमेकांना आपले स्वप्न सांगू लागले. एकजण म्हणाला, ‘अरे, मला काय विलक्षण स्वप्न पडलं ! मला एकदम कोणीतरी उचललं नि इंद्राच्या सिंहासनासमोर बसवलं ! दुसरा म्हणाला, ‘ आणि मी सोसाट्याच्या वाऱ्याने यमदरबाराजवळ जाऊन थडकलो !

तिसरा माणूस बिछान्यावर पडून त्यांचे बोलणे ऐकत होता. त्याला ह्या दोघांनी त्याचे स्वप्न सांगण्याविषयी आग्रह केला. तो ओरडला, ‘अरे, गप्प रहा, तुम्ही कोण असाल ते असा, पण गप्प रहा !’ ते म्हणाले, ‘ का ? आम्ही तर तुझे सहप्रवासी आहोत.’ तो म्हणाला, ‘काय ? तुम्ही परत आला ?” ते म्हणाले, “अरे, आम्ही कुठेच गेलो नाही. त्यावर तिसरा म्हणाला, ‘बरं तर मग ते मलाच स्वप्न पडलं असावं. मला दिसलं की तुम्हापैकी एकजणाला इंद्राच्या सिंहासनाकडे आणि दुसऱ्याला यमाच्या दरवाज्याजवळ नेलं त्यामुळे मला वाटलं की आपले सहप्रवासी पुन्हा दिसणार नाहीत, म्हणून मी उरलेलं अन्न खाऊन टाकलं.

तात्पर्य : मूर्खपणाचा फायदा शहाणे लोक करून घेतात.

जीभ

ग्रीस देशात झांथस या नावाचा एक मोठा माणूस होऊन गेला. त्याच्या घरी इसाप स्वयंपाकी होता. एके दिवशी झांथसच्या घरी मेजवानी होती. म्हणून त्याने इसापला आज्ञा केली की, ‘सर्वोत उत्तम असे जे पक्काच असेल ते आज पाहुण्यासाठी कर !”

रात्री ठरलेल्या वेळी पाहुणे जमल्यावर सर्वजण जेवावयास बसले. इसापने नुसत्या बोकडाच्या जिमांचे निरनिराळे पुष्कळ पदार्थ तयार केले होते. ते खाऊन पाहुणे फार खूप झाले. तरीही जिमांशिवाय दुसरा कोणताही पदार्थ ताटात नसल्यामुळे झांथस यास थोडेसे आश्चर्य वाटले व रागही आला. तो इसापला म्हणाला, ‘अरे, सर्वात उत्तम असं पक्कान्न तयार करायला सांगितलं असता तू नुसत्या जिमंचेच निरनिराळे पदार्थ काप तयार करून ठेवलेस ?” त्यावर इसापने उत्तर दिले, ‘जिमापेक्षा चांगला असा दुसरा पदार्थ आहे का ? विद्या, तस्त्रज्ञान यांचा उगम जिभेपासून झाला आहे. व्यारूपान, अभिनंदन, लम्र, व्यापार इत्यादी मोठमोठ्या घडामोडी, प्रतिज्ञा या सर्वाचे मुख्य साधन जीमच होय, तिची बरोबरी करणारा दुसरा पदार्थ नाही.

इसापचे हे समयसूचक भाषण लोकांना इतके आवडले की, त्यांनी त्याची फारच तारीफ केली. त्यावेळी सांथस पाहुण्यास म्हणाला, ‘अहो, अाजच्याप्रमाणे उद्यासुद्धा रात्री तुम्ही माझ्याकडे जेवावयास यावं, अशी माझी विनंती आहे. मग तो इसापकडे पाहून म्हणाला, ‘अरे, आज जमे तू सर्वात उत्तम पक्कान्न तयार केलेस, वसे उद्या तुझ्या मते जे सर्वात वाईट पक्कान्न असेल ते तयार कर.

दुसरे दिवशी सर्वजण जेवायला बसले असता आदल्या दिवशीचेच सर्व पदार्थ जेवणात होते. तेच पदार्थ पाहून पाहुण्यास व झथिस यांना फार आर्य वाटले. मग झथिस इसापला रागाने म्हणाला, ‘अरे, काल जे पदार्थ चांगले होते तेच आज सर्वात वाईट कसे काय झाले ?’ त्यावर इसाप उत्तरला, ‘जिमांपेक्षा वाईट असा दुसरा कोणता पदार्थ आहे ? जगात जितकी म्हणून नीचपगाची कृत्ये होतात, त्या सर्वांच्या मुळाशी जीभच कारणीभूत असते. बंड, मारामारी, लबाड्या नि अन्याय यांच्या संबंधाच्या गुप्त बोलाचाली जिमेनेच होतात. त्याचे इशारेही जिभेनेच दिले जातात. मोठमोठी राज्यं, प्रचंड नगरं इतकं नव्हे तर फार दिवसांचे मित्रत्वाचे संबंधसुद्धाळेच नाश पावतात.’ इसापचे हे चातुर्याचे बोलणे ऐकून लोक अगदी चकित झाले.

तात्पर्य : कोणत्याही बस्तूकडे निरनिराळ्या दृष्टीने पाहिले असता ती निरनिराळ्या प्रकारची दिसू लागते. त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूचा उपयोग जसा चांगल्या कामास होतो तसाच वाईट कामातही करता येतो.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला मराठी गोष्ट | Marathi gosht | Marathi ghost हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment