मराठी छोट्या गोष्टी | marathi short stories

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये मराठी छोट्या गोष्टी , marathi short stories या विषयी माहिती दिली आहे. 

मराठी छोट्या गोष्टी | marathi short stories

गरुड आणि घुबड

एक गरुड आणि एक घुबड फार दिवस एकमेकांशी भांडत असत. परंतु एक दिवस त्यांनी एकमेकांशी मैत्रिणीने वागण्याचे ठरवले, तसेच एकमेकांचे पिल्ले खाऊ नये असेही ठरविले. तेव्हा घुबड गरुडाला म्हणाले, मित्रा माझी पिल्ले कशी आहेत हे तुला माहित आहे का?. नाहीतर दुसऱ्याचेच पिल्ले आहेत असे समजून तू त्यांना खाऊन टाकशील.

गरुड म्हणाला, खरंच की, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला ठाऊकच नाही, सांग पाहू…! 

घुबड म्हणाले, माझी पिल्ले खूप सुंदर आहेत. त्यांचे डोळे, पिस, आवाज सगळ्यात खूप सुंदर आहे. आता येईना तुला ओळखता…?

पुढे एके दिवशी, झाडाच्या ढोलीत गरुडाला त्याच घुबडाची पिल्ले सापडली. ते पाहून तो म्हणाला, कितीतरी घाणेरडी आणि खूप किल्ले आहेत ही. घुबडाची पिल्ले तर खूप सुंदर आहेत.  म्हणजे ही काही घुबडाची पिल्ले नसणार. यांना मारून खाऊन टाकावं. असे म्हणून त्याने सगळ्या पिल्लांचा फडशा उडवला.

नंतर घुबडाने येऊन पाहिले तेव्हा ढोलीत पिल्ले नव्हती. ते गरुडास म्हणाले, मित्रा तूच माझी पिल्ले खाल्लीस.

गरुड म्हणाला, “हो , मी खाल्ली, पण मला काय माहीत की ही कुरूप पिल्ले तुझी आहेत म्हणून. तू तर म्हणाला होतास की, माझी पिल्ले खूप सुंदर आहेत. मला वाटलं की ती दुसऱ्याच पक्ष्याची आहेत. आता यात माझी चूक काय ?”

तात्पर्य : स्वतःची खरी माहिती लपवून खोटी माहिती सांगितली असता मनुष्य संकटात सापडतो.

कोल्हा रानमांजर आणि ससा

एक लहानसा ससा होता. तो भित्रा ससा एका बिळात राहात असे. त्याने एक दिवशी आपल्या  बिळाच्या तोंडाशी एका कोल्ह्याला बसलेले पाहिले, तो खूप घाबरला. पण त्याने विचार केला की , बिळाचे तोंड लहान आहे. त्यातून कोल्हा कधीच आत येऊ शकणार नाही. मग त्याची भीती कमी झाली. 

नंतर, एक दिवस त्याने कोल्हा आणि रानमांजर गप्पा मारीत आहेत असे पहिले. हे काही बरे नाही असे त्याला वाटले. थोड्या वेळाने ते रानमांजर सश्याच्या बिळात शिरले आणि त्याला आपल्या पंजांनी ओरबाडू लागले. ससा भिऊन बाहेर पळाला . तोच कोल्ह्याने त्याच्यावर झडप घातली आणि दोघांनी मिळून त्याच्यावर ताव मारण्यास सुरुवात केली. 

मरता मरता ससा म्हणाला , “तुमच्या दोघांची मैत्री झाली तेव्हाच मी ओळखला कि, आता आपली काही खैर नाही.” 

तात्पर्य : एकमेकांशी सतत भांडणाऱ्या दोन माणसांची एकी झाली की , एखादा गरीब संकटात सापडतो.

गाढव आणि निर्दय मालक

मी खूप गरीब गाढव होते. त्याचा मालक त्याच्याकडून खूप काम करून घेत असे आणि त्याला पोटभर खायलाही देत नसे.

असेच ते गाढव म्हातारी झाले. एके दिवशी मालकाने त्याच्या पाठीवर खूप मोठे ओझे लादले. रस्ता अवघड आणि खाच-खळग्यांचा होता. त्यामुळे गाढव धडपडून पडले व त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले. मालक खूप चिडला आणि दुष्टपणाने त्याला मारू लागला. 

तेव्हा, गाढव मान वर करून म्हणाले,”अरे दुष्ट माणसा, हे सगळे नुकसान तुझ्यामुळेच झाले आहे. तु जर मला नीट खाऊ घातलं असतं तर मी चांगला शक्तिवान झालो असतो हे ओझे मी सहजपणे वाहून नेऊ शकलो असतो.”

तात्पर्य : काही लोक असे कृतघ्न आणि दुष्ट असतात की ते प्रामाणिक आणि गरीब माणसांना छळन्यासही कमी करत नाहीत.

धन्यवाद मित्रांनो. जर आपल्याला मराठी छोट्या गोष्टी , marathi short stories हा लेख आवडला असेल , तर आपल्या मित्रांना आमच्या ब्लॉग बद्दल नक्की सांगा आणि share करायला विसरू नका.

Leave a Comment