मराठी छोट्या गोष्टी तात्पर्य सहित | short story in marathi with moral

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये मराठी छोट्या गोष्टी तात्पर्य सहित , short story in marathi with moral या विषयी माहिती दिली आहे. 

मराठी छोट्या गोष्टी तात्पर्य सहित | short story in marathi with moral

कुत्रा आणि लांडगा

एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता. काहीतरी खायला मिळाले तर पहावे म्हणून तो चांदण्या रात्री फिरत होता. तेव्हा त्याला एका कुणब्याच्या झोपडीजवळ दारावर एक लढ कुत्रा बसलेला दिसला. त्याने त्याला रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला, ‘तू फार चांगला दिसतोस, तुझ्यासारखा देखणा व धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही.

याचं कारण तरी काय ? मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो, पण मला पीटभर खायला मिळत नाही.”

कुत्रा म्हणाला, ‘अरे, मी करतो ते तू करशील तर माझ्यासारखाच तूही मुखी होशील. त्यावर लांडग्याने विचारले, “तू काय करतोस ?” 

कुत्रा म्हणाला, “दुसरे काही नाही. रात्रीच्या वेळी मालकाच्या दारापुढे पाहारा करून मी चोराला येऊ देत नाही.

लांडगा म्हणाला, “एवढंच ना ? ते मी मनापासून करीन बाबा. अरे मी रानात भटकत थंडीवारा सोसतो तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरं काय पाहिजे ?” 

याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असता कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा करकोचा पढलेला लांडग्याने पाहिला. तेव्हा तो

कुत्र्याला म्हणाला, “मित्रा, तुझ्या गळ्यात काय रे हे ?”
कुत्रा म्हणाला, “अं हं. ते काही नाही. लांडगा म्हणाला, “तरी पण काय ते मला कळू देत.”
कुत्रा म्हणाला, “अरे, मी थोडासा द्वाड आहे, लोकांना चावतो, म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करीन म्हणून माझा मालक मला दोरीने बांधून ठेवतो, पण दिवस मावळला की तो मला सोडतोच. मग मी वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो. घरची सगळीच माणसं मला मायेनं वागवतात. पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला देत नाहीत. तेव्हा तू पड़ा, माझ्यासारखा वागशील तर तूही सुखी होशील.”

ते ऐकताच लांडगा मागच्यामागे पळू लागला. त्याला हाका मारीत कुत्रा म्हणाला, “अरे, असा पळतोस काय ?” लांडगा दुरूनच म्हणाला, “नको रे बाबा मला ते सुख, ते तुझं तुलाच लाभो. स्वतंत्रपणे वाटेल तसं वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग, तुझ्पासारखं बांधून ठेऊन जर मला कोणी राजा केलं तर ते राजेपणदेखील मला नको…!

तात्पर्य : स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली. पण परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही.

म्हातारा आणि त्याचा घोडा

एक म्हातारा व त्याचा मुलगा आपला घोडा विकण्यासाठी बाजारात चालले असता वाटेत एक माणून त्या

म्हाता-याला म्हणाला, “हा लहान मुलगा पायी चालला आहे, त्यापेक्षा तू त्याला घोडयावर बसव.” ते ऐकताच म्हाताऱ्याने मुलाला घोड्यावर बसविले व आपण लगाम घरून चालू लागला. पुढे

दूसरा माणूस त्या मुलाला म्हणाला, “आळशी पोरा, तुझा म्हातारा बाप पायी चालत असताना तुला थोड्यावर बसून जायची लाज वाटत नाही का ?” ते ऐकताच म्हातान्याने मुलाला खाली उतरवले व आपण घोड्यावर बसून निघाला. थोडे पुढे जाताच दोन स्त्रिया त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणाल्या, “म्हातारा पहा, लहान मूल पायी चाललं असता आरण घोडयावर बसून कसा चालला आहे ?” वे एकात्याने मुलाला आपल्या मागे घोड्यावर बसवून घेतले.

ते आणखी थोडे पुढे जातात तोच एक माणूस त्यांना विचारतो, “हा घोडा तुमचाच का ?” म्हातारा म्हणाला, “हो.” माणूस म्हणाला,  मला काही खरं वाटत नाही, कारण हा जर तुमचा असता तर तुम्ही त्याचे असे हाल केले नसते. दोघंही त्याच्या पाठीवर बसून चालला आहात, त्यापेक्षा तुम्हीच त्याला उचलून का घेत नाही ?”

ते ऐकताच दोघंही घोड्यावरून खाली उतरले व त्या घोडयाला आडवे करून त्यांनी त्यांचे पाय बांधले. मग त्यात एक वेळू घालून तो त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला व पुढे निघाले. ते पाहून रस्त्यातील सगळे लोक टाळ्या पिटून मोठमोठ्याने हसू लागले. तो आवाज ऐकून घोडा बिचकला व त्याने आपले पाय झाडून पायाला बांधलेले दोर तोडून टाकले. दोर तुटताच खाली नदी होती तिच्यात तो पडला व मरण पावला.

तात्पर्य : प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देतात त्या ऐकून घेऊन त्याप्रमाणे वागणे व प्रत्येकाला खूष करणे हे काम फार कठीण आहे.

उंदीर, कोंबडा व मांजर

एका उंदराचे पिलू प्रथमच बिळातून बाहेर पडले होते, ते थोडा वेळ इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आईला म्हणाले,

“आई, या लहानशा जागेतून मी जरा मोकळ्या जागेत आज जाऊन आलो तर किती मजा पाहिली, रस्त्याच्या बाजूने फिरत असता मी दोन प्राणी पाहिले. एक प्राणी गडबड्या स्वभावाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा होता. तो जेव्हा जेव्हा मान हलवी तेव्हा तेव्हा त्याचा तुराही हालत असे.

मी त्याची मजा पाहात होतो तोच त्याने आपले दोनही हात हालविले व मोठ्याने ओरडला. दुसरा प्राणी मात्र शांत व सभ्य होता. त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो देखणा होता व त्याच्या वागण्यामुळे त्याच्याशी मैत्री व्हावी असे मला वाटले.”

हे ऐकून उंदरी त्याला म्हणाली, “वेड्या पोरा…! तुला काहीच अक्कल नाही. नुसत्या दिसण्यावर जाशील तर फसशील, हे लक्षात घे. तू जो प्राणी प्रथम पाहिला व ज्याच्या आवाजाची तुला भिती वाटली तो बिचारा कोंबडा निरुपद्रवी असून एखादेवेळी त्याच्या मांसाचा थोडासा तरी भाग आपल्याला मिळण्याची शक्यता असते, पण रेशमासारख्या मऊ अंगाचा जो दुसरा प्राणी तू पाहिलास ते दुष्ट, लबाड आणि क्रूर असे मांजर असून उंदराच्या मांसाशिवाय त्याला दुसरा पदार्थ फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.”

तात्पर्य : बाह्य देखावा व सौन्दर्य याच्यावरून कोणाच्या अंतरंगाची परीक्षा करता येत नाही.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला मराठी छोट्या गोष्टी तात्पर्य सहित , short story in marathi with moral हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment